शीघ्रकाव्य

शीघ्रकाव्य - चारोळ्यांच्या आरोळ्या : विषय ५ - "खाऊच्या आरोळ्या"

Submitted by संयोजक on 3 September, 2011 - 09:13

आधीच्या चारोळीत आपण आपल्या नावडत्या विषयावर आरोळ्या ठोकल्यात ना?

मग आता इथे संधी आहे ती आपल्या आवडत्या विषयावर आरोळ्या ठोकायला. जेवण हा विषय आपल्या सगळ्यांच्या आवडीचा. पण त्यातल्या त्यातही काही जास्त आवडणारे पदार्थ असतात. कोणाला पावभाजी आवडते, कोणाला श्रीखंड, तर कोणाला मॅगी!!!

कुरकुरीत काकड्या, लालभडक टोमॅटो
ताजे, लुसलुशीत ब्रेडचे स्लाईस
बटर अन चटणी चव वाढवाया
माझं व्हेज सँडविच व्हेरी नाईस!

काही का आवडेना, आपल्या आवडत्या पदार्थांची आठवण काढून आरोळ्या ठोकणार ना???

श्रीबालाजीचीसासू दिसताच
हसू येई चेहर्‍यावर
चारोळीला विषय तोंपासु
तर ताबा राहील का तोंडावर?

विषय: 

शीघ्रकाव्य - चारोळ्यांच्या आरोळ्या : विषय ४ - "शालेय आरोळ्या"

Submitted by संयोजक on 3 September, 2011 - 09:00

शालेय आरोळ्या

रसायनशास्त्राचं अजब रसायन
संयुगं, सल्फ्युरीक अ‍ॅसिड अन जमवा समिकरण
परीक्षानळी, चंचुपात्रात काय असतं ते?
द्रावण का रावण का द्रावण का रावण ... Proud

BOOKSTACK2.jpg

शाळेत शिकत असताना आपल्या 'रम्य त्या बालपणाच्या' स्वच्छंदी, आनंदी जीवनात आपल्याला छळणारे व्हिलन लोकं म्हणजे - बीजगणित, भुमिती, नागरीकशास्त्र, भूगोल, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, संस्कृत, जीवशास्त्र, इतिहास इ.इ. हे व्हिलनलोकं केवळ विद्यार्थ्यांनाच छळून थांबत नाहीत तर बरोबर पालक आणि शिक्षकांचीही धुलाई करतात .....

शीघ्रकाव्य - चारोळ्यांच्या आरोळ्या : विषय ३ - "नात्यातल्या आरोळ्या"

Submitted by संयोजक on 30 August, 2011 - 00:39

"नात्यातल्या आरोळ्या"

वसंतऋतू हा नात्यांमधला
कधी बदलतो शिशिरात
दोघांमधले नाते कसले
गुंफावे चारोळीत

काही नाती अशी असतात, की धरलं तर चावतं नि सोडलं तर पळतं... तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना! म्हणजे हेच बघा ना, नवर्‍याचं बायकोवर खूप प्रेम असतं, पण सासर्‍याबद्द्ल तेवढीच तक्रारही! आणि सासराही केवळ आपल्या लेकीकडे बघून शांत रहातो! आणि मग दोघांच्या मनातलं वादळ चारोळीत गुंफलं तर असं काहीतरी तयार होतं...

जावई :

people08c_0.gif

हिला पाहता माझ्या हृदयी

विषय: 

शीघ्रकाव्य - चारोळ्यांच्या आरोळ्या : विषय २ - "मुक्या आरोळ्या"

Submitted by संयोजक on 29 August, 2011 - 22:33

"मुक्या आरोळ्या"

'कधी वाटीभर दूध कधी कडक पोळी
कधी चुचकारशी, कधी काठी उगारशी...
बांधलीस जरी तु घंटा माझ्या गळी,
तरी आहे मी वाघाचीच मावशी...' Proud

cat.jpg

मंडळी, इथे तुम्हाला लिहायच्या आहेत पाळीव प्राणी / पाळीव पक्षी / पाळीव जलचर यांनी केलेल्या आरोळ्या...

blue-bird-clip-art.jpg

टीप: नवरा हा पाळीव प्राणी नाही आणि बायको ही गरीब गाय नाही Proud

******************************************

विषय: 

शीघ्रकाव्य - चारोळ्यांच्या आरोळ्या : विषय १ - "विस्थापितांच्या आरोळ्या"

Submitted by संयोजक on 29 August, 2011 - 21:14

"विस्थापितांच्या आरोळ्या"

'लिटर लिटर पाणी तापवले
आता ना दिसे एकही थेंब...
अडगळीच्या खोलीमधे
पडलोय मी उघडा बंब...' Proud

मंडळी, इथे लिहायच्या आहेत तुम्हाला आरोळ्या... विस्थापितांच्या... हे विस्थापित आहेत....

पाणी तापवायचा बंब,
टंकलेखक - टाईपरायटर,
आंतर्देशीय पत्र - इनलँड लेटर,
फिरकीचा तांब्या आणि
एक अथवा दोन रुपयांची नोटं

Charoli 1.jpg

******************************************

सर्वसाधारण नियम:

१. ही स्पर्धा नाही. हा एक खेळ आहे.

विषय: 
Subscribe to RSS - शीघ्रकाव्य