सेवा-सुविधा

हे पुस्तक कुठे वाचायला मिळेल

Submitted by नयाहयवह on 6 April, 2023 - 12:03

मला हे पुस्तक मित्राला रेकमंड करायचे आहे
पहिलवानांच्या गोष्टी
क्रुपया काही मार्गदर्शन करा.
धन्यवाद

माहिती हवी आहे !

Submitted by कमल on 26 November, 2021 - 22:05

१, मुंबई मध्ये बहूमजली बिल्डिंग मध्ये जर आग लागली तर इन्शुरन्स कंपन्या घरासंबंधी कसे कॉम्पेनसशन
देतात ? सोसायटी चा या मध्ये भूमिका काय आणि कशी असते ?

२. बहूमजली इमारतीत राहायला जायचे असेल तर कोणती व्यवस्था अगोदर करून घ्यायला हवी (फ्लॅट फिनिश व्हायच्या आत)

३ इंटिरियर रेडी घ्यावे कि सुताराकडून करून घ्यावे ? (पैसे आणि टिकण्याच्या दृष्टीने ) फक्त प्रौढ माणसांसाठी मुले नाहीत.
४ आणखी कुठली काळजी घेणे आवश्यक आहे अशा इमारतीत राहायला जाताना ?

लग्नासाठीची पूर्वतयारी

Submitted by अमृताक्षर on 1 October, 2021 - 09:03
Birds in love

लग्न पहावे करून आणि घर पहावे बांधून या उक्तीप्रमाणे लग्न व्यवस्थापन हा अतिशय कठीण विषय आहे त्यात आता पूर्वीच्या काळी व्हायचे तसे लग्न म्हणजे फक्त पारंपारिक रीती रिवाजानुसार होणारे राहिले नाही..
बदलत्या काळानुसार अनेक गोष्टी लग्नाच्या पूर्वी ते लग्नापर्यंत केल्या जातात जसे की प्रे वेडिंग शूट, theme wedding, destination wedding, नवरी नवरदेव आणि फॅमिली चा छान बसवलेला प्रॅक्टीस केलेला डान्स, नवरीचे ते हळदीचे फुला फुलांचे दागिने, जोडप्याने matching कपडे घालणं etc etc
ही यादी न संपणारी आहे..

शब्दखुणा: 

नाशिक मधे जर घरपोच धान्य, भाज्या किंवा डबा घरी हवा असेल तर काय पर्याय आहेत

Submitted by sneha1 on 10 April, 2021 - 18:44

नमस्कार मंडळी!
नाशिक मधे जर घरपोच धान्य, भाज्या किंवा डबा घरी हवा असेल तर काय पर्याय आहेत सध्याच्या परिस्थितीत? मैत्रिणीचे आईबाबा तिथे जेल रोड जवळ कुठेतरी राहतात, दोघांनाही कोव्हिड झाला आहे त्यामुळे त्रास होतो आहे. तिच्या बहिणी मुंबईला आहेत पण त्यांच्या बिल्डिंग सील झाल्या आहेत. कोणी माहिती देऊ शकेल का याबद्दल प्लीज?
धन्यवाद!

भोसरी' मध्ये घरपोच डबा पोहोचवणाऱ्या लोकांची माहिती हवी आहे.

Submitted by रीया on 1 April, 2021 - 23:17

सध्या कोरोना च्या काळात अनेक जण घरी विलागीकरणात आहेत त्यांच्यासाठी आणि इतर ही पेशंट साठी घरपोच डब्बे पोहोचवणा ऱ्यांची माहिती एकत्र संकलित व्हावी म्हणून हा धागा.

माझे आई , बाबा आणि बहीण कोविड पोजिटीव्ह असून दवाखान्यात ऍडमिट होते. त्यांना 2 दिवसात डिस्चार्ज मिळेल. अशक्तपणा खूप असल्यामुळे घरी स्वयंपाक करण्याची ताकद त्यांच्यामध्ये नसणार तेंव्हा मला 'भोसरी' मध्ये घरपोच डबा पोहोचवणाऱ्या लोकांची माहिती हवी आहे.

मला स्पेशली नाश्ता पोहचवणारे लोकं हवे आहेत खरं तर कारण दुपारचे आणि रात्रीचे जेवण बहिणीच्या मित्र मैत्रिणी अरेंज करतील पण नाश्ता कुठून अरेंज होत नाहीये.

पुण्यामध्ये पेईंग गेस्ट म्हणून राहण्याची सोय

Submitted by माऊमैया on 20 January, 2021 - 05:20

माझ्या भाचीने टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथे पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला आहे. या महिन्याच्या शेवटी तिला पुण्यात राहायला जायचे आहे. तिला P.G. (पेईंग गेस्ट) म्हणून राहण्याची सोय पाहतोय.

सदाशिव पेठ भागातील P.G. ची माहिती असल्यास सांगावे.

मेडीकल इन्शुरन्स

Submitted by एविता on 11 November, 2020 - 00:12

" जया, अगं काय सर्फिंग करते आहेस एवढं?"

" अमेझॉन, दिवाळी जवळ आली, आता नव्या खरेदीसाठी काय काय मिळतंय ते बघते."

" छान, बेझोसच्या घश्यात घाल तू तुझे कष्टाने कमावलेले पैसे."

" अरे, अरे, अरे..! जणू काय तू ऑनलाईन घेतच नाहीस कधी?"

"घेते की. पण अगदी आवश्यक तेच आणि फक्त आईसाठीच घेते, माझ्यासाठी नाही. आणि दिवाळीला तर नाहीच."

"अरे हो. विसरलेच की. अग काय देऊ गं मी आई बाबांना गिफ्ट?"

"वय काय आहे गं आई बाबांचं?"

"बाबा एकसष्ट, आई अठ्ठावन."

"मेडिकल इन्शुरन्स पॉलिसी आहे का त्यांची?"

ब्रॉडबँड (न मिळाल्याने) कात्रजचा घाट

Submitted by शून्य शून्य एक on 5 May, 2020 - 05:06

तर ह्या सगळ्याची सुरुवात झाली साधारण वर्षभरापासून

अधूनमधून घरी काम करायला लागायचे त्यामुळं ब्रॉड बँड ची शोधाशोध सुरू झाली.

आधीच्या घरात बी एस एन एल ने उत्तम सेवा दिली होती त्यामुळे त्यांनाच विचारलं. महिनाभर पाठपुरावा झाला पण आताचा एरिया unserviceable म्हणुन रिजेक्ट झालं application
मग पर्याय चाचपडून झाले Idea wireless broadband (range नाही), Tikona broadband (उपलब्ध नाही) , एअरटेल, Hathway, Tata sky broadband (उपलब्ध नाही), टाटा दोकोमो ब्रॉड बंद

112 INDIA APP : तातडीच्या मदतीसाठी फोन व अँप

Submitted by साधना on 2 December, 2019 - 04:01

हैद्राबादची घटना ताजी असताना, काल व्हाट्सअप्पवर एक विडिओ आला. 112 India अँपची माहिती त्यात होती. काल शोधाशोध करत असताना मुंबई पोलिसांचे प्रतिसाद नावाचे अँप दिसले होते पण तिथे रजिस्ट्रेशन होत नव्हते. इथे बघूया काय अनुभव येतोय म्हणत अँप लगेच डाउनलोड केले. नाव, जन्मतारीख, फोन नंबर मागितल्यावर फोनवर ओटीपी आला. अँपने नेहमीसारखी माझे कॉन्टॅक्ट वाचण्याची, लोकेशन पाहण्याची, फोन वापरण्याची परवानगी मागितली. सहसा अँपला ही माहिती देणे मी टाळते व अँप काढून टाकते. पण ह्या माहितीशिवाय इच्छित काम करणे अप्पला अशक्य असल्याने परवानगी दिली. पुढच्या स्क्रीनवर अँप माझे लोकेशन दाखवू लागले.

बाहेरगावी जाताना कुत्र्याची देखभाल

Submitted by किरणुद्दीन on 7 March, 2019 - 09:10

आम्हाला अजून काही दिवसांनी बाहेरगावी जायचे आहे. घरात कुत्रे आहे. त्याला नेणे शक्य नाही. आडवड्याभरासाठी अशा पाळीव प्राण्यांची देखभाल करणा-या सेवा सुविधा पुण्यात उपलब्ध आहेत का ? असल्यास काय प्रकारच्या आहेत ? काय शुल्क आकारले जाते ? कृपया याबद्दलची माहिती असल्यास इथे द्यावी ही विनंती.

Pages

Subscribe to RSS - सेवा-सुविधा