Submitted by पुरंदरे शशांक on 13 August, 2025 - 01:30
श्रावण पक्षी
हलके हलके पानांवरती
थेंबांची ती नाजुक नक्षी
सरसर सरसर झाडांवरती
बरसत येतो श्रावण पक्षी
घनघन घनघन निळ्या आकाशी
अवचित येता मेघ अंबरी
झळझळणार्या रवी करांनी
पात उजळते मस्त बिलोरी
सळसळणारे शिवार थबके
क्षणात वाजे झरा खळाळी
भिरभिरणारी रंगबिरंगी
फुलपाखरे सोनझळाळी
खुळावणारा निसर्ग सारा
फिटे निराशा उदासवाणी
लवलवणारे मानस डोले
मिटूनी डोळे अंतर्यामी
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त वर्णन श्रावणाचं
मस्त वर्णन श्रावणाचं
मस्त.
मस्त.
मस्तच
मस्तच
सरस्वती प्रसन्न आहे तुमच्यावर
सरस्वती प्रसन्न आहे तुमच्यावर पुरंदरे.
सुंदर!
सुंदर!
पहिल्या तीन कडव्यांमध्ये ( ४८ शब्दांमध्ये) तुम्हीं इतक छान शब्दचित्र उभं केलत की त्यातून चौथ्या कडव्याची प्रचिती आली.