वाघ

पेंच जंगल सफारी

Submitted by लाजो on 10 September, 2012 - 08:35

हाय,

यंदाच्या भारतभेटीत पेंचला वाघ बघायला जायचा विचार आहे. मध्यप्रदेश टुरिझमच्या साईटवरुन माहिती काढली आहे. एमपी टुरिझम सर्व ट्रिप प्लॅन करतात. नागपूर एअरपोर्टहुन पिक / ड्रॉप ऑफ, किपलिंग कोर्ट हॉटेल मधे रहाण्याची, भोजनांची सोय, डे आणि नाईट सफारी वगैरे वगैरे. कुणी केली आहे का एमपी टुरिझमने ऑर्गनाईज केलेली ट्रिप? किपलिंग बद्दल काय मत आहे. कोणाला काहि अनुभव असेल तर सांगाल का प्लिज. तसेच एका साईटवर वाचले की डिसेंबर मधे सफारी नसतात Sad

एकंदरच पेंच बद्दल माहिती हवी आहे.

विषय: 

वाघाची शिकार रोखण्यासाठी जालीम उपाय.

Submitted by विजय आंग्रे on 23 May, 2012 - 01:41

tigers.jpegप्रकाशचित्र सौजन्य:- आंतरजाल

देशभरात ' वाघ वाचवा ' मोहीम जोरात असतानाच गेल्या बारा वर्षांत सुमारे साडेचारशे वाघ वेगवेगळ्या कारणांमुळे मृत्यूमुखी पडल्याची माहिती समोर आली आहे . त्यातील बहुतांश वाघ शिकारीमुळे मरण पावल्याची माहिती पर्यावरण व वन मंत्रालयाने दिली आहे . वाघ हा डौलदार, शक्तिमान सुंदर प्राणी आपल्या देशाचा राष्ट्रीय प्राणी म्हणून जाहीर केला; परंतु हाचा वाघ आज आपल्या अस्तित्वासाठी सरकारकडून आणि लोकांकडून स्वतःच्या जीविताच्या रक्षणाची प्रतीक्षा करीत आहे.

शब्दखुणा: 

वाघ

Submitted by prafull shiledar on 6 April, 2012 - 06:55

वाघ

प्रत्येकाजवळ असतो
तसा माझ्याहीजवळ होता एक वाघ
कुणाला फारसा न आवडणारा
लोक दूरदूरच राहायचे त्याच्यापासून आणि माझ्यापासुनही

मी कापली त्याची नखं
जबडा उघडून स्वतःच हलक्या हाताने
काढून टाकले त्याचे सगळे दात
मिशीचे ताठ उभे केसही कापले
काही कोलांटउड्या आणि एक मजेदार नाच शिकवला
त्याला गुदगुल्या केल्या कि तो हसायचा
आणि तो देखील उलट गुदगुल्या करू लागायचा

झकास झाले...

वाघ आणि मी खूपच आवडू लागलो सगळ्यांना
शेळ्यामेंढ्यामध्ये तर आमची फारच तारीफ सुरु आहे

- प्रफुल्ल शिलेदार

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - वाघ