मुलांचे प्रश्न

पालकत्वाचा काटेरी मुकुट -किस्सा चार "मम्मा, कुणी मरते म्हणजे काय होते? "

Submitted by नादिशा on 4 September, 2020 - 00:38

आजची ही जनरेशन खूप हुशार आणि चौकस आहे , असा माझा सार्वत्रिक अनुभव आहे. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या सगळ्या गोष्टींकडे खूप बारीक लक्ष असते त्यांचे आणि खूप कुतूहल असते त्यांच्या नजरेत. मग ते शमवण्यासाठी मुले आपल्याला सतत प्रश्न विचारत राहतात.
मुले प्रश्न विचारतात, हे त्यांच्या हुशारीचे , त्यांची विचारप्रक्रिया सतत चालू असल्याचे द्योतक असते. पण त्यांच्या ह्या प्रश्नांना उत्तरे देणे म्हणजे पालकांची खरोखर कसोटी असते.
असाच आमची कसोटी पाहणारा हा किस्सा आहे.

डॅडी, मुसलमान म्हणजे काय ?

Submitted by उद्दाम हसेन on 4 July, 2013 - 13:17

रविवारी मित्राकडे पार्टीला गेलो होतो. आम्ही गप्पा मारत असताना त्याचा लहान मुलगा - वय वर्षे पाच आमच्याजवळ आला. त्याने मित्राचे गाल धरून विचारलं, डॅडी मुसलमान म्हणजे काय ? मित्राचा चेहरा पडला.कारण एक मुसलमान मित्रही बरोबर होता. मित्राच्या बायकोने अरे असं काही नसतं असं सागून त्याला ओढलं. तेव्हां आमचा मुस्लीम मित्र मधे पडला. मित्राने मग सावरत त्याला विचारल कुठूनही काहीही ऐकून येतोस. कुणी सांगितला तुला हा शब्द. तर त्याने आईचं नाव घेतलं. आता त्याच्या बायकोचा चेहरा खर्रकन उतरला. ती कावरी बावरी होऊन इतर बायकांना सांगू लागली कि मुलाने विचारलं कि आमीर खानचं नाव आमीर खान का आहे ?

शब्दखुणा: 

अमेरिकेत 'समर बॉर्न' मुलांना नक्की कधी शाळेत घालावे?

Submitted by पूर्वा on 16 January, 2013 - 10:21

अमेरिकेत बहुतेक शाळांमध्ये ऑगस्ट/सप्टेंबर अखेर असणार्‍या मुलाच्या वयाप्रमाणे त्या मुलाला कोणत्या इयत्तेत घालावे हे ठरवले जाते.जसे ५ पूर्ण असेल तर Kindergarten,६ पूर्ण असेल तर First Grade वगैरे.परंतु ज्या मुलांचे जन्म जुलै,ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये आहेत त्या मुलांच्या दॄष्टीने विचार केला तर त्यांच्या वर्गात जवळपास १ वर्षाने मोठी मुलेसुद्धा असतात.लहान वयात मुलांच्या Emotional,Physical आणि Social development मध्ये काही महिन्यांच्या अंतराने बराच फरक पडू शकतो म्ह्णून बर्‍याचवेळा पालक मुलांना १ वर्ष उशीरा शाळेत घालतात असे मला नुकतेच समजले.
हे चूक कि बरोबर ह्याबद्दल बरेच वेगवेगळे मतप्रवाह आहेत.

विषय: 
शब्दखुणा: 

मुलांचे प्रश्न आणि त्यांचे कुतुहल

Submitted by डॅफोडिल्स on 15 April, 2011 - 08:17

मुलं बोलायला लागली एक दिड वर्षाची झाली.. की त्यांची बड्बड..सुरू होते. आपल्या अवती भोवती पाहिलेल्या.. ऐकलेल्या गोष्टींबद्दल त्यांना कुतुहल वाटायला लागतं. आणि मग आपोआपच त्यांचे प्रश्न सुरु होतात. आपण आपल्या परीने... ह्या छोट्या दोन पाच वर्षाच्या बाळांना उत्तरे देतोही. काही वेळा त्यांना ती पटतात तर काही वेळा.. आपल्या उत्तरांमधून नवे प्रश्ण निर्माण होतात. मुलांना खरंही सांगितलं पाहिजे..आणि त्याना पट्लंही पाहिजे.. मग असे करताना अनेकदा गमती होतात्...तर काही वेळा मुलं आपल्याला प्रश्न विचारून भंडावून सोडतात.

पिल्लू : आई गणपती बाप्पा शर्ट का घालत नाहीत ?
मी : ते अंगावर शेला घेतात म्हणून. Happy

Subscribe to RSS - मुलांचे प्रश्न