झेन कथा ५- आज्ञाधारक

Submitted by ठमादेवी on 11 March, 2011 - 03:43

गुरू बंकेईचे विचार ऐकायला फक्त विद्यार्थीच नव्हे तर इतरही वेगवेगळ्या धर्माचे पंथांचे आणि व्यवसायातले लोक येत असत. तो कुठलेही मंत्र ऐकवत नसे किंवा चर्चांमध्येही सहभागी होत नसे... एके दिवशी एका चौकात तो व्याख्यान देत असताना एक माणूस उभा राहिला आणि म्हणाला,

जे लोक तुझा आदर करतात ते तुझ्या आज्ञेचं पालन करतात ना?

बंकेई म्हणाला, हो हे खरं आहे...
त्यावर तो माणूस म्हणाला, पण मी तुझा आदर करत नाही... मी तुझ्या आज्ञा ऐकणार नाही... मला बघायचंय की तू मला आज्ञा कशी पाळायला लावतोस...

बंकेई म्हणाला, तू लांबून का बोलतो आहेस? समोर येऊन बोल... माझ्या जवळ ये...

तो जवळ आला... मग बंकेई म्हणाला, माझ्या डाव्या बाजूला येऊन बोल... मग तो माणूस त्याच्या डाव्या बाजूला जाऊन बोलण्याचा प्रयत्न करू लागला...

बंकेई म्हणाला, एक काम कर... माझ्या उजव्या बाजूला ये... मला वाटतं आपण असं नीट बोलू शकू... तो माणूस उजव्या बाजूला जाऊन उभा राहिला...

बंकेई मग म्हणाला, बघ आत्ताच तू माझ्या आज्ञेचं पालन करतो आहेस... तू चांगला आणि संवेदनशील दिसतोस... आता बस आणि ऐक...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा - you are there Happy

बंकेई म्हणाला, एक काम कर... माझ्या उजव्या बाजूला ये... मला वाटतं आपण असं नीट बोलू शकू... तो माणूस उजव्या बाजूला जाऊन उभा राहिला...

आता मधला भाग ................

Bankei said, "You are obeying me and I think you are a very gentle person..."
"You see, you have already obeyed, and I have not ordered. I don't order my disciples, I don't require their respect. If they respect, that is another thing. IF THEY FOLLOW, THAT IS THEIR DECISION; they are not in any way obliged to follow. If they surrender, that is on their own accord, that is their joy. Now sit down and listen."

--------------

Zen is so obvious. It is just like this: Come to my left side, come to my right side.That is the beauty of the master: he never orders you and you start obeying him. He never tells you what to do, and you start doing things that he would like you to do. That's the beauty of a Master. That is his non-violent message. His each gesture, his smile, the raising of his hand, start creating in you something. He is tremendous energy -- that energy starts vibrating in you, moving you, changing you, transforming you, transporting you into another world.

Bankei has shown a very simple fact, that ZEN has no commandments, Zen is very obvious. It is like if I say, "This is the door, please get out by this rather than getting out by the wall." What are you going to do? Will you try to get out by the wall just to disobey me? Then you will be simply stupid and you will be hurt.

Zen says the truth is so simple and so obvious, we need not force anybody to follow. It is just like showing him: "This is the door, sir, and this is the wall. Now it is up to you. If you want to get out you can get out by the door, but if you want to struggle, you can try through the wall -- and get hurt in your head! This is up to you."

-Osho

छान आहे ही पण.

Bankei has shown a very simple fact, that ZEN has no commandments, Zen is very obvious. It is like if I say, "This is the door, please get out by this rather than getting out by the wall." What are you going to do? Will you try to get out by the wall just to disobey me? Then you will be simply stupid and you will be hurt.
>>>>> हे लै भारी आहे. साधं आणि सरळसोपं अगदी.

असल्या आज्ञा कोणीही पाळेल!

अरे? लांबून काय बोलतोयस? मला ऐकू येत नाही. इथे येऊन बोल.

अरे माझा डावा कान बधीर आहे, माझ्या उजवीकडे ये!

=========================================

काही काल्पनिक आज्ञा!

अरे? नुसता काय रागावतोस? माझ्या एक कानाखाली मार!

अरे? इतकी हळू काय मारतोस? खण्णकन मार!

हां! आता जरासा सुजला कान! पण तुझा राग शांत झालेला दिसत नाही.

'तो' उत्तरला.

"तुला बडवल्याशिवाय तो शांत होणारही नाही"

"अरे मग बडव ना?"

बडवीन झाल्यावर बन्केई म्हणाला..

"माझ्या सर्व आज्ञा तू पाळल्यास. मोठा संवेदनशील दिसतोस. "

"आता मला निघूदेत" - 'तो' म्हणाला...

"जरूर... तुला पटलेलंच आहे की तू माझ्या सर्व आज्ञा पाळल्यास.. आता तू येथून जायला व माझ्या महतीचा प्रचार करायला मोकळा आहेस"

"पण जाऊ कुठून???"

"हे काय दार??? ज्ज्जा?? ज्ज्जा बरं इथनं???"

"ह्यॅ! फेकतो काय? ही भिंत आहे."

"मी म्हणालो हे दार आहे याचा अर्थ हे दार आहे.. आता तू काय भिंतीवर डोकं आपटून प्रयोग करणार आहेस??"

'तो'ने दार ढकलले.

दुर्दैवाने दाराने बन्केईची आज्ञाच पाळली नाही. त्यामुळे चिडलेल्या बंकेईने त्या काल्पनिक दारावर लाथा घातल्या. तोवर तो 'तो' भिंतीतून पसार झालाही.

तात्पर्यः स्वतःला शहाणे समजणार्‍यांना तात्काळ ओळखावे व ते जे म्हणतील त्याच्या बरोब्बर उलटे करावे.

बेफिकीर .. कैच्याकै Rofl

@ठमादेवी : ऊपक्रम चांगला चालु आहे .. पण सर्व लिंक्स एकत्र जोडुन लिहील्या तर ऑर्गनाईज्ड राहील तुमचे लेखन आणी आणखीन कोणाला लिंक पाठवायची असेल तर सोईचे होईल..

बेफिकिर.. 'सुशि' चे भक्त आहात की काय? तुमचा उतारा 'सुशि' चा म्हणून सांगितला असता तरी ते पटले असते.. लगे रहो.. Happy

कोमुतै, छान आहे पण जरा अपुर्ण वाट्ली.

बेफि,
हां! आता जरासा सुजला कान! पण तुझा राग शांत झालेला दिसत नाही.

'तो' उत्तरला.

"तुला बडवल्याशिवाय तो शांत होणारही नाही"
"अरे मग बडव ना?">>> Rofl

"अरे मग बडव ना?"
तो मग बेफिला बडवतो.

बेफि म्हणतो
"माझ्या सर्व आज्ञा तू पाळल्यास. मोठा संवेदनशील दिसतोस. "