वाटलं आता तरी थोडं काम करावं....

Submitted by चिखलु on 5 July, 2012 - 15:33

सुस्तावलेल्या कि बोर्ड वरची
धूळ झटकली
आणि फडकं मारलं स्क्रीनवर
वाटलं आता तरी थोडं काम करावं....

बटन म्हणाले आता तरी बदड आम्हाला
कधीचं वाट बघतोय
माउस म्हणाला शी बाबा
हा भलताच आळशी प्राणी आहे
मला ऑपरेट करणारा

स्क्रीन म्हणाला
बघतोस काय डोळे फाडून
मल्लिका शेरावतला साडीत
पाहिल्यासारखं

डीवीडी रीडर म्हणाला
कधीपासून वाट बघतोय
काहीतरी वाचायला मिळेल
आणि हा ठोम्ब्या तर काहीच वाचू देत नाही.

सीपीयु कडे हात जाताच
तो आपोआप दोन चार पावलं मागे सरकला
म्हणाला, नाहीतरी मी Stand -By मोड वरच जाणार आहे
कशाला उगाच कष्ट करतो
जा झोप जरा.

शब्दखुणा: