शिवार

श्रावण पक्षी

Submitted by पुरंदरे शशांक on 13 August, 2025 - 01:30

श्रावण पक्षी

हलके हलके पानांवरती
थेंबांची ती नाजुक नक्षी
सरसर सरसर झाडांवरती
बरसत येतो श्रावण पक्षी

घनघन घनघन निळ्या आकाशी
अवचित येता मेघ अंबरी
झळझळणार्‍या रवी करांनी
पात उजळते मस्त बिलोरी

सळसळणारे शिवार थबके
क्षणात वाजे झरा खळाळी
भिरभिरणारी रंगबिरंगी
फुलपाखरे सोनझळाळी

खुळावणारा निसर्ग सारा
फिटे निराशा उदासवाणी
लवलवणारे मानस डोले
मिटूनी डोळे अंतर्यामी

गाव शिवार

Submitted by रोहित ..एक मावळा on 8 June, 2011 - 10:11

गाव तस प्रत्येकालाच आवडत कारण गाव हे गाव असत.
त्या मातीची ओढ कायम मनाला लागलेली असते.लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाला गेलो की खुप धम्माल करायचो.रानात भटकयाचो,रानमेवा चाखायचो,रानपाखरांशी गप्पा मारायचो,विहिरीत मनोसक्त डुंबायचो.पण आता गावाला जाण सारख होत नाही.मग कामाच्या रहाटगाड्यातुन वेळ मिळाला की पाऊले आपसुकच तेथे खेचुन घेऊन जातात.असच मागच्या महिनाअखेरला एका मित्राच्या लग्नानिमित्त गावाला जाणे झाले.त्या दोन दिवसात लहाणपणीच्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला.रानशिवारात मनोसोक्त हुंदडलो.

आमच्या गावच्या शिवाराचे निसर्गसौंदर्य कॅमेराच्या नजरेतुन मांडण्याचा हा एक प्रयत्न.....

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - शिवार