गाव शिवार

Submitted by रोहित ..एक मावळा on 8 June, 2011 - 10:11

गाव तस प्रत्येकालाच आवडत कारण गाव हे गाव असत.
त्या मातीची ओढ कायम मनाला लागलेली असते.लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाला गेलो की खुप धम्माल करायचो.रानात भटकयाचो,रानमेवा चाखायचो,रानपाखरांशी गप्पा मारायचो,विहिरीत मनोसक्त डुंबायचो.पण आता गावाला जाण सारख होत नाही.मग कामाच्या रहाटगाड्यातुन वेळ मिळाला की पाऊले आपसुकच तेथे खेचुन घेऊन जातात.असच मागच्या महिनाअखेरला एका मित्राच्या लग्नानिमित्त गावाला जाणे झाले.त्या दोन दिवसात लहाणपणीच्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला.रानशिवारात मनोसोक्त हुंदडलो.

आमच्या गावच्या शिवाराचे निसर्गसौंदर्य कॅमेराच्या नजरेतुन मांडण्याचा हा एक प्रयत्न.....

बाभळीचे फुल आणि काटे...

रानात गेल्यावर यांच्या किलबिलाटाने एकदम प्रसन्न वाटत.

वेगवेगल्या रंगाचे ,आकारचे हे पक्षी आपल्या आवाजाने वातावरण मंत्रमुग्ध करून टाकतात.

परड... (गोठा)

कालवड ... पंधरा दिवसापुर्वी या परड्यात जन्माला आलेली ही कालवड कशी टेचात उभी आहे ना...

नवीन पालवी फुटलेल हे बोरीच झाड....

हिरवेगार उसाचे शेत.....

थोडीशी बागायती शेती...

ताजी ताजी वांगी...

टोमॅटो...

भुईमुग ...

नेहमी हसणारी ही फुल.....
फुल पाहुन मनात आनंदाचा झेंडु फुटला नाही तर नवलच..

हे एक अनोख फुल... (पांगारा)

फुलांचा खरा आस्वाद घेणारा हा बहाद्दर...

भुंगा

आंब्याचे झाड....
याच्या गर्द सावलीत छान झोप लागते.

आंबा

आंब्याच्या झाडावरील मधाच पोळ...

पिकायला घातलेले आंबे...

पिकलेले आंबे....

चला जरा रानमेवा चाखुया....

करवंद

जांभळ....

खाऊन अन फिरुन दमलात .. चला तर मग पोहुन येऊया..
आमच्या गावाला नदी नाही .पण विहीरी भरपुर.. काही शेतीसाठी वापरतात तर काही पाणी पिण्यासाठी...
खर म्हणजे पोहोण्यासारखा दुसरा व्यायाम नाही.
चला विहिरीत डुंबुया..
दगडात बांधलेल्या या विहिरीतील पाणी गारगार लागत.

आणि हा सुर मारला..

आणि हा मुटका.. थोड माग उभ रहा नाहीतर अंगावर पाणी उडेल ...

उडल ना..

आहा आता कस मस्त वाटतय....

विहीरीत तर यथासांग डुबलो.पण तेव्हढ्यावर भागल नाही म्हणून वळवाचा पाऊससुध्धा भेटायला आला.
कडकड करत ढगांनी आवाज केला.

टपोर्‍या थेंबानी धरणीमातेला येऊन मिळाला.काळ्या मातीचा गंध दरवळला.
शिवाराला आनंद जाहला.

सरींनी पत्र्याचा टाशा केला अन समदा रस्ता भिजवुन गेला.

पण बैलगाडीच्या चाकाप्रमाणे आपल्याला प्रवाही रहाव लागत ना.. दोन दिवस अनुभवलेली ही गाव-शिवाराची शिदोरी किती दिवस टिकेल माहीत नाही.

पुन्हा भेटुया....

रोहित ..एक मावळा

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

.

मस्त सफर घडवलीस मावळ्या...एकदम गावाकडे घेउन गेलास लेका.. सर्व प्रचिंना १००पैकी ९९ Wink गुण.
Happy

रोहित सह्हीच रे Happy
सगळेच फोटो छान, पण शेवटचा अधिक आवडला. Happy

बाकी सगळं ठेव तुझ्याकडे, फक्त करवंद आणि जांभूळ पाठवून दे Proud

छान

अतिशय सुंदर टिपलेयस फोटो
खास करून पाऊस दाटून आलेला, विहिरीत उडी मारल्यावर उडालेल्या पाण्याचा..
अप्रतिम फोटो Happy डोळे थंडावले. Happy

धन्यवाद गौतम७स्टार,शांकली,CHAATAK,जिप्सी ,जागू ,यो , जामोप्या, दिनेशदा , अंजु ,दिपक मोहिते, नादखुळा , लाजो ,अजय जवादे ,गजानन,गिरिविहार ,आर्या ,मार्को पोलो ,बाजीराव अवि ,म्हमईकर ,मानस ,पुरंदरे शशांक,दक्षिणा......... तुम्हा सगळ्यांचा लय लय आभारी Happy

ते लाल फ़ूल पांगाराच आहे. >> धन्यवाद अंजु ,दिनेशदा Happy

बाकी सगळं ठेव तुझ्याकडे, फक्त करवंद आणि जांभूळ पाठवून दे >> जिप्स्या घरी ये.. म देतो Happy

कोकणातल्या झब्बुला तयार रहा..... >> गिरी कवा ... वाट बघतुय Happy

मस्त !!!

Pages