अस्सल देशी हायकू (?)

Submitted by अभय आर्वीकर on 11 March, 2010 - 10:37

अस्सल देशी हायकू (?)

श्री भरत मयेकरांनी हायकू हा प्रकाराबद्दल लिहिले.
ते इतरांप्रमाणे मलाही खुप आवडले.
त्यांच्या बाफ़वर टवाळकी करणे हे योग्य नव्हे म्हणुन
वेगळा तंबू उभारून अस्सल देशी हायकू (?) सादर.
हायकूच्या तंत्राबद्दल पुरेशी माहीती व्हायचीय.
होईल यथावकाश.

१)
टीव्ही,मि़क्सर,बाईक जापानी
आता हायकुही जापानीच
फ़क्त बायकू तेव्हडी भारतिय उरली. Sad
२)
त्याला बघून वेणी थरथरली
डोळ्यातून आसवे गळली
सुपारी लागली असेल बहुतेक. Uhoh
३)
डांबर,सिमेंट,गिट्टी खायची नसते
आहार शास्त्रात बसत नाही
पोटविकार-तब्बेतीस हानीकारक असते. Angry
४)
जन्मास घालतांना विधात्याने माझेसमोर दोन पर्याय ठेवलेत.
टाळकी की टवाळकी....??
मला टाळक्याची गरज नव्हती... मी टवाळकी निवडला.
काही चुकलय माझं...??? Light 1
५)
आडदांड सोसाट्याचा वारा सुटला तेव्हा
ढगांनी आकाशात गर्दी करून जाळे विणले.
हवेच्या रेट्याने चंद्र घसरला तर तो जमिनीवर पडू नये म्हणुन. aha.gif

गंगाधर मुटे

<< ह्या वयात नाचणं बर न्हवं ... >>

अहो ते नाचणे नव्हे.
बाबा रामदेवप्रणित मानेचा/खांद्याचा योगाभ्यास आहे तो. तुम्ही पण करा... Happy

. aha.gif

Wink Proud

हवेच्या रेट्याने चंद्र घसरला तर तो जमिनीवर पडू नये म्हणुन >>>>>> लै भारी!

श्री........ ते उसनं नसते, उसण असते!

हायकु हायकु...
बायकु बायकु...! Happy

छान .