"विस्थापितांच्या आरोळ्या"
'लिटर लिटर पाणी तापवले
आता ना दिसे एकही थेंब...
अडगळीच्या खोलीमधे
पडलोय मी उघडा बंब...'
मंडळी, इथे लिहायच्या आहेत तुम्हाला आरोळ्या... विस्थापितांच्या... हे विस्थापित आहेत....
पाणी तापवायचा बंब,
टंकलेखक - टाईपरायटर,
आंतर्देशीय पत्र - इनलँड लेटर,
फिरकीचा तांब्या आणि
एक अथवा दोन रुपयांची नोटं
******************************************
सर्वसाधारण नियम:
१. ही स्पर्धा नाही. हा एक खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०११' ह्या ग्रुपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. उत्सवादरम्यान एक दिवसाआड नवीन विषय दिला जाईल.
४. दिलेल्या विस्थापितांपैकी कुठल्याही एका विस्थापितावर तुम्हाला चारोळी करायची आहे.
५. दिलेल्या विस्थापितावर एका वेळेस, एकाच विस्थापितावर, एकच चारोळी टाकावी.
६. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा हा खेळ खेळू शकतो/ते, फक्त सलग दोन चारोळ्या देऊ शकत नाही.
******************************************
हवे तसे मला बदडुनी कारकुना तू
हवे तसे मला बदडुनी
कारकुना तू स्पीड मिरवला...
आठवतो का कधी तुला मी
ज्यावर पहीला धडा गिरवला?
कळफलक बडविताना लेखणी तुझी जशी
कळफलक बडविताना
लेखणी तुझी जशी सुटली
ईमेल चॅट समसाने
माझीपण रयाच गेली
अक्षरे नव्हतीच नुसती, ती
अक्षरे नव्हतीच नुसती, ती खरेतर स्पंदने
नीलरंगी मज शरीरी तुझिया शब्दांची गोंदणे
नव्हतेच काही लिहणे अन नव्हतेच काही सांगणे
जुन्या दिसांची याद जराशी.... हेच आता मागणे
निळ्या रंगाच्या कागदावर सगळे
निळ्या रंगाच्या कागदावर सगळे रंग पाहिले
जे कळवायचे होते, सगळे पोटातच साठवले
एके काळचा 'मध्यमवर्गाचे आवडते कुशल-क्षेम कळवण्याचे साधन' मी
का मला त्यांनी 'मोबाइल' च्या काळ पडद्याआड पाठवले?
जळण सरले, परस नुरला अन धूर
जळण सरले, परस नुरला
अन धूर माझा लोपला...
मोडीत घालुनि मजला
'तो' सुखाने झोपला...
आईशप्पथ! कसला भन्नाट खेळ आहे!
आईशप्पथ! कसला भन्नाट खेळ आहे!
विस्थापितांची यादी पण सही आहे.
स्वरूप्राव जोरदार निघालेत चारोळ्यांच्या गाडीतून...
ख्यालीखुशाली विरह
ख्यालीखुशाली विरह प्रेम
सुखदु:खाच्या ओळी काही
कैक पिढ्यांचे हृदगत
कैक पिढ्यांची ग्वाही
गो लोक्स.
स्वरूप- मस्तं.
स्वरूप , मस्त!
स्वरूप , मस्त!
स्वरूप, जियो! जोरदार सुटला
स्वरूप, जियो!
जोरदार सुटला आहात!
असायचे आत थंडगार पाणी वर
असायचे आत थंडगार पाणी
वर पितळी अंग लखलखणारे,
आजही फिरते ते झाकण की...
कुचकुचणारे नशिबाचे फेरे?
कित्येकांची मीच शमवली
कित्येकांची मीच शमवली तहान
प्रवासाच्या सोवळ्यात मोठा माझा मान
आजीच्या वळकटीबरोबरच माझे स्थान
आता फक्त संग्रहालयातला खोटा बहुमान
रुपाया दोन रुपायाच्या नोटा
रुपाया दोन रुपायाच्या नोटा आम्ही
आम्हाला सर्वजण विसरले
पाचशे हजारावर क्लोज अप दाखवत
बापूजीही आम्हाला अंतरले
विझला आतला तो आगीचा
विझला आतला तो आगीचा डोंब
उघड्याबंब या शरीरातला जोम
जमाना आला डोस्कं वापरायचा
मानेवर आमच्या तर त्याचीच बोंब
स्वरूप, मस्तच! संयोजक, तुम्ही
स्वरूप, मस्तच!
संयोजक, तुम्ही दिलेल्या विस्थापितांव्यतिरिक्त आणखी दुसरे विस्थापितही चालतील का?
उदा.
पाटा-वरवंटा, रोलचा कॅमेरा, रॉकेलचा स्टोव्ह, (पाण्याचा) मटका इ.
उमटतील फाँट्स एकसारखे
उमटतील फाँट्स एकसारखे कळफलकाने
न दिसेल प्रेमाचे हस्ताक्षर मात्र
ओथंबलेली माया अन् अश्रूचा सुकलेला थेंब
सांभाळून आहे मी आंतर्देशीय पत्र
निळ्या कागदी निळीच
निळ्या कागदी निळीच शाई
शब्दांतून हो हृदय प्रवाही
आज कुणी ना लिही, न वाची
जो तो येथे ढकलत राही
@ गजानन, दिलेल्या
@ गजानन,
दिलेल्या विस्थापितांपैकीच एक निवडून त्यावर चारोळी लिहायची आहे.
कोणे एके काळी बरंका, तापवीत
कोणे एके काळी बरंका, तापवीत बंबात पाणी
उग्र तपस्वी वास्तुपुरुष जणु भासे की तो कोणी
दगडकाटक्या घेती पेट; उनउन पाण्याशी भेट
गतस्मृतींच्या कथा बालका, ऐक सांगतो थेट
संयोजक, धन्यवाद.
संयोजक, धन्यवाद.
सर्व चारोळ्या भारी!! आमची
सर्व चारोळ्या भारी!! आमची आपली सामान्य चारोळी गोड मानून घ्या हां-
कानामागून आली
न् तिखट झाली
(ई)मेलीनं माझी
रयाच घालवली!
कस्ल भन्नाट लिहीलय सगळ्यान्नी
कस्ल भन्नाट लिहीलय सगळ्यान्नी
बंबा विस्थापीती
बंबा विस्थापीती गीझर;
नमर्दामाईस सरदार सरोवर
कालपटलावरील ठोके निव्वळ
विठ्ठला, पाह्य पाह्य ||
जबरदस्त कल्पना ! ज्यांना
जबरदस्त कल्पना ! ज्यांना सुचली त्यांना सा.दं.
पैश्याच्या या
पैश्याच्या या जमान्यात
हजार्,पाचशेचे महत्त्व
एक , दोन रुपायचे
हरवले अस्तित्व
रैना, बंब तुज लेखनीत आलाय.
रैना, बंब तुज लेखनीत आलाय.
(अंगात आलाय)
तुझ्या सगळ्या चारोळ्या मस्त आहेत.
रैना, मस्त आहेत तुझ्या
रैना, मस्त आहेत तुझ्या चारोळ्या, पण बंबवाली फारच आवडली.
सगळ्यांच्या मस्त आहेत चारोळ्या.
इठ्ठलराव नॉट फेअर, बडवे
इठ्ठलराव नॉट फेअर, बडवे चार्जिंग अ लॉट
एकदोनरुप्यात खरं म्हणजे आली पायजेल होती कॉट
तुज्याच समुर टाकली असती, बसलो आस्तु तुला न्याहळीत
पानतमाखु द्येत घ्येत, सुकदुक्काचे गात गीत
गजानन/शैलजा- टीपी मस्तय हा. मेरेको लै आवड्या.
लोकहो छान लिहीताय. लिहा.
रैना, सहीच विरल्या घोषणा
रैना, सहीच
विरल्या घोषणा झुणका-भाकरीच्या,
अन ओळी खर्चाच्या, पान-सुपारीच्या,
कोट्यावधीचे जिथे होत घोटाळे
कोण करी चिंता रुपया-दोन रुपयाच्या?
पै दिडकी पावली चवली ,सारी
पै दिडकी पावली चवली ,सारी पोरं कुठे हरवली?
हजारीची माळ दिमाखात मायाकंठी मिरवली
तरी मजशिवाय व्यवहारास नाही गती
अर्थसचिवांनी सही फ़क्त माझ्यावर गिरवली
अजुनही काही
अजुनही काही कार्यालयात
विचरतात मला
टंकित लेखन करुन
बडतात मला.. ...:P
Pages