या विभागातील हा माझा पहिलाच धागा. या विभागाचे सदस्यत्वही आजच ताजेताजे घेतले आहे.
एका सुंदर जागी गेल्याने काही सुंदर फोटो काढायचा योग आला म्हणून धागा काढण्याची संधी घेतोय.
जागेचे नाव आहे - माळशेज घाट
नशीबवान आहेत ते लोकं ज्यांच्या गावाला जायचा रस्ता माळशेज घाटातून जातो.
आजवर कधी गेले नसल्यास आवर्जून भेट द्या..
खालीलपैकी कुठले छायाचित्र आवडले हे देखील आवर्जून कळवा.
काही फोटो मित्रांनी काढलेले आहेत, त्यांचे आवडल्यास त्यांना कळवतो.
१
अचानक शुक्रवारी दुपारनंतर माळशेज घाटाची जुणी वाट करायचे ठरले. सध्या वापरात असलेला आताचा माळशेज गाडी मार्ग नसताना पुर्वीच्या काळी याच वाटेने ये जा केली जाई. तसेच मराठ्यांच्या वसई मोहिमेत याच पुरातन घाटाने खाली कोकणात कल्याण भिवंडीकडे सैन्य गेल्याचे ऐकिवात आहे.
पावसाचे प्रमाण तसे कमीच, चला तर पावसाचा परतीचा प्रवास सुरू झालाच आहे तर या ऊन पावसाच्या खेळात रानफुले पहात मनसोक्त फोटोग्राफी करू असा हि मनसुबा होताच.
प्रचि १:
प्रचि २: सरळगाव
प्रचि ३: भैरवगड
प्रचि ४: माळशेज
रविवारची पहाट बर्याचजणांना माहीतच नसते.. रविवार उजाडावा तरी कसा.. तर डोळे उघडतील तेव्हा सूर्यदेवाची किरणे प्रखर झालेली असतील.. भलामोठा आssळस अशे अनेक आळस देत उठायचे.. घडयाळाकडे ढुंकूनही नाही बघायचे.. आज कसलीच घाई नाही म्हणत टिव्ही लावून वृत्तपत्र चाळत बसायचे.. चहाचे घुटके अगदी दिमाखात घेत किचनमध्ये तयार असलेल्या नाश्त्याचा अंदाज घ्यायचा इति इति...