वर्षाविहार २०१६-वृत्तांत आणि प्रतिक्रिया

Submitted by ववि_संयोजक on 31 July, 2016 - 12:14

वविकर्स,
इथे वविविषयक आपले वृत्तांत आणि प्रतिक्रिया टाकाव्यात.पहिल्यांदा वविला आलेल्यांनी तर जरूर आपले अभिप्राय दयावेत.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फुल टू धमाल . खरच स्ट्रेसबस्टर Happy

हायलाईट्स

वॉटर पोलो , मड बाथ , अप्रतिम निसर्ग , मस्त जेवण अन जाता येता बसमधे धिंगाणा (त्याला अंताक्षरी म्हणण जड जातय )

टीप : गेल्या ५ वर्षात पहिल्यांदा पुणे बस ५० सीटर. संयोजकांचे विशेष कौतुक .

माझा ५वा ववि . टी शर्ट वाटपावेळीच पुण्याहून ५० लोक येणार असल्याच कळल्याने उत्सुकता होतीच .
बरोबर ६:५५ ला तिघेही (मी , कविता अन ओवि )पिंपरीला पोचलो . अगदी वेळेवर बसही होतीच . तिथून मग चांदणी चौक , किनारा -किमया वगैरे करत राजाराम पुलाला पोचलो . तिथे बरीच जनता घेऊन अन सईने दिलेले स्नॅक्स खाऊन पुढे निघालो. परत चांदणी चौकात येऊन श्यामली ला घेतल्यावर अंता़क्षरी चालू झाली ती अगदी पवना हट्स पर्यंत चालली . गाणी तर अगदी कट्यार पासून कलीयो का चमन अन् चार बोतल व्होडका पर्यंत . जरा आवाज चांगला असता , थोड सूर , ताल यांच ज्ञान असत अन एक १० -१२ वर्षे मेहनत घेतली असती तर मीही चांगला गायक झालो असतो याचा मला साक्षात्कार झाला .

तिथे पोचताच मुंबईकरांशी गाठ भेट झाली . त्यांचा प्रवास छोटाच असल्याने ते लवकर पोचले यात काही नवल नव्हतच . लगेच कपडे बदलून मस्त चहा नाश्ता झाला . मग तिथ्ल्या संचालकानी सगळी माहिती दिली (आपण तर पार या माणसावर फिदा झालो , एवढ बोलतो अन त्याहीपेक्षा जास्त कामही करतो , आजकाल फार दुर्मिळ आहे हे)

मग मस्त नैसर्गिक तलावात शिरलो . पाण्यात बर्फ टाकला आहे हे माहित नसल्याने काही काळ त्रास झाला . पण पाणी अगदी स्वच्छ . नदीच असल्याने अगदी थेट गावची आठवण झाली . मग मस्त २ तास वॉटर पोलो खेळलो.
त्यातच मधे लोक कयाकिंग हे करत असल्याने अन खेळाडू कोणतीही पूर्वसूचना न देता येत जात असल्याने थोडा त्रास झाला , पण धमाल आली.

नंतर तास भर चिखलात लोळलो , हो त्याला दुसरा शब्दच नाही . इतका स्वच्छ चिखल मी आयुष्यात पाहिला नव्हता . अन मऊ तरी अगदी गादीपेक्षा . चिखलाला नाक मुरडणार्या काही नव्या पिढीच्या शिलेदारांच ही आम्ही मत परिवर्तन केल .

मग स्वत:ला नळाखाली धुतल्यानंतर कपडे बदलून जेवायला गेलो. जेवणही अगदी मस्त . सगळ जेवण तिथे पिकवलेल्या धान्यापासून बनवल होत . कडाडून भूक लागल्यावर गरम गरम पिठल , भाकरी , अहहा .. मी तर बाकीच्या भा़ज्यांकडे पाहिलही नाही .

जेवण झाल्यावर सांस्क्रुतिक (हा शब्द मला लिहिता येत नाही ) कार्यक्रमाना सुरूवात झाली . लहान मुलांच्या संगीत खुर्ची नंतर ओळख परेड अन खेळ होता. बरेच मायबोलीकर इतक्या वेळा वविला आले होते की त्याना कितीवेळी हे आठवत ही नव्हते . त्यांचा हेवाही वाटला अन आपल्यावरही वेळ यावी असही वाट्ल. बर नसल्याने नरम गरम असलेली ओवीही तोवर फॉर्मात आली होती अन मग तिचाही दंगा चालू होता . सशाला तर पोट फुटेपर्यंत खायला घातल आम्ही .

मग चहा पिऊन फोटोसेशन . इतक्या लोकांचा फोटो काढण हे च एक दिव्य होत . पण सगळे माबोकर अगदी शिस्तित उभे राहिले . मग मुंबईकरांचा निरोप घेऊन परत निघालो . गाडी चालू होताच परत जी अंताक्षरी चालू झाली ती आम्ही उतरेपर्यंत सुरू होती . उतरताना मात्र अगदी कससच वाटल .

आवर्जून सांगाव्याशा वाटणार्या दोन गोष्टी .

१. पवना हट्स : अतिशय सुंदर ठिकाण . स्वच्छता अन टापटीप . कसलाही गोंधळ नाही . मस्त जेवण . छान निवड संयोजक

२, जवळ जवळ एक वर्षानी मी , कविता अन ओवी सगळ्याना भेटलो . पण कुणीही अस जाणवू दिल नाही . अगदी रोज भेटल्यासारखे सगळे वागत होते . अन ओवीची काळजी ही अगदी आपुलकीने घेत होते. खूप बर वाटल.

किती धमाल आली म्हणून सांगू... शेलके प्रसंग लिहायला घेतले तरी प्रबंध होतील ! Happy मी लवकरच लिहिणार आहे, पण नवीन वविकरांना त्यांच्या या पहिल्याच वविचे इतिवृत्त लिहिण्यासाठी आग्रहाचे आमंत्रण! Happy

केदार, थोडक्यात पण मस्त लिहिलंस. बसमधील सुरेल व बेसूर दंग्याबद्दल काय व कसं लिहू? Proud एवढंच म्हणते, तोडलंत भावा!! Happy

त्यांचा प्रवास छोटाच असल्याने ते लवकर पोचले यात काही नवल नव्हतच . >>>>>>>>>>>>>>>>>>> केद्या पुढच्या वर्षीचा ववि पिंपरी चिंच्वद मधे ठेवला तरी मुंबईची बस पुण्याच्या बस अगोदरच पोहोचेल या वाद नाहीच (आणि करुही नये) Proud Proud

केदार थोड्क्यात मस्त लिहिल आहेस. बाकी माझा पुतळा,अंताक्षरी आणि धमाल साठी माझा रुमाल. नविन मंडळींनी वृत्तांत लिव्हायचा असतोय आधी. Uhoh कुठे आहेत कालचे १०० लोक ? Uhoh

कालचा ववि छान झाला... मज्जा आली.
माझा हा पहिलाच ववि होता.कुणालाही फारसं ओळखत नव्हते. त्यामुळे वविला जावे की न जावे या संभ्रमात होते. पण जर गेले नसते तर एक अफाट सुंदर अनुभव मिस केला असता हे परतताना जाणवलं आणि स्वतःच्या निर्णयावर खुष झाले! कुणीही अस जाणवू दिल नाही कि मि पाहिल्यन्दच आल्ले होते.
खरच ववि म्हन्जे स्ट्रेसबस्टर. सगळ्यांच संयोजकांनी मेहेनत घेतल्याचं दिसत होतं. गाडीतला प्रवास प्रचंड रिफ्रेशिंग होता. खुप नवीन ओळखी झाल्या. कयाकिंग, मड बाथ, पाण्यातली धमाल, पोटापाण्याची सोय, सगळं सगळं उत्तम होतं.
पाऊस दमदार चालू होता, वातावरणही आल्हाददायक की कायसंसं होतं त्यामुळे खरोखरचा नावाला साजेसा 'वर्षाविहार' झाला काल. वैभव आयरे ची ढोलकी वादन मस्त. anand kelkar, vinay, nil yaanchi ganyanchi jugalbandi chaalli hoti.
विनय भिडे, आनंदमैत्री, राखि, कविन मिनू काळजीपूर्वक विचारपूस करत होते.

कविन तर म्हनालि train cha kahi problem asel tar saral mazyaa ghari chal mi navin hote tarihi
मि घरि पोहेचेपर्यन्त सर्वजन समस करत होते घरि पोह्च्लिस कि वगारे खुप बर्र वाटले.
सर्व संयोजकान्चे मनापासून अभार. ( thanks to dakshinaa also tichyaa lekhamule khar tar mlaa vaatle javun baghu tari mhanun mi aale ) .

1.jpg

पवना हट्सच्या रस्त्यावर

13.jpg

हिरवागार नेत्रसुखद देखावा

केद्या पुढच्या वर्षीचा ववि पिंपरी चिंच्वद मधे ठेवला तरी मुंबईची बस पुण्याच्या बस अगोदरच पोहोचेल या वाद नाहीच (आणि करुही नये) फिदीफिदी Proud >> Proud

अरुंधती, फोटो छान आहेत पण माबोकरांसोबतचे फोटो टाक. मी मागच्या वर्षी २० - ३० फोटो टाकले होते. तसे जमत असल्यास कर.

हर्ट, मी माबोकरांचे त्यांच्या विनंतीवरून काही अल्प वैयक्तिक फोटो काढले आहेत. ते त्यांनाच पाठवणार आहे.

ववि धमालच होतो कायम!
काल देखिल धमालच झाला असणार!!!

केदारचा छोटेखानी वृतान्ताने लक्षात आलच आहे ते! आता बैजवार वृतान्त येऊ देत!! आणि निवडक फोटो देखिल! शक्य असल्यास! फेबुवर काही झळकलेत! Happy

मि घरि पोहेचेपर्यन्त सर्वजन समस करत होते घरि पोह्च्लिस कि वगारे खुप बर्र वाटले.
सर्व संयोजकान्चे मनापासून अभार.>>>>

सर्व संयोजकांचे कष्ट सार्थकी लागलेत म्हणावे लागेल! Happy

बर्‍याच दिवसांनी मित्रमैत्रिणींबरोबर असं अख्ख्या दिवसाचं आउटींग झालं. मजा आली. पवना हट्स मस्तं आणि संयोजकांची मेहनतही बेस्ट. सांसच्या वेळी वीज नसल्याने माईकच्या अभावी सांस वाल्यांना घसाफोड करुन गेम घ्यावे लागले. वेळही कमी होता त्यांच्याकडे पण संगीत खुर्चीने बच्चेलोकांना आणि हाहाहिहिहुहुने मोठ्यांना मजा आली. संयोजक ग्रेट जॉब, वेलडन.

कायाकिंग, थंडगार पाण्यातलं डुंबणं, मित्रमैत्रिणींसोबत मारलेल्या गप्पा, बसमधला दंगा, आठवणींच्या रोलमधे मनाच्या कॅमेर्‍याने बंदिस्त केलेले खुपसारे क्षण हे या वविचे हायलाईट्स

सांसवाल्यांनी यंदा अशा चारोळी, दोनोळी टाईप कोड्यातून आयडी ओळख्/आयडी ओळखा खेळायचं ठरवलं होतं. कल्पना युनिक होती त्यांची पण उपस्थित मंडळी खूप असल्याने १०० आयडी अशा पद्धतीने ओळखा ओळखा करणं वेळेअभावी त्यांनाही शक्य नव्हतं. पण आता त्यानिमित्ताने जमा झाल्याच होत्या चारोळ्या/दोनोळ्या/ ज्याकाही ओळ्या होत्या त्या. त्यामुळे म्हंटलं त्या इथेच टाकाव्यात आणि खेळून घ्यावं ओळखा ओळखा खेळ Proud चला तर मग जमेल तितके आयडी ओळखा बघू इथे Wink

१. कधी पुणे तर कधी मुंबई
असते चालू वारी
गोगादादाचं ऐकलं आणि
लावली इथे हजेरी

२.नृत्य माझी पॅशन
आता वविचं लागलय व्यसन
गोगाभावजींचे आभार मानून
संपवते मी भाषण

३.झांजा मी वाजवते
कोपु मी गाजवते
नावात माझ्या दिशा एक
उतरवलय मी माझ वेट

४.रेशीमगाठीची मी हिरॉईन
आयडी सांगा काय?
मिळेल खाऊ इन टू मिनिटस
हा वादा माझा हाय!

५.बिफोर-आफ्टरचे फोटो माझे
माबोवरती लागलेत
व्यायाम डाएट शब्द आता
माझी ओळख बनलेत

६.रहातो मी पुण्यात
रमतो मी गाण्यात
वविआधीचा वेळ माझा
जातो टिशर्ट करण्यात

७.लष्कराच्या भाकऱ्या भाजायची
आहे मला आवड
सामाजिक कार्यासाठी नेहमीच
काढते मी सवड

८.माबो मॅरेज ब्युरोचा
मी ही एक लाभार्थी
कार्याध्यक्ष बनुन करतो
सेवा मी निस्वार्थी

९.वेबसा‌ईट डिझा‌ईन नि इमेज बिल्डींग
व्यवसाय माझा आहे
कार्याध्यक्षांची अर्धांगी
ही पण ओळख माझी आहे

१०.वकील आहे पण घालत नाही
मी अताशा वाद
रांजणगावच्या गणेशाने
दिलाय मला प्रसाद

११.सोलापुरकर मी जन्माने
मला ट्रेकिंगचा चावलाय किडा
हाडाचा ट्रेकर बनायचा
उचललाय मी विडा

१२.पुण्यात मी रहाते
कट्ट्यावर बागडते
लिखाणात मी आळशी आहे
असं आमची ताई म्हणते

१३.कथा कविता श्वास माझा
लिखाण मला आवडते
रस्ता "गुब्बी" कार मी
ही ओळख मला सुखावते

१४.हातभर पोस्टी माझ्या
ज्योतिष माझा छंद
पावसामुळे सध्या माझी
सायकल ठेवलेय बंद

१५.ढोलकीवाला ओळख माझी
आहे मला प्रिय
वविमधे कल्ला करण्यात
असतो मी सक्रीय

१६.संस्थापक मी कट्ट्याचा
मला प्रेमाने म्हणतात मालक
मी तर आहे बोरीवलीचा
छोटासा एक बालक

१७.मैत्र्य जोडण्यास उत्सुक मी
मला ऍक्टींगचा चावलाय किडा
हसमुखराय आहे मी
कोणी चिडवा अथवा चीडा

१८.कभी कभी मेरे दिल मे
हा खयाल आला आहे
ती, मी आणि १८ ऑगस्ट
काहीतरी साम्य आहे

१९.सोलापुरी ठसका मी
पेशाने वकील मी
संयोजनाची आवड म्हणून
काढत असते सवड मी

२०.आयडीत माझ्या डॉट
वविसाठी प्राईम स्लॉट
जाहीराती आणि पोस्टर्स साठी
कायम असतो रेडी प्लॉट

२१.भिकबाळी नि शेंडी
ही ओळख माझी आहे
संघ, चहा नि सिगारेटशी
लगीन लागले आहे

२२.जगाची माता असा
बसलाय माझ्यावर शिक्का
उशीरा येते म्हणून आता
माझ्यावर नक्को टिक्का

२३.टायपिंगच्या चुका
मला पटकन दिसतात
माझ्या घाऱ्या डोळ्यांना
सगळेच घाबरतात

२४.मायबोलीकर होऊन मला
वर्ष पाच झाली
तरी लोकरीचं तोरण
हीच पाऊलवाट उमटली

२५.डम्बशेराड्स खेळातला डम्ब
माझ्या आयडीतही आहे
नुकतीत आले माबोवर
तशी कल्याणकर मी आहे

२६.चॅप्टर प्रकरण आयडी माझा
माबोकर मी ताजा ताजा
गॉगल फ़ेटा डिपीधारी
पहिल्यांदाच करतोय ववि वारी

२७.जन्माचे साल माझ्या
आयडीत आहे
शाखाच्या सिनेमात
मी जेन्टलमन आहे

२८.डिपीमधे आहे माझ्या
स्वप्नातलं घर
अर्ची पर्श्या फ़ॅन क्लबची
मी माबिवर घातलेय भर

२९.एक आठवडा वय माझ
मायबोली वरचं
मराठीतली "वरशीप" मी
आता करा माझं बारसं

३०) १२ वर्षांचा वनवास नि
१ वर्षाचा अज्ञातवास
संपवून वविला मी आलेय
ववि ववि करता करता वविमय झालेय

३१.पंढरीचे नाव माझ्या
आयडीमधे आहे
मुग्धमानसी सखी माझी
माझ्या विपूमधेही पाहे

३२.चवळीची मी शेंग आहे
भिड्यांची गाववाली आहे
डब्यात नाश्ता काय द्यावा
हा माझाच बाफ़ आहे

३३.मी कानडीतली चिमणी
आले माबोच्या अंगणी

३४.रोमन आहे आयडी माझा
म्हणून रोमातच मी असते
अल्झायमर्सच काउंसिलींग करत
मुंबईभर हिंडत बसते

३५.चांदणशेला मधे आहे
आठवणींची गोडी
हिच्या नावात आहे
दोन आड्नावांची जोडी

३६.मुख्यमंत्र्यांच्या गावचा मी
सध्याचा पत्ता पुणे
होमिओपथीच्या गोळ्यांमधे
काहीच नाही उणे

३७. आयडी माझा गणपतीला आवडतो
वस्तरा द्या भेट मला
माझ्या बायकोला
टकलूच फार आवडतो

हायला हे मस्त. मी ओळखले काही
३. दक्षिणा
४. मॅगी
५. केदार
८. आनंदमैत्री
१३. शुभांगी कु
१४. लिंबुटिंबु
१५.वैभव आयरे
१९. मुग्धानंद
२३.नीधप???

१६, भिडे

२१.भिकबाळी नि शेंडी
ही ओळख माझी आहे
संघ, चहा नि सिगारेटशी
लगीन लागले आहे>>> घारू.

८ अणि ९ मयुरेश आणि ऋतुजा

१. कधी पुणे तर कधी मुंबई
असते चालू वारी
गोगादादाचं ऐकलं आणि
लावली इथे हजेरी. >>> विवेक देसाई.

Pages