शीघ्रकाव्य - चारोळ्यांच्या आरोळ्या : विषय ४ - "शालेय आरोळ्या"

Submitted by संयोजक on 3 September, 2011 - 09:00

शालेय आरोळ्या

रसायनशास्त्राचं अजब रसायन
संयुगं, सल्फ्युरीक अ‍ॅसिड अन जमवा समिकरण
परीक्षानळी, चंचुपात्रात काय असतं ते?
द्रावण का रावण का द्रावण का रावण ... Proud

BOOKSTACK2.jpg

शाळेत शिकत असताना आपल्या 'रम्य त्या बालपणाच्या' स्वच्छंदी, आनंदी जीवनात आपल्याला छळणारे व्हिलन लोकं म्हणजे - बीजगणित, भुमिती, नागरीकशास्त्र, भूगोल, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, संस्कृत, जीवशास्त्र, इतिहास इ.इ. हे व्हिलनलोकं केवळ विद्यार्थ्यांनाच छळून थांबत नाहीत तर बरोबर पालक आणि शिक्षकांचीही धुलाई करतात .....

इथे आपण या व्हिलन लोकांच्या नावाने म्हणजे या विषयांच्या नावाने आरोळ्या ठोकायच्या आहेत ..... पालक, विद्यार्थी वा शिक्षकांच्या भुमिकेतून.

मग, वाट कसली बघता ... सुरू करा!

****************************************
सर्वसाधारण नियम:

१. ही स्पर्धा नाही. हा एक खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०११' ह्या ग्रुपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. उत्सवादरम्यान एक दिवसाआड नवीन विषय दिला जाईल.
४. कुठल्याही शाळेत शिकवल्या जाणार्‍या विषयांवर तुम्हाला चारोळी करायची आहे. उदाहरणार्थ बीजगणित, भुमिती, नागरीकशास्त्र, भूगोल, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, संस्कृत, जीवशास्त्र, इतिहास इ.
५. चारोळी ही शिक्षकांनी, विद्यार्थ्याने किंवा पालकांनी केलेली असु शकते.
६. एका वेळेस एकच चारोळी टाकावी.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा हा खेळ खेळू शकतो/ते, फक्त सलग दोन चारोळ्या देऊ शकत नाही.

******************************************

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजून एकही चारोळी नाही !! म्हणजे कुठलाच विषय कुणाचाही नावडता नाही की काय ?
असो .... एखादा विषय काय, पूर्ण अभ्यासच नावडता असलेल्या
(माझ्यासारख्या) एका विद्यार्थ्याची ही कैफियत
(इंग्रजी माध्यमामुळे भाषेची वाट लागली आहे हे सांगणे नलगे)
(कुछ कुछ होता है या गाण्याच्या चालीत)

Exam पास आये, Study हो न पाये
प्रश्नोंके उत्तर याद न आये
अब तो मेरा दिल नतीजेसे डरता है
क्या करूं हाये कुछ नहीं होता है

बेडकाचा असतो म्हणे बेडुकमासा
सुरवंटाचं होतं फुलपाखरु
मी व्हायचो हायबरनेट
जिवशास्त्राचा तास झाला की सुरू

इतिहासाच्या तासाला हेडमास्तर
यायचे काठी आपटित
सतत सुरू त्याचा मंत्रोच्चार
नले घालीन काठी पाठित

संयोजक खातात आमच्या रसायनशास्त्रावर खार
लिहून कुजकट चारोळी, सार्‍या पुस्तकांच्या मध्ये त्यांनी केला सँडविच पार
ह्यात ते अन् त्यात हे; विरल-संहत अन् ऊन की गार
(अं?? आता काय जुळवावे बरे????)
ह्यातच आहे जीवणाचे सार Proud

-संहत रसायनशास्त्रभक्ताची एक उत्प्रेरक चारोळी रसायनशास्त्रभक्तीप्रित्यर्थ विरंजकास अर्पण. __/\__

न्युटनने शोधलं म्हणे, अ‍ॅप्पलवरुन गुरुत्वाकर्षण
मी म्हणालो ,माझ्यात आणि पिंकीत आहे तसलंच का वो सर ?
सर म्हणाले, नाही! तुझ्या हातामध्ये आणि या छडीमध्ये असते तसे !

गणिताच्या प्रमेयांनी कायम केला घात
सिध्दांत, समीकरणांचे कायमचे आघात
कोन, चौकोन, वर्तुळांनी लाज माझी काढली
वर्गमूळ, घनमुळांनी भाजणीसवे बोलतीच बंद केली!!

जिव घेतो विना शस्त्राने
हा जिवावरचा अभ्यास

जिव घेतो शस्त्राने म्हणुन
जिवशास्त्रात खल्लास

भौतिकाची गृहितके गेली पार बंपर
आकृत्यांच्या भेंडोळ्यांनी आली मला चक्कर
तरी घोकंपट्टी करत कसेबसे निभावले
परीक्षेत मात्र डोळ्यांसमोर लख्ख काजवे चमकले!

'गणिता'त लागली होती कधीच वाट
'रसायनशास्त्रा'त समिकरणांचा थाट
'भौतिक'ने भौतिक सुखांना कात्री लावली
निमुटपणे मग 'जीवशास्त्रा'ची वाट धरली Sad

थीटा
Rofl

सगळ्या शास्त्रात नागरिकशास्त्र
कधीच कळले नाही
या शास्त्राशी माझे
कधीच सुर जुळले नाही