गूढकथा

चांदणी रात्र - ९

Submitted by निरंजन कुलकर्णी on 16 September, 2019 - 13:23

दुसऱ्या दिवशी सकाळी राजेश कॉलेजला जायला निघाला. राजेश वृषालीच्या घरापाशी पोहोचला. वृषाली गाडीला किक मारत होती पण तिची गाडी स्टार्ट होत नव्हती त्यामुळे ती फार वैतागली होती. राजेशने गाडी थांबवली. वृषाली राजेशकडे पाहून हसली व “हाय” म्हणाली. “तुझी हरकत नसेल तर मी प्रयत्न करून पाहतो.” राजेश वृषालीला म्हणाला. जणू याचीच वाट पाहत असल्याप्रमाणे वृषाली बाजूला झाली व तिने गाडी राजेशच्या ताब्यात दिली. राजेशने दोन वेळा किक मारली पण गाडी स्टार्ट नाही झाली. राजेशने कॉक ओढला व पुन्हा एकदा किक मारली पण तरीही गाडी स्टार्ट झाली नाही. शेवटी राजेशने गाडी डाव्या उजव्या बाजूला हलवून गाडीतलं पेट्रोल ढवळलं.

चांदणी रात्र - ८

Submitted by निरंजन कुलकर्णी on 15 September, 2019 - 05:48

कॉलेज संपताच राजेश आणि संदीप फ्रेश होण्यासाठी राजेशच्या घरी पोहोचले. संदीपने सकाळीच पार्टीला घालायचे कपडे बरोबर घेतले होते. दोघेही आवरून घरातून बाहेर पडले. तासाभरात ते मनालीच्या घरी पोहोचले. मनालीचा बंगला एखाद्या पॅलेसपेक्षा कमी नव्हता. मनालीचे वडील एका नावाजलेल्या कंपनीचे मालक होते. बंगल्यासमोर मोठं लॉन होतं. तिथे टेबल खुर्च्या मांडल्या होत्या.

चांदणी रात्र - ७

Submitted by निरंजन कुलकर्णी on 14 September, 2019 - 10:23

राजेश नेहमीच्या वेळेला संदीपच्या घरापाशी पोहोचला. संदीपने नेहमीप्रमाणे कालच्या होमवर्कबददल विचारलं. ‘या संदीपला आभ्यास सोडून इतर गोष्टीसुद्धा असतात हे माहीतच नाही. नेहमी हा आभ्यास, होमवर्क एवढंच बोलतो. त्यामुळेच याचे आपण सोडलं तर फारसे मित्र नाहीत.’ राजेशच्या मनात विचार आला. एक दिवस संदीपला माणसात आणायचा त्याने मनोमन संकल्प केला.

चांदणी रात्र - ६

Submitted by निरंजन कुलकर्णी on 13 September, 2019 - 12:50

राजेशने चहा बनवण्यासाठी दुधाचं पातेलं गॅसवर ठेवलं व तो दात घासण्यासाठी बाथरूममध्ये गेला. दात घासुन झाल्यावर राजेश परत स्वयंपाकघरात गेला व चहा बनवून चहाचा कप घेऊन तो हॉलमध्ये आला. रवी नेहमीप्रमाणे झोपला होता. राजेशने टीव्ही चालू केला व टीव्ही पाहतच चहा संपवला. आज रविवार असल्यामुळे कॉलेजला सुट्टी होती. आजचा दिवस कसा घालवायचा याचाच राजेश विचार करत होता, तेवढ्यात त्याचा फोन वाजला. फोन वृषालीचा होता. एका क्षणाचाही विलंब न करता त्याने फोन उचलला. “खूप बोर होतंय. ये ना घरी. आई-बाबा पण गावाला गेलेत.

चांदणी रात्र - ५

Submitted by निरंजन कुलकर्णी on 11 September, 2019 - 13:27

आज रविवार होता. राजेशचा गावातला मित्र गणेश आज पुण्यात आला होता. त्याला कपडे खरेदी करायचे होते. त्यामुळे राजेशचा पूर्ण दिवस गणेशबरोबर फिरण्यातच गेला. गणेश रात्री राजेशच्याच फ्लॅटवर राहिला व सकाळी लवकर घराबाहेर पडला. राजेशनेच त्याला स्वारगेटला सोडलं. पण त्यामुळे आज त्याला बर्वे उद्यानात जाता नाही आलं. त्यामुळे राजेशला आज फार चुकल्यासारखं वाटत होतं. व्यायाम करायचा राहिल्यामुळे नव्हे तर एका वेगळ्याच कारणामुळे तो थोडा मलूल झाला होता.

चांदणी रात्र - ४

Submitted by निरंजन कुलकर्णी on 10 September, 2019 - 12:57

बरोबर नऊ वाजता राजेश घरातून बाहेर पडला. थोड्याच वेळात तो संदीपच्या घरापाशी पोहोचला. आज मात्र राजेशला थोडा वेळ थांबायला लागलं. काही वेळाने संदीप घाईघाईतच घरातून बाहेर आला व गाडीवर बसला. गाडी चालवत असताना आज कॉलेजात वृषाली परत दिसेल या विचाराने राजेश सुखावला. “सहस्त्रबुद्धे सरांनी दिलेला होमवर्क झाला का?” संदीपच्या प्रश्नाने राजेश भानावर आला. वृषालीच्या नादात आज पहिल्यांदा राजेश होमवर्क करायला विसरला होता. राजेशच्या उत्तराची वाट न पाहताच संदीप सांगू लागला, “अरे काल आईची तब्येत अचानक बिघडली. बाबा पण घरात नव्हते. त्यांना ऑफिसमध्ये काम होतं. त्यामुळे मलाच तिच्याबरोबर दवाखान्यात जावं लागलं.

चांदणी रात्र - ३

Submitted by निरंजन कुलकर्णी on 10 September, 2019 - 06:33

राजेशला मात्र एका वेगळ्याच विचाराने ग्रासलं होतं. आज वर्गांत आलेल्या त्या नवीन मुलीबद्दल त्याला एक प्रकारचं कुतूहल वाटत होतं. अजून तो वृषालीला भेटलाही नव्हता पण तिला पाहताच त्याच्या मनात नक्कीच काहीतरी वेगळी भावना जागी झाली होती. हे प्रेम होतं का? हे त्यालाही कळात नव्हतं. पण ज्या व्यक्तीला आज आपण पहिल्यांदाच पाहिलं, जिच्याशी आपली अजून नीट ओळख देखील नाही तिच्याबद्दल आपल्या मनात प्रेमभावना कशा निर्माण होतील? याविषयी संदीपशी बोलावं असही राजेशला वाटलं पण संदीपला प्रेमाबद्दल विचारणं म्हणजे एखाद्या भिकाऱ्याला श्रीमंतीविषयी विचारण्यासारखं होतं.

चांदणी रात्र - २

Submitted by निरंजन कुलकर्णी on 8 September, 2019 - 03:30

सकाळी आठ वाजता राजेश स्वारगेटला पोहोचला. ऑटोने तो घरी आला. दरवाजाला कुलूप नव्हतं म्हणजेच रवी परत आला होता. राजेशने बेल वाजवली पण दरवाजा उघडला नाही. त्याने पुन्हा बेल वाजवली पण पुन्हा तेच. तिसऱ्या बेलनंतर मात्र दरवाजा उघडला. समोर रवी डोळे चोळत उभा होता. त्याच्याकडे पाहूनच कळत होतं की त्याची झोपमोड झाली आहे. “अरे राजेश! काय माणूस आहेस राव तू. तुला एवढे फोन केले तर तुझा फोन स्वीच ऑफ. अन एक फोन करता येत नाही होयरे तुला. मला वाटलं काय गचकला की काय हा.” एवढे बोलून रवी मोठयाने हसू लागला. “मला आत तर येउदे पहिलं. सांगतो की सगळं.” राजेश रवीला म्हणाला व घरात गेला.

चांदणी रात्र - १

Submitted by निरंजन कुलकर्णी on 7 September, 2019 - 11:36

राजेशला सकाळी जाग आली तेव्हा त्याला फार आश्चर्य वाटलं. कारण तो त्याच्या घरी बेडवर नव्हता तर स्वारगेट बसस्थानकाच्या एका बाकावर होता. ‘यावेळी आपण इथे कसे आणि का झोपलो होतो?’ राजेशला प्रश्ण पडला. तो बाकावरून उठला. त्याने खिशाला हात लावला पण खिशात पाकिट नव्हतं. मोबाईल सुद्धा नव्हता. खिशात फक्त एक शंभराची नोट होती. राजेश बसने घरी पोहोचला. त्याच्याकडे घराची चावीसुद्धा नव्हती. पण दारात ठेवलेल्या झाडाच्या कुंडीखाली ठेवलेल्या जादाच्या चावीने राजेशने दरवाजा उघडला. राजेशचं डोकं फार दुखत होतं. त्यामुळे तो कॉलेजलाही गेला नाही. कीतीही विचार केला तरी कोडं सुटत नव्हतं.

मी अजिबात घाबरत नाही!

Submitted by मी मधुरा on 4 August, 2019 - 06:57

अमावस्येची रात्र! ऑफिस मधून सगळे लवकर घरी गेले होते. माझे काम मात्र अजून पूर्ण व्हायचे होते. मी एकटाच फाईलवर रिमार्क लिहित बसलो होतो. घड्याळाच्या मोठा काट्याने १२ वर येत ९ वर असलेल्या छोट्या काट्याशी काटकोन केला. उशीर झाला होता. पण मला चिंता नव्हती. तसाही मी अंधश्रध्दाळू नाही. त्यामुळे, अमावास्येला घरी लवकर जाऊन झोपायचे असते, असे कोणी कितीही सांगितले तरी ते मी ऐकत नाही. शेवटी काम महत्त्वाचे! आणि त्यात मी खवीस, चेटकीण, हडळ, भूत, मुंजा वगैरेला तर अजिबातच घाबरत नाही. त्यामुळे हातात मंतरलेला गंडा बांधणे वगैरे असले काही नखरे नसतात माझे. या उलट माझे घाबरट कलिग्ज्!

Pages

Subscribe to RSS - गूढकथा