गूढकथा

चांदणी रात्र - १५

Submitted by निरंजन कुलकर्णी on 21 September, 2019 - 13:06

राजेश आणि संदीप हॉटेलात पोहोचले. थोड्याच वेळात मनाली आणि वृषलीही पोहोचल्या. जेवता जेवता चौघांच्या अगदी छान गप्पा रंगल्या होत्या. जेवून झाल्यावर राजेशने घड्याळात पाहिले. रात्रीचे दहा वाजले होते. आता निघायला हवं होतं. त्यामुळे त्यांनी गप्पा आवरत्या घेतल्या व चौघेही आपापल्या घरी जायला निघाले.

चांदणी रात्र - १४

Submitted by निरंजन कुलकर्णी on 21 September, 2019 - 01:34

सकाळी उठताच राजेशने पटापट आवरलं. आज त्याच्या मनात एक वेगळीच हुरहूर, एक वेगळाच उत्साह संचारला होता. खरंतर कालची निम्मी रात्र तो जागा होता पण थकवा बिलकुल जाणवत नव्हता. संध्याकाळी काय काय करायचं याची त्याने मनात उजळणी केली व वृषालीला फोन लावला. आज संध्याकाळी सहा वाजता टेकडीवर ये, तुला काहीतरी सांगायचंय असं राजेशने वृषालीला सांगितलं व फोन ठेवला.

चांदणी रात्र - १३

Submitted by निरंजन कुलकर्णी on 20 September, 2019 - 13:02

सकाळी उठून नाष्टा करून शेतात जायचं. दिवसभर शेतात काम करायचं. बरोबर आणलेल्या डब्यातलं दुपारी जेवायचं. संध्याकाळी नदीवर जाऊन सूर्याचं दर्शन घ्यायचं व घरी परतायचं असा राजेशचा रोजचा दिनक्रम ठरला होता. रोज वृषालीला एकदा तरी फोन व्हायचा. पण काहीवेळा फोन लागायचा नाही. मग वृषालीशी बोलणं नाही झालं तर राजेशला खूप उदास वाटायचं.

चांदणी रात्र - १२

Submitted by निरंजन कुलकर्णी on 19 September, 2019 - 12:30

काही जुन्या आठवणींमुळे वृषालीचं मन विस्कळीत झालं होतं. ते पूर्वपदावर आणण्यासाठी कटू आठवणींच्या जागी सुखद आठवणी पेरणं गरजेचं होतं. पण जोपर्यंत वृषालीच्या मनाचे दरवाजे बंद होते तोपर्यंत हे शक्य नव्हतं. तसेच तिच्या घराण्यात मनोविकाराने ग्रासलेली ती काही पहिली व्यक्ती नव्हती. तिच्या आज्जीला देखील नैराश्याचे झटके बऱ्याचदा येऊन गेले होते. पण तरीदेखील काही महिन्यांपूर्वी घडलेल्या घटनेमुळे वृषालीच्या मनावर झालेली जखम इतक्या दिवसांनंतर पुन्हा एकदा ओली व्हावी याचं उत्तर मात्र खुद्द डॉक्टरांकडे देखील नव्हतं.

चांदणी रात्र - ११

Submitted by निरंजन कुलकर्णी on 18 September, 2019 - 13:12

रात्री सात वाजता संदीप, मनाली आणि वृषाली कॉलेजात पोहोचले. वृषालीने मनालीला राजेशबद्दल विचारलं. तो ठीक असल्याचं मनालीने सांगितलं. तसेच आता फक्त तुझ्या गाण्यावर लक्ष दे असा सल्लाही तिने वृषालीला दिला.

चांदणी रात्र - १०

Submitted by निरंजन कुलकर्णी on 17 September, 2019 - 12:40

स्पर्धेचा दुसरा दिवस उजाडला. संदीप व राजेश मैदानावर पोहोचले. थोड्याच वेळात मनाली आणि वृषाली सुद्धा तिथे आल्या. स्पर्धेची वेळ झाली. सर्व स्पर्धक आपापल्या जागी उभे होते. रेफरीने शिट्टी वाजवताच सर्वांनी पोजिशन घेतली. राजेशने वृषालीकडे पाहिले. दोघांची नजरानजर झाली व राजेशमध्ये एक वेगळीच शक्ती संचारली. रेफरीने दुसरी शिट्टी दिली व सर्व स्पर्धकांनी धावायला सुरुवात केली. राजेश वाऱ्याच्या वेगाने धावत होता व एकेकाला मागे टाकत होता. आता अगदी थोडं अंतर बाकी होतं. राजेशच्या पुढे एकच मुलगा होता. राजेशचे पाय आता घाईला आले होते पण तरीही तो पूर्ण ताकदीनिशी धावत होता.

चांदणी रात्र - ९

Submitted by निरंजन कुलकर्णी on 16 September, 2019 - 13:23

दुसऱ्या दिवशी सकाळी राजेश कॉलेजला जायला निघाला. राजेश वृषालीच्या घरापाशी पोहोचला. वृषाली गाडीला किक मारत होती पण तिची गाडी स्टार्ट होत नव्हती त्यामुळे ती फार वैतागली होती. राजेशने गाडी थांबवली. वृषाली राजेशकडे पाहून हसली व “हाय” म्हणाली. “तुझी हरकत नसेल तर मी प्रयत्न करून पाहतो.” राजेश वृषालीला म्हणाला. जणू याचीच वाट पाहत असल्याप्रमाणे वृषाली बाजूला झाली व तिने गाडी राजेशच्या ताब्यात दिली. राजेशने दोन वेळा किक मारली पण गाडी स्टार्ट नाही झाली. राजेशने कॉक ओढला व पुन्हा एकदा किक मारली पण तरीही गाडी स्टार्ट झाली नाही. शेवटी राजेशने गाडी डाव्या उजव्या बाजूला हलवून गाडीतलं पेट्रोल ढवळलं.

Pages

Subscribe to RSS - गूढकथा