पाऊस

पाऊस आला पाऊस आला
चहु बाजूंनी पुकारा झाला

कधी डोंगरावर तर कधी नदीकाठी
जाणवून देतो अस्तित्व तो
मनाचिया कोंदणी प्रियाच्या
रिमझिम जागवून देतो तो

आठवणींच्या कडेकपारी
पाऊस दाटून राहतो नेहमी
उनाड वारा अन् धुंद हवा
जागवतात नकळत रम्य आठवणी

तसा हा पाऊस नेहमीचाच
पण प्रत्येक वेळी हवाहवासा
असून अडचण नसून खोळंबा
ही म्हण सार्थ करणारा


वा वा अ. आ. सहीच.. पावसाळी हवा मानवली दिसतेय एकदम..

(हे काय? वविची झलक आत्तापासुनच का..? ह्याच्यामुळे कुणीच नाव देत नाहिये वविसाठी.
काय रे बुवा, त्या रेडिओ प्रोमोमधे संयोजकांनी जाहिरात केल्याने आत्तापासुनच छळ सुरु..)

~~~~~~~~~
~~~~~~~~~
स्मित



वाह अ.आ. आम्ही घाबरत होतो, तेवढं घाबरण्याची गरज नाहीय तुमच्या ४०० पानी वहीला. फिदीफिदी
छान जमली आहे की.



असून अडचण नसून खोळंबा
अगदी अगदी..... अरुण.... मस्त जमलिये कविता



समोरच्या कोनाड्यात उभी हिंदमाता
अरुणरावांच्या कवितांचा पाऊस, वविकरांनो, झेला! फिदीफिदी

अरुणरावः सहीये! वविला ज्येष्ठ साहित्यिकांकडून 'निवडक अ.आ.' प्रकाशित करून घ्याच. स्मित

-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश



विद्रोही संमेलनाची तयारी का??



फ निवडक अ. आ. का म्हणून? समग्र अ. आ. का नको..?
कारणे द्या...

~~~~~~~~~
~~~~~~~~~
स्मित



वा वा... अरुणराव, मस्तच लिहलय....
ललित मध्ये टाकुन द्या!

दिवे!