मायबोली वर्षाविहार २०१३

Submitted by ववि_संयोजक on 25 June, 2013 - 21:54

समस्त मायबोलीकरांनो .....

सालाबादप्रमाणे याही वर्षी घेऊन येत आहोत, मायबोलीकरांकरता आणि त्यांच्या कुटुंबीयांकरता आपल्या लाडक्या मायबोलीचा `वर्षा विहार २०१३'...वर्ष अकरावे ....

यात नवीन असे काय ? तर , हा ववि यावर्षी पासून मुंबई ,पुणे पुरता मर्यादित न राहता यावर्षी पासून नाशिक कर सुद्धा यात सहभागी होऊ शकतील. या तीनही शहरांना मध्यवर्ती पडेल असे ठिकाण मुद्दाम निवडले आहे.

मायबोली वर्षा विहार हा एक असा उपक्रम ज्यात मायबोलीवरचे सभासदच नव्हेत तर त्यांचे कुटुंबीयही सहभागी होऊ शकतात. मायबोलीवरचं लेखन, इथे चालणार्‍या गप्पा, चर्चा, चेष्टा-मस्करी (आणि क्वचित काही तात्विक मतभेद सुध्दा :डोमा:) तसेच इतर अनेक उपक्रम याबद्दल समस्त मायबोलीकरांचे कुटुंबीय रोज काही ना काही ऐकतच असतात. त्या गप्पा, ती धमाल त्यांना प्रत्यक्ष अनुभवायला मिळते ती वर्षाविहाराच्यादिवशी. वविच्या दिवशी नवीन भेटीगाठी होतात, ओळखी होतात, आधीच्या ओळखींचं मैत्रीत रुपांतर होतं, मैत्रीचे नवीन धागेही विणले जातात. सगळे वाद, स्पर्धा बाजूला ठेवून , मतभेद बाजूला सारुन, नवीन ओळखी आणि मित्र बनवण्याचा हमखास मेळा म्हणजे मायबोली वर्षाविहार ...

यंदाचा हा मैत्रीचा सोहळा संपन्न होणार आहे २८ जुलै २०१३ या दिवशी, विसावा रिसॉर्ट, मुरबाड येथे.

पण मंडळी, तो दिवस साजरा करण्याची पूर्वतयारी म्हणून काही गोष्टी नियमानुसार आणि ठराविक दिवसांत करणं गरजेचं आहे.

त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे वविला येणार्‍यांची नावनोंदणी.

वविला registered मायबोलीकर आणि त्यांचे कुटुंबीय (पती/पत्नी/मुले) येऊ शकतात.

नावनोंदणी करण्यासाठी इथे टिचकी मारा. टिचकी मारल्यानंतर येणार्‍या नोंदणी फॉर्ममध्ये दिलेली सर्व माहिती भरणे आवश्यक आहे.

नावनोंदणीची अंतीम तारीख आहे २० जुलै २०१३.

नावनोंदणीचे काम पूर्ण झाले की पुढचे महत्त्वाचे काम म्हणजे पैसे जमा करणे.

वर्षाविहार-२०१३ ची वर्गणी आहे :

मुंबईसाठी :-

प्रौढ आणि दहा वर्षावरील मुले : रु. ७५० /-प्रत्येकी. (रिसॉर्ट : रु. ४५०, बस : रु. २५०, इतर खर्च : रु. ५०)

मुले (वय ५ ते १० वर्षे) : रु. ३५०/- प्रत्येकी. (रिसॉर्टः रू.३५०, )
*बसमध्ये या मुलांसाठी बसायला स्वतंत्र जागा हवी असेल तर बसचे २५०रु. जास्तीचे भरावे लागतील.
बसमध्ये स्वतंत्र जागा हवी आहे की नाही यासाठी नोंदणी फॉर्ममध्ये माहिती दयावी.


पुण्यासाठी:-

प्रौढ आणि दहा वर्षावरील मुले : रु. ९०० /-प्रत्येकी. (रिसॉर्ट : रु. ४५०, बस : रु. ४००, इतर खर्च : रु. ५०)

मुले (वय ५ ते १० वर्षे) : रु. ३५०/-प्रत्येकी (रिसॉर्ट : रु. ३५०)
*बसमध्ये या मुलांसाठी बसायला स्वतंत्र जागा हवी असेल तर बसचे ४००रु. जास्तीचे भरावे लागतील.बसमध्ये स्वतंत्र जागा हवी आहे की नाही यासाठी नोंदणी फॉर्ममध्ये माहिती दयावी.

(पुणे आणि मुंबई यांच्या बसच्या खर्चातला फरक हा पुण्यापासून वविच्या ठिकाणाचे अंतर मुंबईपेक्षा जास्त असल्यामुळे आणि प्रति कि.मी.चा पुण्याच्या बसचा दर मुंबईच्या बसच्या दरापेक्षा जास्त असल्यामुळे आहे.वविला येणारे सर्व पुणेकर मायबोलीकर हे नक्की समजून घेतील अशी खात्री आहे.)

नाशिकसाठी:-

प्रौढ आणि दहा वर्षावरील मुले : रिसॉर्ट : रु. ४५०+ इतर खर्च : रु. ५०

मुले (वय ५ ते १० वर्षे) : रु. ३५०/-प्रत्येकी (रिसॉर्ट : रु. ३५०)

नाशिककरांचा प्रवासखर्च अजून ठरलेला नसल्यामुळे तो नंतर जाहीर करण्यात येईल.

५ वर्षांपर्यंतच्या मुलांना काहीही शुल्क नाही. (फक्त बसमध्ये बसायला जर या मुलांसाठी स्वतंत्र जागा हवी असेल तर बसचा खर्च फक्त करावा लागेल. बसमध्ये स्वतंत्र जागा हवी आहे की नाही यासाठी नोंदणी फॉर्ममध्ये माहिती दयावी.)

रिसॉर्ट च्या खर्चात सकाळचा चहा नाश्ता , दुपारचे जेवण , संध्याकाळी चहा स्नॅक्स यांचा आणि रिसॉर्टमधील सुविधांचा (स्विमींग पूल, रेन डान्स इ.) समावेश आहे.

वरील प्रवास खर्च हा मुंबईहून आणि पुण्याहून प्रत्येकी ५० माणसांप्रमाणे धरला आहे. लोकसंख्या कमी झाल्यास नोंदणी करणार्‍या सभासदांना प्रवास खर्च कदाचित थोडा जास्त येऊ शकतो ( तो खर्च माणसांच्या संख्येवर अवलंबून आहे.) त्यामुळे लवकरात लवकर नोंदणी करा.

(इतर खर्चामधे सांस्कृतिक कार्यक्रमासाठी लागणार्‍या खर्चाचा अंतर्भाव आहे.)

पुणे , मुंबई आणि नाशिक येथे २१ जुलै २०१३ या एकाच दिवशी वविचे पैसे जमा केले जातील.

वविचे पैसे जमा करण्याचे ठिकाण,दिवस आणि वेळ खालीलप्रमाणे:-

पुणे - स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीटखिडकीशेजारील कट्टा. वेळ: २१ जुलै २०१३, सं. ५.३० ते ८.००
मुंबई - स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात. वेळ: २१ जुलै २०१२, सं. ५.३० ते ८.००
नाशिक - इथला तपशील लवकरच देण्यात येईल.

समजा पैसे भरून जर आयत्यावेळी काही कारणाने वविला येणं रद्द केलं गेलं तर बसचे भाडे वजा करून उरलेले पैसे परत करण्यात येतील.

स्वतंत्र येणार्‍यांनी बसभाडे देण्याची अर्थातच गरज नाही.

ऑनला‌ईन पैसे भरणार्‍यांना ज्या अका‌ऊंटमध्ये पैसे भरायचे आहेत त्याची सर्व माहिती ईमेलने कळविली जाईल.जे बँक डिटेल्स ऑनलाईन ट्रान्सफरसाठी दिले जातील, त्या अकाऊंटमध्ये कृपया कॅश डिपॉझिट करु नये.

ऑनलाईन पैसे भरणार्‍यांनी २१ तारखेपर्यंत कधीही पैसे भरले तरी चालतील. प्रत्यक्ष पैसे भरणार्‍यांना २१ तारखेला पैसे द्यायला येणे काही कारणांनी शक्य नसेल त्यांनी त्या त्या शहरातील वविसंयोजकाना फोन करून २१च्या आधी भेटुन पैसे दिलेत तरी चालतील.

२१ तारखेपर्यंत पैसे आलेत नाहीत तर मात्र नाईलाजास्तव केलेली नोंदणी रद्द करावी लागेल.

मुंब‌ई, नाशिक आणि पुणे सोडुन इतर ठिकाणच्या तसेच भारताबाहेरील कोणालाही वर्षाविहारास येणे शक्य असेल तर त्यांनी जरूर यावे.

वर्षाविहार-२०१२ संयोजन समिती :

नाशिक -
१. विदीपा - विजय दिनकर पाटील (९८८१४९७१८७)

पुणे -
१.मयूरेश - मयूरेश कंटक (९९२२४०१७७८)
२.मल्लीनाथ - मल्लीनाथ करकंटी.
३.दक्षिणा - दिप्ती जोशी

मुंबई -
१.घारुआण्णा - संदिप खांबेटे (९८१९९९३६३४)
२.गीतांजली - गीतांजली आचार्य.
३.आनंद्सुजु - आनंद केळकर
४.बागुलबुवा - अमित देसाई

वर्षाविहार जागेबाबत :-
विसावा रिसॉर्ट,
सरळगाव, मुरबाड, ठाणे जिल्हा.
http://www.visawaresort.com/ या दुव्यावर विसावा रिसॉर्टची अधिक माहिती मिळू शकेल.

आपल्याला काही शंका असल्यास आपण या बाफवर वविसंयोजकांना मेसेज टाकू शकता.

वविची रुपरेषा साधारण अशी असेल......

सकाळी ९.३० वाजेपर्यंत नाशिक ,पुणे व मुंबईच्या बसेस रिसॉर्टवर पोहोचतील
सकाळी ९.३० ते १०.३० न्याहारी
१०.३० ते १२.३० स्विमिंग पूल आणि रेन डान्स मधे धम्माल मस्ती. शिवाय रिसॉर्ट मधे काही अ‍ॅडव्हेंचर अ‍ॅक्टीव्हिटीज आहेत.( वरील खर्चात समाविष्ट )
१२.३० ते २.०० जेवण
२.०० ते ३.०० गप्पाटप्पा आणि वामकुक्षी
३.०० ते ४.३० सा.स. मनोरंजन
४.३० वाजता चहा व स्नॅक्स
५.३० वाजता जड अंत:करणाने आपापल्या शहरात नेणार्‍या बस मधून प्रयाण.

मुंबईच्या बस रुटची माहिती खालील प्रमाणे:-
१) बस बोरिवली स्टेशन पूर्व ६.०० am (ह्या स्टॉपकरता श्री. विनय भिडे ह्यांच्याशी ९८२०२८४९६६ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.)
२) काशिमिरा ६.३०
३) ठाणे

पुणे बस रुटची माहिती खालील प्रमाणे:-
१) बस राजाराम पूल (सिंहगड रोड) येथून सुटेल वेळ - ५.०० am (ह्या स्टॉपकरता श्री. मयूरेश कंटक ह्यांच्याशी ९९२२४०१७७८ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.)
२) डिपी रोड कॉर्नर(आशिष गार्डन,कोथरुड) - ५.१५ am
३) किनारा हॉटेल (पौड रोड) - ५.३० am
३) गुडलक चौक (डेक्कन ) - ५.४५ am
४) नाशिक फाटा- ६.१५ am

(वि.सू-पुण्याच्या लोकांना यावेळेस जरा जास्त प्रवास करायला लागणार असल्याने वविला वेळेत पोहोचुन वविचा आनंद घेऊन वेळेत पुण्यात परत येण्याच्या दृष्टीने हे सर्व प्लॅनींग केलेले आहे. वविला जातानाची वेळ जरा लवकर आहे पण कृपया ती पाळावी ही विनंती. :))

मुंबई रुट संदर्भात काही शंका असल्यास कृपया श्री विनय भिडे आणि पुणे रुट साठी मयूरेश कंटक ह्यांना फोन करुन संपर्क साधावा.

प्रत्येकाने वेळेपूर्वी किमान १० मिनीटस आपापल्या बसथांब्यावर उपस्थित रहाणे आवश्यक आहे.

सर्वांनी कृपया आपला थांबा आणि बरोबर येणार्‍या मंडळींची नावे इ. माहिती ववि नोंदणी फॉर्ममध्ये व्यवस्थित भरावी. ही माहिती वाहतूक कंत्राटदाराला परवान्यासाठी देणे आवश्यक असते.

सूचना: रिसॉर्ट मधे पाण्यात उतरताना पोहोण्याचा पोषाख असणे आवश्यक आहे. (महिलांसाठी: पोहोण्याचा पोषाख नसल्यास टेरिकॉट/नायलॉन मटेरिअलचे लेगिंग्ज आणि टि शर्ट चालतील) पाण्यात उतरताना शक्यतो कॉटनचे कपडे/ जीन्स वगैरे गोष्टींना परवानगी नाही )

तर मायबोलीकरांनो हा सोहळा चुकवू नका . नाशिक ,मुंबई आणि पुण्याचे मायबोलीकर एकत्र भेटण्याचे हमखास ठिकाण म्हणजेच वर्षा विहार ... Happy

विशेष सूचना:- ववि नावनोंदणी केल्यावर तुम्हाला आपोआप एक मेल येईल ज्यात तुम्ही दिलेली माहिती आणि सगळ्यात खाली तुमच्या वविनावनोंदणीची लिंक असेल.त्या लिंकमार्फत तुम्हाला तुमची माहिती कितीही वेळा बदलता येईल. ६ जुलैनंतर तुम्हाला ती माहिती बदलता येणार नाही. एकदा नावनोंदणी करून माहितीत परत बदल केलात तर मेल येणार नाही. जर पहिली नावनोंदणी करतानाच मेलबॉक्समध्ये मेल आली नसेल तर स्पॅम फोल्डर पहा. बर्‍याच वेळा मेल तिथे जाते.

आता या वेळच्या वविच्या ठिकाणाची फोटोरूपी एक झलकः

IMG_7910.JPGIMG_7984.JPGIMG_8052.JPGIMG_8053.JPGIMG_8073.JPGIMG_8127.JPGadv1.jpgadv2_0.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता या वेळच्या वविच्या ठिकाणाची फोटोरूपी एक झलक <<
ओ काय संयोजक.. आम्ही वविला येणार नाही म्हणून आम्हाला झलकीचे फोटो पण दाखवणार नाही की काय? Wink

मज्जा करा रे सगळेजण...

व्वा मस्त , मजा करा लोक्स !
वविला registered मायबोलीकर आणि त्यांचे कुटुंबीय (पती/पत्नी/मुले) येऊ शकतात. >>> संयोजक असा भेदभाव करु नका , एखाद्याला / एखादीला , गर्लफ्रेंड / बॉयफ्रेंडला आणायचं असेल तर. Wink Proud

फोटो परत टाकण्यात येतील..

संयोजक असा भेदभाव करु नका , एखाद्याला / एखादीला , गर्लफ्रेंड / बॉयफ्रेंडला आणायचं असेल तर...>> गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड त्याच्या किंवा तिच्या कुटंबाचा सदस्य असेल तर काहीच हरकत नाही.. फक्त पुरावा सादर करावा लागेल तसा.. Proud

आता 'वसुधैव कुटुंबकम' चा फंडा फेकतील लोक.....>>> पण रेशनकार्डवर नाव पाहिजे ना वसुधेवरच्या सर्व कुटुंबीयांचे.. Happy

अत्यंत नियोजनबद्ध कार्यक्रमाबद्दल ववि संयोजकान्चे कौतुकाला शब्द-विशेषणे अपुरी पडताहेत. Happy
वविला मनःपूर्वक शुभेच्छा.

यन्दाचा नोंदणी फॉर्म झकास, प्रेमात पडावा असा.
वविच्या घोषणेमधे आवश्यक सर्व तपशील रितसर दिला आहे. कुठे शन्केला जागाच नाही.

मला एक सांगा, मी तो विसावावाल्यांचा नकाशा बघितला, त्याप्रमाणे पुणे ते नाशिक रस्त्यावर आळेफाट्याला डावीकडे वळून पुढे ४४ किमि अंतरावर उजव्या हाताला ठिकाण आहे का? पुणे ते आळेफाटा अंतर किती आहे?

मुंबईच्या बस बाबतीत ,

वर मार्ग थोडा संक्षिप्त स्वरुपात दिला आहे. या वेळेस मार्ग वेगळा असल्याने पिक अप स्पॉटस नक्की केलेले नाहियेत.

सद्ध्या नोंदणी करताना कोणताही एक तुमच्या घराजवळचा निवडा. शिवाय वर दिलेला मार्ग ह लोकांच्या सोयीने बदलता येण्यासारखा आहे.
नंतर त्यात सुधारणा करता येइल.

विनय आणी मयुरेश हा धागा मेन पेज वर टाकता येइल का टी शर्ट च्या बाजुला....
असाच सांस चाही मेन पेज वर केला तरी चालेल

ओह्हो विसावा रिसॉर्ट!!!!
सह्ही जागा आहे, मी दोनदा जाऊन आलो आणि आता तिसर्‍यांदापण येणार. Happy

स्विमिंग पूल, बेबी पूल, कृत्रिम धबधबा, रेन डान्स, इनडोअर गेम्स, चमचमीत जेवण, गुलाबांच्या फुलांची बाग आणि भरपूर काही Happy

काही अंतरावर नदीसुद्धा आहे. यावेळी मोठ्ठा रोप घेऊन जावा लागेल. गिरी, Wink

करुया आता कल्ला कल्ला कल्ला!!!!

गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड त्याच्या किंवा तिच्या कुटंबाचा सदस्य असेल तर काहीच हरकत नाही.. फक्त पुरावा सादर करावा लागेल तसा..
>>
कर्म, आता हा पुरावा कसा काय सादर करणार?? Proud

धम्माल करा सगळ्यांनी आणि फोटो टाकाच.

गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड त्याच्या किंवा तिच्या कुटंबाचा सदस्य असेल तर काहीच हरकत नाही.. फक्त पुरावा सादर करावा लागेल तसा..>>>>>>सापुचा एखादा फोटो चालेल का? Wink

मी दोनदा जाऊन आलो आणि आता तिसर्‍यांदापण येणार.>>>>>>>>>>> नाही आलास तर वविच्या सकाळीच तुझ्या घरी येऊन तुझा गोSSSS विंदा रे गोपाळा.....झालाच म्हणुन समज Proud

जिप्स्याचं केळवण का वविमधे? डोळा मारा
जिप्सी, उखाणा घ्यावा लागेल, तयारी करून ये >>>>>>>>>>>>> संकल्पना चांगली आहे Proud

फक्त पुरावा सादर करावा लागेल तसा>> त्यपेक्षा ज्याना घेवुन यायचं आहे त्यांनाच माबोचे सदस्यत्व घ्यायला लावा की लोखो.... Happy

Pages