arun यांचे रंगीबेरंगी पान

माझ्याच बाबतीत का?

हे सगळं असच फक्त
माझ्याच बाबतीत का घडतं?

चुक कोणाचीही असली तरी
बॉसच्या नजरेत मीच येतो
अगदी रजेवर नसून सुद्धा
कामचुकारीचा शिक्का बसतो

घाईघाईत घरून निघताना
नेमकी बायकोला आठवण येते
सावकाशीने करायच्या कामांची

माझ्या गाड्या

माझ्या संग्रहात असलेल्या काही गाड्यांचे फोटो .

वि. सु. : ह्या सगळ्या खेळण्यातल्या गाड्या आहेत........ स्मित

१. Picture_001a.jpg

२. Picture_002b.jpg

३. Picture_003a.jpg

मराठी चित्रपट : मला काय वाटतं????

मराठी चित्रपट हा तसा आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. अति जुने, जुने, नवे, आगामी अशा सगळ्याच चित्रपटांविषयी आपण बरीच चर्चा करत असतो. काही चित्रपट आपल्या पसंतीस उतरतात, तर काही अजिबात नाही.

पाऊस

पाऊस आला पाऊस आला
चहु बाजूंनी पुकारा झाला

कधी डोंगरावर तर कधी नदीकाठी
जाणवून देतो अस्तित्व तो
मनाचिया कोंदणी प्रियाच्या
रिमझिम जागवून देतो तो

आठवणींच्या कडेकपारी
पाऊस दाटून राहतो नेहमी
उनाड वारा अन् धुंद हवा

हुतात्मा दिन - गडावरचा

नेहमीप्रमाणेच गडावरची एक रम्य सकाळ. फरक एव्हडाच की आज बर्‍यापैकी गर्दी आहे गडावर. ते बघून वहिनी सर्व गडकर्‍यांना फर्मान सोडतात की आज हुतात्मा दिन आहे म्हणून आपण ११:०० ते ११:०२ अशी दोन मिनिटे उभं राहून मौन पाळूया.

रुटीन

नविन वर्ष, नविन महिना, नविन दिवस
म्हणायच आपलं नविन म्हणून
पण आहे सगळे नेहमीचेच
रुटीन कामाचे रात्र अन् दिवस

रोज सकाळी हापिसात पोचायची नेहमीचीच घाई
हापिसात गेल्यावर नेहमीचीच कामाची यादी
आजचं काम उद्यावर ढकलू म्हटलं तर

बुधवार ... कायच्या काय कविता

अशीच एक "काहीच्या काही" म्हणजे अगदी शब्दशः कायच्या काय कविता आहे.
मिल्याने दिलेल्या feedback प्रमाणे तरम्ही कविता मीटरमध्ये पण बसत नाही. पण प्रॉब्लेम असा आहे की मला मीटर म्हणजे काय हेच माहित नाही, त्यामुळे .....

श्री गणेशा .....

सर्वप्रथम ऍडमिनना धन्यवाद. रंगीबेरंगीचे पान एका वर्षासाठी फुकट वापरायला दिल्याबद्दल .......... स्मित

नेहमीप्रमाणेच काय लिहावं हा प्रश्न आहेच.

बघुया काही सुचतय का ते .......... स्मित