नाही

अंदाज मी ठेवत नाही

Submitted by Meghvalli on 13 September, 2025 - 08:59

मतला:
ते म्हणतात, शब्दांचा लिहाज मी ठेवत नाही।
ही अदा काय कमी आहे, की कटूतेचा अंदाज मी ठेवत नाही।।

शेर २:
असतील कुणी सुसंस्कृत, ज्यांची शिष्टाई अदबी आहे।
मी भावनांचा प्रेमी आहे, अदबी अंदाज मी ठेवत नाही।।

शेर ३:
माझी रचना ग़ज़ल नसेल कदाचित, नज़्मच आहे।
भावना भिडल्या तर क़ाफ़िया-रदीफ़चा अंदाज मी ठेवत नाही।।

शेर ४:
साहित्यिक तो, जो शब्दांत भावना मिसळतो।
ग़ालिब सारखा भाषेचा अंदाज मी ठेवत नाही।।

मक़ता:
मी ‘मेघ’ आहे, हे आकाश माझेच आहे।
वाहत्या वाऱ्यांचा अंदाज मी ठेवत नाही।।

आता नाही.

Submitted by मिलन टोपकर on 8 March, 2012 - 02:24

शोधू नकोस, मिळणार नाही
तुझ्यात मी, असणार नाही..!
आता तुच बहरून जा
आता मी, फुलणार नाही ..!
डोके टेक, हात जोड
फत्तर तो, द्रवणार नाही ..!
तुला मी, मला तू
कधीच का कळणार नाही ..?
आधी मन मारून टाक
तर डोळे, झरणार नाही ..!
रामालाच तोंडे दहा
सीता काही करणार नाही ..!
जिंकायचे नाही मला
म्हणून तू हरणार नाही ..!
तुझा मी, माझी तू
असे काही होणार नाही ..!
फायदा हाच मरण्याचा
नवे दु:ख छळणार नाही ..!
अश्वत्थामा, पुरे आता
मला तेल उरणार नाही ..!

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - नाही