मौसम है आशिकाना....!

Submitted by सुधाकर.. on 7 June, 2012 - 11:59

धी कधी सगळं कही अगदी झक्कास असत.छानसी संध्याकळ होऊन निळ्या
आकाश्याच क्षितिज केशराच्या तेजस्वी रंगाने मखलेलं असत.बावरी सांज चोरट्या पवलांनी चालत येऊ लागते,
आणि अंगाला सुखद स्पर्श करनारा मंद वारा वहत असतो.आशा शांत वातावरणात कुठेतरी ऊंच झोके घेणार्‍या
पक्षांचा आवाज नाहीतर रानपाखरांची किलबिल ही ए॓कू येते.
असं सारं कही गोड- मनोहारी असतं. पण तरी उगाचच मनात कुठूनशी ए॓क हुरहूर दाठून येते.निळ्या शांत
जलाशयावर वार्‍याच्या स्पर्शाने तरंग उठावेत तसं मनात काहीसं हलू लागत.आणि वाटतं खरंच आशा वेळी आता
कुणीतरी आसायला हवं होतं. कोणीतरी.....! आपल्या आवडीचं, अगदी आपल्या र्‍हुदयाच्या जवळच.शतजन्मातून
ए॓कदा भेटणारं तरी आपल्यावर मनोमन असं प्रेम करणारं.
पण असं फक्त वाटत रहातं. जवळ कोणीच नसतं.मन वार्‍याच्या झुळकीप्रमाणे दिशाहीन होतं.आपण स्वतःला
सावरू पहातो.अशा गोड संध्याकाळी कोणीतरी असावं असं वाटत असतं पण कोणी ही नसतं हे सत्य मनोमन जाणुन
ते विसरण्यासाठी आपण हळुहळू कहीतरी गुणगूणु लागतो, आणि मग ए॓काकी विरहातून आपल्याला स्वप्नांच्या
नगरीत न्हेणारी स्वरांची पायवाट सापडते.......

मौसम है आशिकाना
ए॓ दिल कहीसे उनको
ए॓सेमें ढुंड लाना |
मौसम है आशिकाना...............||

मधाचा गोडवा असलेला, लता या गानकोकीळेचा आवाज, नौशाद- गुलाम मोहम्मद चं संगीत आणि कमल
आमरोहीचे शब्द (चित्रपट-पाकिझा) आपल्या उदास मनाची साथ देऊ लागतात.

अशीच ए॓क एकाकी विरहात बुडालेली प्रेयसी आपल्या प्रियकराला घेऊन येण्यासाठी स्वःताच्याच मनाला
आळवतेय,.......

केहेना के ॠत जवां है
और हम तरस रहे है
डर है ना मार डाले
सावन का क्या ठिकाना
मौसम है आशिकाना.................||

खरं तर गीत लेखन ही ए॓क गीतकाराला मिळालेली दैवी देणगीच असते हा प्रत्यय आशाच काही आशयातून
कधी अचनक पहयला मिळतो,
तुमको पुकारते है
ये गेसूओं के साये
आ जाओं मै बना लु
पलकों का शामियाना
मौसम है आशिकाना...................||
पलकों का शामियाना बनवणारी ही प्रेयसी, आपल्या जीवन साथीवर किती तरी प्रेम करत असेल,..नाही?

Pakeezahaudio.jpg

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

नमस्कार,

ललित वाचण्याआधीच

मराठी - मोसम

हिंदी - मौसम

Happy

कृगैन

ललित वाचतो आता

केहेना के ॠत जवां है
और हम तरस रहे है
काली घटा के साये
बिरहन को डस रहे है..
डर है ना मार डाले
सावन का क्या ठिकाना
मौसम है आशिकाना.................||
खुप सुरेख गाण आहे हे..कसलीतरी अनामिक हुरहूर लावणार..

वाल्या कोळी, बेफिकीर्,महेश,कुसूमिता,योगुली आणि अनघा - तुम्हा सर्वांचे खुप खुप आभार.

मला या गाण्यातले एक कडवे खुप आवडते,

फिरते है हम अकेले, बाहोंमे कोई लेले (हे आडनाव नाहीये) !
आखिर कोई कहाँतक तनहाईयोंसे खेले !

यातली गुलाम मोहम्मद यांची गाणी कुठली आणि नौशाद यांची कुठली? की नौषद यानी फक्त तयार असलेल्या चालींच्चे संगीत संयोजन तेवढे केले.. नेमके काय झाले होते?

छान लिहीले आहे, गाणे माझेही अत्यंत आवडते आहे.

(हे आडनाव नाहीये) !>>> Lol

हे नक्कीच गुलाम मोहम्मदचे असावे. संगीतात वेगळा इफेक्ट आहे नौशादपेक्षा.

१) चलो दिलदार चलो- गुलाम मोहम्मद
२)चलते चलते - गुलाम मोहम्मद
३) इन्ही लोगोंने - गुलाम मोहम्मद
४) मौसम है आशिकाना - गुलाम मोहम्मद
५) नजरींयां की मारी - नौशाद
६) तेरी ये नजर - गुलाम मोहम्मद
७) थारे रहीयों - गुलाम मोहम्मद
८) मोरा साजन - नौशाद
९) पी के चले - गुलाम मोहम्मद
१०) टायटल मुझिक व आलाप - नौशाद