खरंच तु खुप सुंदर दिसतेस...

Submitted by Nikhil. on 7 November, 2017 - 08:58

पांढऱ्या डिओवर जेव्हा तु
पाढऱ्या कलरची साडी नेसतेस
खरं सांगु एखादी देवदुत वाटतेस

पण ते तर सर्वांच भलं करतात
तु सर्वांना घायाळ करुन जातेस
तशी काळ्या साडीतही तु खुप सुंदर दिसतेस.

साडीचा पदर तु उजव्या हाताला गुंडाळतेस
प्रत्येक सिग्नल ला घड्याळाकडे बघतेस
त्या निमित्ताने आरश्यात हळुच स्वत्:ला पाहतेस

अचानक जेव्हा सिग्नल हिरवा होतो तेव्हा
स्टार्टर मारायचा सोडुन हॊर्न् जोरजोरात दाबतेस
खरं सांगु घाबरल्यावरही तु खुप छान दिसतेस

कॊलेजमधे आल्यावर तुझी डिओ पार्क् करताना
माझ्या बाईकच्या बाजुला जागा शोधतेस
खट्याळ नजरेने मी पाहतोय का? ते पाहतेस

आणि कधीतरी मी तुला पकडलेच अशावेळी
तर काही झालच नाही असा चेहरा करतेस
खरं सांगु खरंच तु खुप सुंदर लाजतेस

मी तुला सुंदर म्हटल की खुप खुश होतेस
फ्लर्ट् करतोयस का? बिनधास्तपणे विचारतेस
पण मी तुला सुंदर म्हटले की खरंच् सुंदर दिसतेस

चुकुन नाही बोललो तुझ्याशी तर जाम रुसतेस्
खरेतर जाणुन-बुजुन इग्नोर करतो तुला
कारण रुसल्यावरही तु खुप छान दिसतेस

माझ प्रेम आहे हे सांगु की नको कळत नाहियेय
आपल्या माणसाला दुखवु नये अस तुच तर म्हणतेस
आणि तु आनंदी असतानाच खुप छान दिसतेस
खरंच सांगतोय तु खुप सुंदर दिसतेस..
- निखिल ०७-११-२०१७

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults