झेन कथा- २... नदी आणि सुंदर तरूणी

Submitted by ठमादेवी on 9 March, 2011 - 03:08

तांझन आणि एकिडो हे दोन झेन धर्मगुरू भर पावसात चिखल भरलेल्या रस्त्यावरून जात होते... समोर एक नदी होती, ती भरून गेली होती आणि किमोनो घालून चाललेल्या एका सुंदर तरूणीला ती ओलांडता येत नव्हती. तांझनने तिला आपल्या दोन्ही हातांवर उचलून घेतलं आणि नदी पार केली... ती तरूणी त्याचे आभार मानून निघून गेली. एकिडो काहीच म्हणाला नाही. शेवटी रात्री त्याने विषय काढलाच,

आपण धर्मगुरू आहोत आणि आपल्याला स्त्रियांच्या, विशेषतः सुंदर स्त्रियांच्या जवळ जाण्याची परवानगी नाही... तू त्या मुलीला उचलून का घेतलंस?

तांझनने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, अरे, मी तर तिला तिथेच सोडून सुद्धा दिलं... तू तर इथपर्यंत घेऊन आलायस आणि अजूनही घेऊन फिरतो आहेस!!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त..

कथा आवडली .
मराठीत पण याच आशयाची कथा आहे .एक धर्मौपदेशक असतो .त्याच्या घरासमोर एक वेष्या रहात असते.त्याच्या मनात सारखे वेष्येचे विषय येत असतात तर वेष्येच्या चिंतनात धर्मगुरूबद्दल अपार आदर व
ईश्वरश्रद्धा सतत जागृत असतात .योगायोगाने त्या दोघांचा मृत्यु एकाच दिवशी होतो .धर्मगुरूच्या अंत्ययात्रेत सर्व नगर सामील होते पण वेश्येला सर्व ओळखत असूनही तिच्या देहाला अग्नी द्यायला कोणी
नसत .शेवटी ते असच दहन केल जात .पुढच्या प्रवासात मात्र वेष्येला स्वर्गात स्थान मिळत तर धर्मउपदेशक असूनही त्याला नर्कात स्थान मिळत .याच कारण त्या दोघांच्या चिंतनातील तफावत .त्याच
सत्कार्य असूनही विषय चिंतन होत तर तिच विषयासक्त कर्म असूनही तिच्या चित्तात विषयाचा लेप सुद्धा
नव्हता .

माझ्या मते तार्त्पयः
आपले कार्य आणि कृत्य हे जर निर्मळ असले तर आपले विचार वाईट गोष्टींपासुन कोसो दुर असतात. आणि जर का आपले विचारच वाईट असतील तर कितीही सत्कर्म केले तरी त्या सर्वांवर पाणी फिरलेतेच असे समजा.
B पोसिटिव. (B+)

छाया ही कथा मी वाचली होती आधी कधीतरी... पण पुन्हा वाचायला मजा आली...
सर्वांचे आभार...
मला वाटतं की या कथेचं तात्पर्य असं असावं- एखाद्या घडून गेलेल्या गोष्टीचा विचार करून आपला आत्ताचा जगण्याचा क्षण वाया घालवू नये..

इथे स्वत: लिहीलेलं साहित्य टाकणं अपेक्षित आहे. झेन कथा नव्हे असं वाचल्याचं आठवतंय. खात्री करण्यासाठी पुढची लिंक बघावी. Happy

गुलमोहर/साहित्य लेखन
कथा, कविता, कादंबरी, ललित, लेख, विनोदी या सर्व प्रकारांसाठी. तसेच आपली चित्रकला, फोटोग्राफी तसेच इतर कलांसाठी हा लेखन प्रकार निवडा. येथे फक्त स्वत:च्या मराठीत लिहिलेल्या कलाकृती/ लेखन सादर कराव्यात.

मंदार जोशी, हे आपण अ‍ॅडमिनला का सांगत नाही? आणि मी पहिल्याच कथेच्या वेळी स्पष्ट केलं होतं की या माझ्या कथा नाहीत... अ‍ॅडमिनला आक्षेप असला तर मी बंद करेन... तुम्ही सांगायचं काहीच कारण नाही...

नियम वगैरे सगळं मला माहीत आहे... तुम्ही सांगण्याची गरज नाही... धन्स... आणि हो, दॅट इज नन ऑफ युवर बिझनेस... अ‍ॅडमिनला आक्षेप असेल तर ते बंद करतील...

झेन कथा... जपानी संस्कृतीतल्या या कथा भारतात फारशा ठाऊक नाहीत... पण या कथा वाचकांच्या मनात घर करून जातात... तेराव्या शतकात जपानी धर्मगुरू मुजू याने सांगितलेल्या या कथा आजही तितक्याच आवडीने वाचल्या जातात.
रोजच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाकण्याची ताकद या अवघा चारेक ओळींच्या कथांमध्ये आहे... या फक्त १०१ कथा आहेत... पण प्रत्येक वेळी वाचताना त्या एक नवी अनुभूती देतात... विसाव्या शतकाच्या सुरूवातीला त्या इंग्रजीत आल्या आणि नंतर संपूर्ण जगभर पसरल्या... जीवनाचा वास्तववादी दृष्टिकोन देणार्‍या या कथा अत्यंत सुंदर आहेत...
यातल्या काही कथा एकेक किंवा एका वेळी दोन अशा पद्धतीने देण्याचा माझा विचार आहे... या माझ्या कथा नाहीत. किंवा मी माझ्या मनाने त्यात काही कल्पनाविलासही केलेला नाही. त्यामुळे मला क्रेडिट नकोच आहे... पण या कथांनी मला कठीण परिस्थितीत मार्ग दाखवला आहे... निर्णय कसे घ्यावेत हे शिकवलं आहे... त्या मायबोलीच्या वाचकांशी शेअर कराव्याशा वाटतात... हा केवळ वाचनानंद आहे, दुसरे काही नाही... वाचकांना आवडल्या तर आणखी कथा देईन...>>>> हे डोळे उघडून वाचा... असो... या विषयावरचे हेमाशेपो

तांझनने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, अरे, मी तर तिला तिथेच सोडून सुद्धा दिलं... तू तर इथपर्यंत घेऊन आलायस आणि अजूनही घेऊन फिरतो आहेस!!!>>>> आलं ध्यानात, छान आहे. Happy

ठमादेवी | 26 February, 2011 - 12:08
पूर्वी कुठेतरी वाचली होती ही कथा... शब्द तुझे असले तरी कथा तुझी नाही हे निश्चित... मला फार पूर्वी माझ्या आजोबांनी वाचून दाखवलेली आणि कुठेतरी वाचलेली झेनपुराणात किंवा आणखी कुठेतरी वाचलेली आठवतेय... तुझी शैली छान आहे...!!

पण कथा डिट्टो आहे

Rofl

पंत Biggrin

ठमे तु लिहित रहा. मी अ‍ॅडमिनला सांगून निवडकची संख्या वाढवायला सांगतो. निवडक १०० करा म्हणून. Happy कारण मला एवढंच कळतं कि ज्यातुन मला योग्य मार्गदर्शन मिळतं ते अ‍ॅक्सेप्टेबल आहे.

किर्तनकारांना स्वत:चेच काय ते अभंग बनवावे लागतील. पुराणाचा कुठलाही संदर्भ न घेता.

Pages