कविता

सुप्रभात .. शुभ रजनी ...

Submitted by विदेश on 12 May, 2012 - 02:06

सुप्रभात .. शुभ रजनी ...
कशासाठी दोस्त ?

अफजलगुरू कसाब
मजेत मस्त

आपण महागाईने
नेहमीच त्रस्त

गृहिणी टंचाईत
नित्य चिंताग्रस्त

सामान्यांची स्वप्ने
धुळीत उध्वस्त

नेतेमंडळीचे दौरे
कायम जबरदस्त

जनतेची कमाई
दलालाकडून फस्त

सभागृह नेहमी
गोंधळातच व्यस्त

गुड मॉर्निंग... गुड नाईट...
कशासाठी दोस्त ? "

शब्दखुणा: 

चिमणीचे दात .

Submitted by मकरन्द जामकर on 29 April, 2012 - 01:03

चिमणीचे दात ................!!!!!

इवली इवली पावलं ,
चालली दुकानाला ,
खिश्यात पैसे दहा ,
पाच जन संगतीला !!!!

नसे काही उष्ट ,
न कळे जातपात ,
बाहेर होत जे ,
तेच असे आत !!

सर्वांना होते तेव्हा ,
चिमणीचे दात !!!!!

स्वार्थ्यांच्या जत्रेत ,
हरवलो मी पण आज ,
सरावलो विचाकायला ,
अन, दाखवायला दात

न अंतरी समाधान,
न कळे पोकळी का आत ,
नजर का भिरभिरते ,
शोधीत चिमणीचे दात !!!

-मकरंद जामकर
२०-४ २०१२

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

वार्धक्याचा थाट.

Submitted by मकरन्द जामकर on 29 April, 2012 - 00:58

वार्धक्याचा थाट............!!!!!!!!!!!!!!!

भूक रे मेली ,
देवा म्हणता ,
वाढलेस का ताट ?
काय चूक ती,
माझी देवा,
चालू वार्धक्याचा थाट ?

स्वकमाई बांधून मजले,
झालो का , मी अडगळ ?
शहाणे ते सर्व,आनिक,
एक मी वेडगळ !!!!!!!!!!.

ज्यांच्या स्वास्थासाठी,
होते ते नवस सायास ,
चेष्टा माझ्या जगण्याची ,
अन,उपकारे मिळे खायास !!!!!!!

तापविल्या शिश्यागत,
कानी सदा टोमणे ,
नित्य मूक रुदन ,अन,
बहिरेपणाचे बहाणे !!!!!!!!!!!!

केली तीर्थाटणे ,
घेवूनी खांद्यावरती ,
जगी फिरलो मी ज्यास ,
सोडू थेर ड्याला काशीस ,
म्हणता एकले ,
आज मी त्यास !!!!!!!!!!!!

रक्तच ते माझे ,
नसे " शिकवा " ,

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

सांग ना हासू कसे

Submitted by महेश on 25 April, 2012 - 15:51

कळेना मिळालेले सोसू कसे
खोटेच ते सांगना हासू कसे

हरवले माझे स्वप्न वेडे
सत्यात ते सांगना आरासू कसे

नयनात होते काल थोडे
विझलेत ते सांगना आसू कसे

भरूनी तरी रिक्त आहे
आयुष्य ते सांगना मिजासू कसे

येईल काय परतोन कोणी
महेश ते सांगना तपासू कसे

(आयुष्यात पहिल्यांदाच गझल जमली आहे (असे मला वाटते) आणि ती तयार झाल्यावर प्रथम विनाविलंब माबोवर लिहिली आहे.)

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

बुद्ध होण्याचा आवाज

Submitted by prafull shiledar on 6 April, 2012 - 07:10

बुद्ध होण्याचा आवाज

इथल्या प्रत्येक रस्त्यावरून
जराजर्जर म्हातारपण काठी टेकवत
चालत जात आहे
त्याच्या काठीची ठकठक
हृदयाला जाणवते

इथल्या प्रत्येक रस्त्याच्या कडेला
महारोगी बसले आहेत
त्यांचा कण्हत असण्याचा आवाज
सतत ऐकू येतो आहे

इथल्या प्रत्येक रस्त्यावरून
एक प्रेतयात्रा जाते
गेलेल्याला दिलेल्या निरोपाचे आवाज
आसमंतात भरून रहातात

या नगरात
मोठमोठे प्रासाद उभे झाले आहेत
विलासाची नवनवी दालने उघडत आहेत
या नगरात संगीत नृत्य गायन अविरत सुरु आहे

या साऱ्या आवाजांची
दुखरी गाज
आणि या भूमीवर
अश्वत्थ सळसळतो आहे

पण कुठलाच माणूस
बुद्ध झाल्याचा आवाज

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

वाघ

Submitted by prafull shiledar on 6 April, 2012 - 06:55

वाघ

प्रत्येकाजवळ असतो
तसा माझ्याहीजवळ होता एक वाघ
कुणाला फारसा न आवडणारा
लोक दूरदूरच राहायचे त्याच्यापासून आणि माझ्यापासुनही

मी कापली त्याची नखं
जबडा उघडून स्वतःच हलक्या हाताने
काढून टाकले त्याचे सगळे दात
मिशीचे ताठ उभे केसही कापले
काही कोलांटउड्या आणि एक मजेदार नाच शिकवला
त्याला गुदगुल्या केल्या कि तो हसायचा
आणि तो देखील उलट गुदगुल्या करू लागायचा

झकास झाले...

वाघ आणि मी खूपच आवडू लागलो सगळ्यांना
शेळ्यामेंढ्यामध्ये तर आमची फारच तारीफ सुरु आहे

- प्रफुल्ल शिलेदार

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

चरे

Submitted by मिल्या on 15 March, 2012 - 01:50

"बापरे किती खराब झालायंस?" मी आरश्यात डोकावत म्हणालो

"तुज्यामुळेच की रे, पाहतोयस ना किती चरे पाडलेस तू माझ्यावर?" तो विषण्ण होऊन उत्तरला

"खरेच की आता मला आठवत सुद्धा नाही ... कधी अन केव्हा इतके चरे पडले ते... " मी खांद्यावरची झोळी सावरत उद्गारलो
"हा पण तो बघ तो पहिला चरा आठवतोय...
’आईविना पोर’ च्या वेळचाच ना तो... अरे पण केवढ्या टाळ्या, केवढे कौतुक...

तुला नाही कळणार ते...

तेव्हा फेसबुक असते तर निदान १०० तरी लाईक्स मिळाले असते... जाऊदे"

तो जोरजोरात हसायला लागला

"अरे आणि हा बघ..." त्याच्याकडॆ दुर्लक्ष करत मी म्हणालो

गुलमोहर: 

चांदणस्पर्श

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

चांदणे मृदुल कायेवरूनी ओघळते
अस्वस्थ होऊनी धरा कुशीवर वळते
चंद्राच्या स्पर्शांमधेच सरते रात
मग उरी परंतु अजून ती का जळते?

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

तावदान

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

पुढेमागे होणारं खिडकीचं तावदान
एक वावटळ घरात घुसणारी
नि:शब्द बडबडीला आलेला ऊत
मधमाश्यांची गुणगुण, वैताग स्साला!
मोहाचं मोहोळ, डंखाचं सुख
कलंडू पाहतोय काचेचा ग्लास
भिरीभिरी वारं, भिरभिरत्या डोळ्यांत
तावदान अजूनही वाजतंच आहे!

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

गारगर्भार

Submitted by pradyumnasantu on 26 February, 2012 - 16:47

वैशाखाचा निष्ठुर वणवा
वसुंधरेला जाळत होता
जिवा-जिवाला छळताछळता
आकाशाला पोळत होता
*
गर्भप्रफुल्लित मेघसुंदरी
वरुणभेटिला उत्सुक झाली
गदगदुनी मग प्रियकराला
प्रीत-हळी ती देऊ लागली
*
’मेघा’ची ती हाक ऐकुनी
वरूणराजा प्रसन्न झाले
वा-यावरुनी भेटिस जाऊन
सावळ्या प्रिये कवे घेतले
*
मेघप्रिया ती नववा महिना
आवेगाचा भार सहेना
लाजत लाजत वरुणा म्हणते
किति आवळता जरा हळू ना
*
समयी त्याच त्या प्रभाकराने
धाडली पृथ्वीवरती किरणे
मेघाला ती धडकुनी गेली
अविचारी बेदरकारीने
*
प्रसुती वेणा सुरू जाहल्या
किरणांच्या धडकाधडकीने
पाठलाग मग वरूण करतो
वेगाने आणि संतापाने
*
किरणे ती मग भिऊन गेली

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - कविता