अंदाज मी ठेवत नाही

Submitted by Meghvalli on 13 September, 2025 - 08:59

मतला:
ते म्हणतात, शब्दांचा लिहाज मी ठेवत नाही।
ही अदा काय कमी आहे, की कटूतेचा अंदाज मी ठेवत नाही।।

शेर २:
असतील कुणी सुसंस्कृत, ज्यांची शिष्टाई अदबी आहे।
मी भावनांचा प्रेमी आहे, अदबी अंदाज मी ठेवत नाही।।

शेर ३:
माझी रचना ग़ज़ल नसेल कदाचित, नज़्मच आहे।
भावना भिडल्या तर क़ाफ़िया-रदीफ़चा अंदाज मी ठेवत नाही।।

शेर ४:
साहित्यिक तो, जो शब्दांत भावना मिसळतो।
ग़ालिब सारखा भाषेचा अंदाज मी ठेवत नाही।।

मक़ता:
मी ‘मेघ’ आहे, हे आकाश माझेच आहे।
वाहत्या वाऱ्यांचा अंदाज मी ठेवत नाही।।

शनिवार, १३/९/२५ ,५;५५ PM
अजय सरदेसाई -मेघ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अर्रे! फारच सुंदर!
>>>>>>मी ‘मेघ’ आहे, हे आकाश माझेच आहे।
वाहत्या वाऱ्यांचा अंदाज मी ठेवत नाही।।
_/\_

माझी रचना ग़ज़ल नसेल कदाचित, नज़्मच आहे।
भावना भिडल्या तर क़ाफ़िया-रदीफ़चा अंदाज मी ठेवत नाही।।

वाह ! हे थेट भिडलं आणि पटलं.

-दिलीप बिरुटे