मदत/ माहिती हवी आहे

Submitted by रश्मी.. on 11 September, 2014 - 07:29

हॅलो मला एक मदत हवी आहे. माझ्या मैत्रिणी च्या भावाने, जो सन्गणक शिकत आहे,नवीन हार्ड डिस्क बसवण्याकरता जुन्या हार्ड डिस्क मधुन बॅक अप घ्यायला सुरुवात केली. पण काही कारणामुळे जुन्या डिस्क मधल्या बर्‍याचश्या फाईल्स/ डॉक्युमेन्ट्स उडुन गेले. जे होत असते.

दुर्दैवाने त्यातली गाणी आणी काही नवीन गोष्टी तो सिडी वर कॉपी करायचा विसरला. त्याने नेटवरुन सर्च केला, पण काही समजत नाहीये.

याला काही उपाय आहे का? की जेणे करुन त्याला त्या फाईल्स परत बघता येतील?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रश्मी, काही सॉफ्टवेअर येतात जे अगदी तुटलेल्या हार्ड डिस्क मधून देखील डेटा रिस्टोर करून देतात. पण ही प्रॉफेश्नल सॉफ्टवेयर असल्याने महाग असतात. तुम्ही तुमची जुनी हार्ड डिस्क कम्प्युटर रीपेयर स्टोर मध्ये देऊन डेटा रिस्टोर करू शकता. .माझ्या माहितीत पुण्यात कॅम्पात एक स्टोर आहे जे डेटा रेस्टोर करून देतात.. संपूर्ण हार्ड डिस्क रेस्टोर चे साधारण 1500 रुपये घेतले होते ( 2 वर्षापूर्वी :))

रश्मी.. |

काही फ्री सोफ्ट वेअर्स पण available आहेत. गूगल करा . how to recover deleted files from हार्डडीस्क . मी काही वर्षांपूर्वी असं सॉफ्टवेयर वापरलेलं आहे . नाहीच मिळालं तर मग स्टोर मध्ये जा . कारण स्टोर वाले पण अशीच सॉफ्टवेयर वापरून data recover करतात .

EASEUS Data Recovery Wizard Professional... गूगल करुन, फ्री व्हर्जन इंस्टॉल करुन वापरुन पहा...

डॉस मधे अनडिलिट कमांड असते एक.

*

>>
संपूर्ण हार्ड डिस्क रेस्टोर चे साधारण 1500 रुपये घेतले होते ( 2 वर्षापूर्वी स्मित)
<<
मी १९९९ मधे २१०० रुपये इंटरनेटवरून डालो केलेल्या सुमारे ८०० एम्बी डेट्याच्या रिकवरीसाठी दिले होते.कारण तो डेटा मला लै इंपार्टंट वाटत होता.

हार्डडिस्क रिकवरी केल्यानंतरही काही "तेव्हा" "महत्वाच्या" असलेल्या फायली करपटलेल्या, अर्धवट सापडल्या होत्या. ज्या आठवणीतून जमतील तशा पूर्ण केल्या होत्या.

हेच मी ५ वर्षांनी पुन्हा चेकलं तेव्हा लक्षात आलं, की दॅट डेटा वॉज नॉट इम्पॉर्टंट अ‍ॅट ऑल.. हार्ड डीस्क नुस्तीच फेकून दिली अस्ती तर परवडली असती. (त्याकाळी सोने ४ हजार रुपये तोळा होते Wink , अन डेटा रिकवरी नंतर ती हार्ड डिस्क फेकून देऊन नवी घ्यावीच लागली होती. )

कोणत्याही हार्ड डिस्क्/मेडियावर रिकव्हरीसाठी नवे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करू नका.
तो मेडिया स्लाव करून, मास्टर डिस्क इतर ठेवून तिथून मग अनडिलीटचा प्रयत्न करा.

हे असं का??
तर,

हार्ड डिस्क इ. वर 'लिहिणे' म्हणजे काय ते समजून घ्या.
आपण जेव्हा 'लिहितो' तेव्हा दोन गोष्टी होतात. १. अ‍ॅक्चुअल डेटा रेकॉर्ड होतो. जसे फाऽर पूर्वी ऑडिओ कॅसेटवरच्या मॅग्नेटिक मटेरियल कोटिंगमधील कणांचे मॅग्नेटिक ओरिएंटेशन बदलायचे. २. हे असे बदल कुठे केलेत, त्याची नोंद FAT उर्फ फाईल अ‍ॅलोकेशन टेबल मधे होते. जसे की, निबंधाच्या वहीत आपण अनुक्रमणीकेत कोणत्या पानावर काय लिहिलं त्याची नोंद करतो.
बेसिकली, तुम्ही जेव्हा एकादी फाईल डिलीट करता, किंवा,जेव्हा फाईल 'उडते' तेव्हा 'लो लेव्हल फॉर्म्याट' केलेला नसेल, तोपर्यंत, सहसा, फक्त फॅट मधील एंट्री खोडली जाते. अर्थात, अनुक्रमणीकेतून ती एंट्री जाते, अन उदा. पान नं. १९७८ ८वी ते ११वी ओळ (Sector 1978 Track 8 to 11 etc.) हे नेक्स्ट निबंध (data) लिहिण्यासाठी मोकळे आहे, अशी नोंद होते.
रिमेंबर, अ‍ॅक्चुअल पान नं. १९७८ वर लिहिलेला मजकूर खोडला जात नाही. फक्त अनुक्रमणीका एंट्री जाते.
यामुळे रिकव्हरी सॉफ्टवेअर अ‍ॅक्चुअल डिस्क वाचून डेटाचे तुकडे एकत्र जोडून तुमची फाईल परत मिळवायचा प्रयत्न करतात. (एक फाईल अक्षरशः हजारो नॉन-अ‍ॅडजेसन्ट सेक्टर्सवर लिहिली जाऊ शकते)

त्याच हार्डडिस्कवर नवे सॉफ्टवेअर इन्स्टॉल केले, तर तुमच्या उडालेल्या फाईलच्या भागांवर 'ओव्हरराईट' व्हायचे चान्सेस जास्त आहेत. फाईल रिकव्हरीचे चान्सेस कमी होतात.

फाईल हेडरच उडाले, तर रिकव्हरी ऑल्मोस्ट इंपॉसिबल होते, कारण नुसत्या शेपटीवरून डोके सहसा रिकन्स्ट्रक्ट होत नाही. ती फाईल डोक्युमेंट आहे की एक्सेल की एम्पी३ हेच आपल्या डबड्याला उमजत नाही मग Wink ...

असो. काम्प्युटर क्लासेस हा माझा प्रांत नव्हे. इथले तज्ज्ञ अधिक लिहितीलच.

मुद्दा हा, की जर डेटा रिकव्हरी लै मह्त्वाची असेल, तर त्याच हार्डडिस्कवर काहीही ल्हि/डिलीट उद्योग करू नका. डायरेट दुकानात न्या. थितं डिक्स डाग्दर आप्रेशन करेल. आजार किती गंभीर त्यावर पेशंट बरा होतोय की नाही ते ठरेल...

गुडलक.

>>असो. काम्प्युटर क्लासेस हा माझा प्रांत नव्हे. इथले तज्ज्ञ अधिक लिहितीलच. <<

बरं झालं क्लीयर केलत ते; हल्लीची ओएस एफएटी फाॅर्मॅट वापरत नाहि, दॅट्स वेरी ओल्ड. न्यु फाॅर्मॅट इज एनटीएफएस... Wink

राज,

एन्टिएफेस वाल्या फॉर्म्याटची हार्ड डिस्क आहे, असे स्पेसिफाय केलेले दिसत नाहिये. शिवाय 'ती' जुनी हार्डडिस्क त्या प्रकारची असेल याचे किती चान्सेस वाटतात?

अन हो, क्लियर मी केलं, पण तुम्ही तज्ज्ञ दिसता, सल्ला द्या की! काळजी करू नका. Wink तुमच्या पोटावर पाय द्यायला येणार नाहिये मी. Proud

(मी औषध सांगितले नाहिये. डाक्टरकडे न्यायच्या आधी काय "फर्स्ट एड" द्यायची (अन त्यामागची कारणमीमांसा 'लेमन' भाषेत) तितकंच सांगितलं आहे, अन पुढे डाक्तरकडे न्या असे लिहिले आहे, हे तुमच्या हुश्शशार "अमेरिकाएक्स्पोर्टेड" बुद्धीस उमजले आहे की नाही, हे सांगा पाहू?

रच्याकने : प्रत्येक ठिकाणी माझ्या पाठी येऊन नडणारे एक जोशी आहेत इथे, अन दुसरे तुम्ही. खुन्नस घ्यायची तर नीट खुलेपणाने घेत जा. हे असले छुपे अजेंडे काय कामाचे? कशी घ्यायची ते शिकवतो हवं तर. ट्यूशन फीस संपर्कातून सांगेन. Wink

अन हो,
मी जे लिहिलंय, त्यातलं टेक्निकली चुकीचं काय आहे, ते लिहिलंत तर माझ्याही ज्ञानात भर पडेल.
लिहिण्याची कृपा करता का जरा?
Happy

अरेच्चा, तुमच्या पोस्टमध्ये थोडीसी नवीन माहिती दिली तर लगेच खुन्नस? व्हाय आर यु सो इनसिक्युर? बी ए मॅन.

आणि हो, मी तुमच्या मागावर असतो या भ्रमात/भीतीत राहु नका. हु द हेल यु थिंक यु आर? मागे इथल्याच एका चर्चेत झापलं होतं ते विसरलात काय?

MCA chi addmission घेण्यासाठि मुंबई तील चांगले गवर्नमेंट college सुचवा