वर्षाविहार

वर्षाविहार २०१६-वृत्तांत आणि प्रतिक्रिया

Submitted by ववि_संयोजक on 31 July, 2016 - 12:14

वविकर्स,
इथे वविविषयक आपले वृत्तांत आणि प्रतिक्रिया टाकाव्यात.पहिल्यांदा वविला आलेल्यांनी तर जरूर आपले अभिप्राय दयावेत.

विषय: 
शब्दखुणा: 

मायबोली वर्षाविहार २०१५ दवंडी

Submitted by ववि_संयोजक on 3 July, 2015 - 02:28

पावसाळ्याची चाहूल लागली रे लागली की समस्त मायबोलीकर ज्याची वाट अतिशय उत्सुकतेने पाहात असतात असा वर्षाविहार २०१५ येत आहे खास आपल्यासाठी!

मायबोली ही आजपर्यंत हजारो मायबोलीकरांच्याच नव्हे तर त्यांच्या कुटुंबियांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग झाली आहे. मायबोलीवरचे लेखन, इतर अनेक उपक्रम, चर्चा, गप्पा, चेष्टा-मस्करी, विनोद (आणि येथेच झडणारी तात्विक चर्चावादळे वा मतभेद) यांबद्दल मायबोलीच्या सभासदांचे कुटुंबिय रोज काहीतरी ऐकत असतातच. मायबोलीच्या वर्षाविहार उपक्रमाद्वारे त्यांनाही ती खमंग चर्चा, धमाल-मस्ती प्रत्यक्ष अनुभवायला मिळते आणि तीही इतर मायबोलीकरांसमवेत!

विषय: 

मायबोली वर्षाविहार २०१३

Submitted by ववि_संयोजक on 25 June, 2013 - 21:54

समस्त मायबोलीकरांनो .....

सालाबादप्रमाणे याही वर्षी घेऊन येत आहोत, मायबोलीकरांकरता आणि त्यांच्या कुटुंबीयांकरता आपल्या लाडक्या मायबोलीचा `वर्षा विहार २०१३'...वर्ष अकरावे ....

यात नवीन असे काय ? तर , हा ववि यावर्षी पासून मुंबई ,पुणे पुरता मर्यादित न राहता यावर्षी पासून नाशिक कर सुद्धा यात सहभागी होऊ शकतील. या तीनही शहरांना मध्यवर्ती पडेल असे ठिकाण मुद्दाम निवडले आहे.

विषय: 

वर्षा विहार २०११

Submitted by ववि_संयोजक on 22 June, 2011 - 04:17

कॉलेजचं कँटीन...., नेहमीप्रमाणेच गच्च भरलेलं !

"छोड यार, वो नही आनेवाली आज ! साल्ला, त्या खत्रुड सबनीसचा लेक्चर आहे बेसिक इलेक्ट्रॉनिक्सचा. तिच्या पुण्याचा प्रोफेसर तो. त्याचं लेक्चर सोडून काय येते तुझी छावी? तू आपला सुम्मडीमध्ये चाय पी आन जा लेक्चरला. क्युं रे चवन्नी, ठिक बोला ना?"

"गप्प बसा यार, ती येते म्हणालीय.. येणार म्हणजे येणारच! मला खात्री आहे, आपण आज तिला विचारणारच. मग साला जमीन - आसमान एक क्युं न हो जाये. आज आर या प्यार होवूनच जावदे."

वर्षाविहार २०११ : दवंडी !!

Submitted by ववि_संयोजक on 7 June, 2011 - 04:10

VaVI2011.JPG
"ढिंक चिका..ढिंक चिका...ढिंक चिका ढिंक......"

आधी तर कळेच ना, भर हापिसात एवढ्या जोरात कुठला रेडा, रेडीला आळवतोय ते. समोरच्या क्युबिकलमधली बकरी (हो बकरीच, रेडी म्हणावी इतकी वाढलेली नाहीये अजुन) डोळे विस्फारून माझ्याकडे बघायला लागली. मी चाट पडलो, पटकन पेपर स्टँडला लटकवलेला गॉगल हातात घेतला आणि माझा चेहरा बघीतला. व्यवस्थित होता. (अजून तरी पिताश्रींनी जा तोंड काळे करा असा हुकूम या आज्ञाधारक बालकाला दिलेला नाहीये). मी तिला डोळ्यांनीच खुणा करत विचारलं..

"काय्ये?"

विषय: 

वर्षाविहार २०११ - संयोजक नोंदणी

Submitted by admin on 1 June, 2011 - 02:04

गेली ५/६ वर्षे सातत्याने आणि वाढत्या प्रतिसादाने चालणारा मायबोलीचा एक उपक्रम म्हणजे वर्षाविहार. पावसाळा जवळ येत चालला आहे आणि बहुतेक मायबोलीकरांना वर्षाविहाराची प्रकर्षाने आठवण येत असेल.

मुंबई पुण्यामधल्या ज्या मायबोलीकरांना यंदा वर्षाविहार संयोजन समितीत काम करायला आवडेल त्यांनी आपली नावे इथे कळवा म्हणजे त्यातून ववी संयोजक मंडळ स्थापन करता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - वर्षाविहार