माळशेज घाट - महाराष्ट्राचा स्वित्झर्लंड

Submitted by ऋन्मेऽऽष on 5 August, 2021 - 16:32

या विभागातील हा माझा पहिलाच धागा. या विभागाचे सदस्यत्वही आजच ताजेताजे घेतले आहे.
एका सुंदर जागी गेल्याने काही सुंदर फोटो काढायचा योग आला म्हणून धागा काढण्याची संधी घेतोय.
जागेचे नाव आहे - माळशेज घाट
नशीबवान आहेत ते लोकं ज्यांच्या गावाला जायचा रस्ता माळशेज घाटातून जातो.
आजवर कधी गेले नसल्यास आवर्जून भेट द्या..
खालीलपैकी कुठले छायाचित्र आवडले हे देखील आवर्जून कळवा.
काही फोटो मित्रांनी काढलेले आहेत, त्यांचे आवडल्यास त्यांना कळवतो.


m01.jpg


m02.jpg


m03.jpg


m04.jpg


m05.jpg


m06.jpg


m07.jpg


m08.jpg


m09.jpg

१०
m10.jpg

११
m11.jpg

१२
m12.jpg

१३
m13.jpg

१४
m14.jpg

१५
m15.jpg

१६
m16.jpg

१७
m17.jpg

१८
m18.jpg

१९
m19.jpg

२०
m20.jpg

२१
m21.jpg

२२
m22.jpg

२३
m23.jpg

धन्यवाद
ऋन्मेष Happy

जर येथील विडिओ बघावासा वाटला तर खालील लिंकवर बघू शकता
Dosti Lakewood Resort, Malshej Ghat - https://www.youtube.com/watch?v=Gl08p985q2U

जर या सहलीचे वर्णन वाचायचे असेल तर खालील लिंकवर वाचू शकता
एका माणूसघाण्याची पिकनिक - https://www.maayboli.com/node/79682

पुन्हा एकदा,
धन्यवाद
ऋन्मेष Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय सही आहे! खरंच कधी जमेल तेव्हा जायला हवं. ४, ५, ८,२२ नंबर फोटो काढणार्‍या मंडळींना आवडले सांगू शकता.

फोटो नं १ इंफीनिटी पूल Uhoh भारतात पण आलं का ते फॅड....

माळशेज घाट आणि धबधबे कुठे आहेत?
हे फक्त खुबी फाटा ते एमटीडीसी घाटमाथा इथल्या हॉटेलचे फोटो आहेत. पिंपळगाव धरण दिसतंय. हॉटेलचा कृत्रिम पूल कुठे आणि घाटातले धबधबे कुठे!! शिवाय एमटिडीसी आवारातल्या रेलिंगवरून खालची दरी,बाजुची हरिश्चंद्रगडाची शिखरं फार सुंदर दिसतात.
घाट उतरून पार टोकावडेपर्यंत गेलात तर चांगली दृष्ये दिसतील.
---------
पहिलाच प्रयत्न आहे म्हणून जाऊ दे.

सगळीच प्रचि देखणी. आम्ही भाग्यवान. आमचा गावी जाण्यायेण्याचा रस्ता. दुचाकीवरुन भरपूर ठिकाणी भटकंती झाली आहे. वर्णन आणि आभासी सैर दाखविल्या बद्दल आभारी.

माळशेज घाट म्हणून जरा जास्तच अपेक्षा ठेवल्या असतील मी कदाचित पण अजून जास्त आणि वेगळे फोटो बघायला आवडले असते.
हे फक्त त्या रिसॉर्ट संबंधी फोटोच वाटताहेत.

रचाकने तुझ्या मित्रांना नक्की सांग फोटो त्यांनी काढलेले फोटो आवडले म्हणून Wink Proud

@रश्मी, विडिओ चांगला होता पण त्यांनी घाटाच्या तळापर्यंत काढला नाही.
मी या वाटेने दोनदा (१० किमी) घाट चालत गेलो आहे.

वातावरण फारच मस्त दिसतंय. छान आलेत फोटो. मित्रांना सांगा.

इंफिनिटी पूलाच्या कठड्याला निळ्याऐवजी हिरवट किंवा शेवाळी रंग असता तर तो खरंच इंफिनिटी पूल वाटला असता. त्या मालकांना नक्की कळवा. जसं पाणी तसा रंग पाहिजे.

SRD आणि हर्पेन हो, घाटातले धबधबे पुढच्या वेळीसाठी आणि दुसर्‍या भागासाठी ठेवले आहेत.
यावेळी प्रवासात गाडी थांबवून ते टिपता आले नाहीत.
तसेही माळशेज म्हटले की दरी डोंगर धबधबे आलेच. हे जरा वेगळ्या लोकेशनवरून टिपलेले समजा Happy

वरच्या विडिओसारखा कार वर कोसळणार्‍या पाण्याचा विडिओ आमच्यातही एकाने काढलेला.
पण माळशेज म्हटले की दरडी कोसळण्याची भिती. त्यामुळे कुठे थांबायचे नाही हे आमचे ठरलेले.
अन्यथा तिथेच धबधब्यात उतरून पिकनिक स्टार्ट करावी असे वाटत होते.

छान फोटो. दुसर्‍या फोटोतल्या टेबलवर बसून भज्या खायची इच्छा झाली. पहिला पण मस्त. १६वा म्हणजे एक बलाढ्य बाळ तोंड उघडून पावसाचं पाणी प्यायला सज्ज आहे असं वाटतंय.
धनुडी, मस्त आहे व्हिडिओ.

अप्रतिम फोटो.

हे मी रिलेट करू शकते. २००२ ते २००६, पावणेचार वर्षात अनेकदा श्रीरामपूर कल्याण आणि कल्याण श्रीरामपूर लाल डब्याने प्रवास केला, हा सर्व प्रवास माळशेज घाटातून केलाय त्यामुळे हे निसर्गसौदर्य याची देही, याची डोळा अनुभवलं आहे, आहाहा एकदम. ढग असे आपल्यासमोर उतरतात तेव्हा काय वाटतं, शब्दात वर्णन करणे कठीण. वरून खोल दिसणारी दरी, त्या खोलीचा अंदाज येतच नाही. ते धबधबे पण आठवतात.

तुम्ही सर्व Resort मध्ये राहिल्याने मी अनुभवलेलं बरंच फोटोत नाहीये पण तरीही आवडले.

परत करायला हवा तो प्रवास.

दुसर्‍या फोटोतल्या टेबलवर बसून भज्या खायची इच्छा झाली. >>>> त्या जागी एक्झॅक्टली हेच केले आम्ही Happy वर्णनाच्या धाग्यातही त्याचा उल्लेख केल्यावाचून राहावले नाही. पाऊस, वारा, धुकं, अगदी ढगांमध्ये बसल्यासारखे वातावरण आणि सोबत गरमागरम चहा आणि भजी आहाहा ! लक्षात राहणारा अनुभव

@ अन्जू, हे रिसॉर्ट मुंबईहून येताना माळशेज घाट ओलांडल्यावर येत असल्याने येता जाता तुम्ही म्हणता ते सारे प्रवासात अनुभवले. फक्त फोटो घ्यायला गाड्या थांबवल्या नाहीत तिथे मुद्दाम..

छान फोटो. मला फक्त नाव खटकलं. कारण माळशेज एव्हडा सुंदर आहे कि माझ्या एका स्वित्झर्लंड मित्राला मी इथे फिरायला घेऊन गेलो तेव्हा त्याने पण लेख लिहिला होता 'स्वित्झर्लंड - युरोपमधला माळशेज घाट ' या नावाने.

सगळेच फोटो खूप सुंदर आहेत.. मनाने जाऊन सुद्धा पोहोचले तिथे.. जुन्या आठवणी जाग्या झाल्या.. धबधब्यात भिजून आल्यावर कुडकुडत गरमगरम कांदाभजी खाल्लेली आठवली..

धन्यवाद मृणाली, श्रवु, राणी Happy
बोकलत Proud पण तो तुमचा मित्र फिरला माळशेज आणि लेख लिहिला त्याच्या राहत्या स्वित्झर्लंडवर.. त्यापेक्षा मी माळशेजच्या मीठाला जागत त्यावरच लेख लिहिला Happy

छानच फोटो आलेत. तुम्ही तिथं किती धमाल केली असेल याची कल्पना करवत नाही Proud

परंतु, मला असं वाटतं की अशा डोंगरावर असणार्‍या रिझॉर्ट्सच्या बांधकामांमुळे तिथली डोंगर उतारावरची जमीन सपाट केली जात असावी अन त्यानंतर मोठ्या पावसाने पाणी जिरल्यामुळे नंतर लँड्स्लईड्स होत असावेत.

Pages