बुधवार ... कायच्या काय कविता

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

अशीच एक "काहीच्या काही" म्हणजे अगदी शब्दशः कायच्या काय कविता आहे.
मिल्याने दिलेल्या feedback प्रमाणे तरम्ही कविता मीटरमध्ये पण बसत नाही. पण प्रॉब्लेम असा आहे की मला मीटर म्हणजे काय हेच माहित नाही, त्यामुळे .....

असा हा सुंदर बुधवारचा देखावा
तरंगत्या मनांचा ग्लासकडे ओढा

काचेच्या ग्लासमध्ये रं पा छान
केप्या आणि योण्णांचा तो खासा मान

कार्याध्यक्षान्च्या शिस्तीचा आला की बडगा
श्रमातांच्या लेखणीतून वृतांत झरला

मिल्या आणि सुश्या मात्र बुचकळ्यातच
घरी काय सांगावे सुचेना पटकन

राजा आणि यश आपले फोनती एकमेकांना
अतुलमात्र धीटपणे पटवी मीनुला

सगळेजण जमती आता ठरल्या जागी
बुधवारच्या व्रताची ही आगळी कहाणी

विषय: