मागे कधीतरी अमृता सुभाष नि केलेलं टोकियो स्टोरी ह्या चित्रपटाचं परीक्षण वाचलं होतं. बहुतेक लोकसत्ता मधे. ते वाचल्यावर वाटायला लागले की बघावा हा चित्रपट कधीतरी.
साधारणपणे समीक्षकांनी फार कौतुक केलेले पिक्चर्स बघायला मला जरा भीतीच वाटते. एखादे उदास, अंधारलेले घर, कुठेतरी भिंतीवरच्या पालीवर कॅमरा झूम केलेला, मागे घड्याळ तरी टिक टिक करणार नाहीतर आगगाडीची धडधड तरी... आणि दर दोन डायलॉग्स मधील अगदी असह्य वाटणारा तो लांबलचक आकवर्ड पॉज़. काहीच्या काहिच......
असो, पण अमृताच्या लेखावरून तरी वाटत होते की हा चित्रपट तसा नसावा. आणि खरंच, हा चित्रपट बघितल्यावर काहीतरी छान बघितल्याचे समाधान मिळाले.
सुभाषित आस्वाद [१] :[अ] ऋणं कृत्वा घृतं पिबेत् [ब] वक्ता श्रोताच दुर्लभ:
[अ] ऋणं कृत्वा घृतं पिबेत्
'ऋणं कृत्वा घृतं पिबेत्' हे लिहिले/ऐकले जाणारे एक लोकप्रिय वचन. ते ज्यात आहे ते मूळ काव्य असे :-
ऋणं कृत्वा घृतं पिबेत् | यावत् जिवेत सुखम् जिवेत ||
भस्मीभूतस्य देहं च, पुनरागमनं कुतः ||
अर्थ- जोवर जिवंत आहात तोवर (अगदी) सुखाने जगा. (त्यासाठी वाटल्यास) कर्ज काढा
(पण) तूप प्या(च). (कारण अग्नीने ) राख केलेला देह परत मिळणार आहे काय?
हां... ये रसमें ये कसमें सभी तोड के,
तु चली आ चुनर प्यार की ओढ के |
या चला,....जाऊंगा,...मै ये जग छोड के |
सात्वीक प्रेमानं भरलेल्या, र्हुदयाच्या एका खोल खोल तळापासून आलेली ही हाक, संवेदनशील मनाला भाव व्याकुळ केल्याशिवाय रहात नाही. हे शब्द आहेत आनंद बक्षी यांचे, ज्यानी बॉलिवुड्च्या दुनियेला पुराणी यादें
म्हणुन तिन हजाराहून अधिक गाणी दिली. आणि दर्दभरा स्वर ज्याच्या प्रवाहात ए॓कणारा प्रत्यकजन पुर्णपणे
नाहूण निघेल तो म्हणजे मुकेश यांचा. ( चित्रपट - कटीपतंग)
जिस जगा याद तेरी सताने लगे,
उस जगा एक पल भी ठेहेरना नही |
जिस गलीमें तेरा घर ना हो बालमां,
कधी कधी सगळं कही अगदी झक्कास असत.छानसी संध्याकळ होऊन निळ्या
आकाश्याच क्षितिज केशराच्या तेजस्वी रंगाने मखलेलं असत.बावरी सांज चोरट्या पवलांनी चालत येऊ लागते,
आणि अंगाला सुखद स्पर्श करनारा मंद वारा वहत असतो.आशा शांत वातावरणात कुठेतरी ऊंच झोके घेणार्या
पक्षांचा आवाज नाहीतर रानपाखरांची किलबिल ही ए॓कू येते.
असं सारं कही गोड- मनोहारी असतं. पण तरी उगाचच मनात कुठूनशी ए॓क हुरहूर दाठून येते.निळ्या शांत
जलाशयावर वार्याच्या स्पर्शाने तरंग उठावेत तसं मनात काहीसं हलू लागत.आणि वाटतं खरंच आशा वेळी आता
तुम्हाला गाणी ए॓कणं आवडत असेल व कोणी विच्यारले कि बाबा तुला गाणी का आवडतात? तर काय ऊत्तर द्याल? तुमचं माहीत नाही पण मी तर म्हणेन, मला गाणी आवडतात कारण मला
या जगाच्या पाठीवर कुठेच नसेल अशी ए॓क आनंदयात्रा करायला मिळते.
खरंच शब्द- ताल- आणि सूर या त्रिवेणीच्या संगमातून ऊसळणार्या लाटेवर आपलं मन स्वार होतं.आणि ए॓का
अनोख्या आनंदाच्या प्रवासाला निघतं.पण आवड म्हणून गाणी ए॓कणं आणि आवडीच्या गाण्यातून आनंदाचा प्रवास
करणं यात खूप मोठा फरक आहे.नाहीतरी आजच्या रिमिक्सच्या जमान्यात आवडीनं रोज बेंड-बाज्या ए॓कणारे
खूप असतात. त्याला गाणं ही तसच आशयगर्भ असावं लागत.
लहानपणी अनेकांनी एक प्रश्न विचरला असेल किंव्हा ए॓कला असेल..हीथेच आहे पण दिसत नाही सांगा काय?
......ऊत्तर - वारा.! ए. आर. रेहेमानच्या बाबतीत माझंही असच या न दिसणार्या वार्यासारख झालं.
त्याची कितीतरी गाणी माझ्या कानावरून गेली असतील. पण त्याच्या वेगळेपणाकडे कधी लक्षच गेल नाही.
कदाचीत दोष माझ्या कानांचा असेल. परन्तू डॅनी बोयलचा Slum dog millionaire प्रदर्शीत झाला आणि
रेहेमानला अॅस्कर मिळाले. तेंव्हापासून माझ्या कानांचे काटकोण झाले आणि संगीताच्या दुनियेत सावजासारखे
फिरू लागले......दिल से रेSssssssssssss........! अन्तकरनातून उमठलेली ए॓क आरोळी काळजाला जाऊन भीडली.
आज कालच्या युवा पिढीला जुने चित्रपट - जुनी गाणी फारशी माहीत नसतात. रिमीक्स, डि.जे. च्या ग्ल्यॉमर
दुनियेत सारेजन गुरफटुन जात आहेत. परन्तु अनेक जुने भारतीय चित्रपट याच ग्ल्यॉमर दुनियेला आज देखिल
पुन्हा आठवल्या शिवाय रहात नाहीत. कारण ते आहेत काळाच्या पडद्यावर बांधलेले अप्रतिम सरताज.....
असच एकदा "दो आखें बारह हाथ" हा व्ही. शान्ताराम यांचा चित्रपट पहात होतो. कुठेतरी वाचल होत चांगला
आहे म्हणुन. पण डोळ्यांना रंगीत ग्ल्यॉमरची सवय, आणि ब्लॅक एन व्हाइट पहाताना ते सुरुवतिलच थकले.
ना. धों महानोर ह्यांचा मी वेगळा परिचय करुन द्यायची काहीच गरज नाही. महानोरांच्या कविता ह्या मुख्यतः निसर्गाशी संबंधित असतात. कवि आपल्या लेखनीतून निर्सगाचे त्याला भावलेले वर्णन वाचकापर्यंत नुस्ते पोहचवतच नाही तर त्यांना आपल्या सोबत त्याचा भावविश्वात घेउन जातो. त्यांचा कविता वाचताना आपल्यातील एका वेगळ्याच "मी" ची जाणिव झाल्याशिवाय राहत नाही. हा "मी" जसा निसर्गाच्या वर्णनाने आंनदतो तसाच तो अंतर्मूख झाल्याशिवाय राहत नाही.
लॉर्ड ऑफ द फ्लाईज
- लेखक विल्यम गोल्डींग