कविता

रद्दीवाला -

Submitted by विदेश on 10 August, 2012 - 02:27

.
रद्दीवाला "या कविराज"- म्हणून माझे स्वागत करतो
त्याच्या पैशानेच मला तो कटिंग चहा पाजत असतो -
मला भेटल्यावरती तो आनंदी अन् खुषीत दिसतो
माझ्या कवितेच्या रद्दीवर त्याचा धंदा चालू असतो !
एके काळी 'रद्दीवाला' म्हणून ज्याला हिणवत होतो
सलाम करुनी मी आता त्याचे जंगी स्वागत करतो -
"आभारासह परती"चा कविता-कचरा माझा घेतो
रद्दीवाला धंदा करुनी , धंद्यामधुनी 'सोने' घेतो !
कवितांच्या रद्दीने माझ्या, रद्दीवाला झाला 'राव'
'अध्यक्ष'पदी खुर्चीवरती देणगीसाठी त्याचे नाव -
व्यासपिठावर बसून हल्ली तो कविसंमेलन गाजवतो

शब्दखुणा: 

चहा सुंदर !

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 7 August, 2012 - 11:29

चहा सुंदर पिवून
जिव्हा गेली लाचावून
झाले रसमय मन
जड़ समाधी लेवून

उष्ण चविष्ट घोट
हळू उतरे घश्यात
वाफ स्पर्शून ओठ
झाले गंधित प्राण

पाणी साखर चहा
यात मिसळता दुध

वर आले फेसाळून
पेय अमृत होवून

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

शब्दखुणा: 

सागरतिरी .......

Submitted by किंकर on 5 August, 2012 - 19:56

चालताना सागर किनारी ,वाळूत उमटती पाऊलखुणा
लाट त्यावरून जाता, पुसट होतसे ठसा पुन्हा

पारदर्शी लाट अलगद,पसरी पडदा धूसर नितळ
घाव त्याचा कातर करी, गतस्मृतींचा कभिन्न कातळ

चुकवता त्या अलवार लाटा , घेती नव्याने वळण पाऊले
परिस्थितीने सहज बनविले, अज्ञाताच्या हातचे बाहुले

बदलता मार्ग नव्याने, दूर राहिला सागर किनारा
कडे कपारीतील झुळूक, वाहून आणते गंधित वारा

त्या वाऱ्याने त्याचे, पुन्हा केले असे भिरभिरे
आसवातल्या धुलीकणांनी, नजर त्याची लागू चुरचुरे

शब्दखुणा: 

येऊ नकोस कधीही

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 3 August, 2012 - 13:54

येऊ नकोस कधीही
पुन्हा आता तू
असशील तेथे सदैव
पण सुखी रहा तू

सूर तुझेनी माझे
नच जुळले कधीहि
रिझविणे माझे तुजला
जा विसरून आता तू

गीत आपुले आपण
होते सजविले छान
कडव्यात हरेक सदा
कळेना भांडलीस का तू

प्रत्येक जीत तुझीच
मी दुरावलो दूर
पण जिद्द तुझी का
न सोडलीस तू

तू पशिमेची अन
मी पूर्वेचा सदैव
भेद मिटले कधी न
ना मिटवले कधी तू

आता तरी निदान
ठरवू अखेर आपण
जातो मी माझ्या वाटे
सुख शोध तुझे तू

पड पड रे पावसा

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 3 August, 2012 - 13:10

पड पड रे पावसा
गड गड रे पावसा
धड धड रे पावसा
मझिया देशी

नको रागावू असा
पाठ फिरवू असा
जीव करून पिसा
जावू दूरदेशी

सदा चुकतो आम्ही
वने तोडूनी तोडूनी
केली उजाड अवनी
तव प्रिय

लाज राजाला नाही
खंत प्रजेला नाही
दिशा जळती दाही
धगधगत्या

काही भकास डोळे
काही खपाट पोटे
तुझ्या लावून वाटे
बसलीत

त्यांच्या ओठांसाठी
त्यांच्या पोटासाठी
त्यांच्या बाळांसाठी
तरी पड

विक्रांत

शब्दखुणा: 

कळेना..

Submitted by अमेलिया on 3 August, 2012 - 05:30

अजून ही तुझ्यामध्ये माझा, जीव का अडकतो कळेना
तुझे रंग घेऊन स्वप्नी, अजूनही का तुज स्मरते कळेना

मी अखंड झुरत्या क्षणांत तुझिया, तुला शोधूनी बघते
का तुझ्या भेटीचा ऋतू हवासा, न येई फिरुनी कळेना

आकाश तुझे अन तुझ्या चांदण्या, न माझे काही उरले
वाट तुझी-माझी सरली, अन गाव तुझा का सुटला कळेना

जरी मी जपले माझ्यात तुला, लपवूनी जगापासून
परी तुझ्यात ना मी उरले जराशी, का नाहीस जपले कळेना

शब्दखुणा: 

तुझे बरोबरच होते सारे...

Submitted by सुमेधा आदवडे on 2 August, 2012 - 12:28

तुझे बरोबरच होते सारे...
मीच धरला होता हट्ट!
निसटुन गेले मन कधीतरी...
धरले होते जरी घट्ट...

तू म्हणाला होतास, "इतके रंग नको पसरवु.."
माझ्याच पोटी फुलपाखरे होती सतत!
उगाच पाहिले दिवसा तारे...तुझे बरोबरच होते सारे...

काचेचा तुकडा दिला होतास तू मला,
मीच जपलं त्याला उराशी, रत्न म्हणुन
त्याच टोकाने रक्ताळले मन बिचारे...तुझे बरोबरच होते सारे...

तू म्हणाला होतास,"इतका जीव नको लावुस, त्रास होईल!"
मी मारे म्हणाले," त्रास नसला तर ते प्रेम कसले?"
खरंच वेडी होते ना रे? तुझे बरोबरच होते सारे...

तुला आठवणींची अडचण होत होती...
मला मन आवरताना अजुनही त्या हाती लागतात.

शब्द .. शब्द .. शब्द ..

Submitted by विदेश on 28 July, 2012 - 09:45

शब्दांच थैमान
डोक्यातल्या कप्प्यातून
घुटमळतात शब्द
तेच मनांत कधीपासून -
डोकावतात
संधी साधत बेटे
लेखणीतून घरंगळत
पहुडतात कागदावर
कविता बनून !

शब्दखुणा: 

हट्ट

Submitted by चैतन्य दीक्षित on 26 July, 2012 - 08:55

हट्ट कोणता करू तुजकडे?
थिट्या मनाची झेप थिटी
फिरून येती मनात इच्छा
भेट हवी मज, हवी मिठी |
आणि हासुनी ओळखशी तू,
देउन जाशी हवे तसे
मंतरल्यासम ते क्षण जाता,
इच्छांचे त्या पुन्हा पिसे |

'थांब थांब तू, नकोस जाऊ'
सांगावेसे तुज वाटे,
त्याच क्षणी अन् सभोवताली
काजळगहिरे तम दाटे |
म्हणून जाशी मिठी छेडुनी
झिणिझिणि वलये गात्रात
अन् पुढल्या भेटीची होते
मनी अनावर सुरुवात |

माबोवरील माझ्या मुली,सुना,बहिणींसाठी प्रेमाची भेट

Submitted by pradyumnasantu on 24 July, 2012 - 18:10

तिच्या सासरच्या अंगणातल्या वांग्यांच्या रोपाला
भेंड्या लागतात
गाण्यांच्या, बहिणींबरोबर खेळलेल्या, घरी
दूर दूर तिच्या माहेरी
*
थोडंसं पुढं गेल्यावर
अर्धा पिक्का आंबा पडतो थेट तिच्या पाठीवर
जणू आईनं मायेनं पाठीत दिलेला धपाटा
आगळीक काही केल्यावर
*
पुढचं झाड चिंचांचं
गाभुळलेल्या, आंबट गो्ड्या
जणू तिचा धाकटा भाऊ
इथेही करतो आचरट खोड्या
*
कोप-यातल्या नारळाला
फळं जी लागतात
पित्याच्या अंतरीच्या गोड पाण्याची
आठवण पाजवून देतात
*
पण जेव्हा ती माहेरी जाते
तिथल्या बागेतही अशीच फिरते
तिथेही आहेत दोन खास झाडं
ती दोन्हीही काढतात
डोळ्यांतून पाणी थोडं थोडं
*
एक तो पारीजात

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - कविता