आठवडाभराचं रूटीन संपलं की माझ्यासारखा माणूस आख्ख्या देशाचं नव्हे तर जगाचं ओझं आपल्या डोक्यावरून उतरल्यासारखा जे तंगड्या वर करतो ते रविवारी रात्री नको तेवढ्या आरामामुळे तंगड्यांची चाळवाचाळव होत राहिली की खरय़ा अर्थाने जागा होतो असा माझा एक समज झालाय.तेव्हा त्याला मग काय काय आठवायला लागतं.काय काय जाणीवा व्हायला लागतात.कसले कसले साक्षात्कार व्हायला लागतात.आपली स्वप्नं साक्षात्कारांसाठीच आंदण दिली गेली आहेत असा काहीतरीही माझा आणखी एक समज त्यावेळी होत असतो.मी तो करून घेत असतो असं म्हणूया.
"ते आले, त्यांना पाहिलं, त्यांनी हसवलं! " .....
टोक्यो मराठी मंडळाच्या गणेशोत्सव कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या दिलीप प्रभावळकरांचं असं वर्णन नक्कीच करता येईल. साधारण २-२.५ तासाचा असा हा कार्यक्रम, सुरुवातीपासुन शेवटपर्यंत त्यांनी हसताखेळता ठेवला!
अस्सल देशी हायकू (?)
श्री भरत मयेकरांनी हायकू हा प्रकाराबद्दल लिहिले.
ते इतरांप्रमाणे मलाही खुप आवडले.
त्यांच्या बाफ़वर टवाळकी करणे हे योग्य नव्हे म्हणुन
वेगळा तंबू उभारून अस्सल देशी हायकू (?) सादर.
हायकूच्या तंत्राबद्दल पुरेशी माहीती व्हायचीय.
होईल यथावकाश.
१)
टीव्ही,मि़क्सर,बाईक जापानी
आता हायकुही जापानीच
फ़क्त बायकू तेव्हडी भारतिय उरली. 
२)
त्याला बघून वेणी थरथरली
डोळ्यातून आसवे गळली
सुपारी लागली असेल बहुतेक. 
३)
डांबर,सिमेंट,गिट्टी खायची नसते
आहार शास्त्रात बसत नाही
पोटविकार-तब्बेतीस हानीकारक असते. 
४)