रिक्षावाला

लावतोय रिक्षावालाsss...

Submitted by तुमचा अभिषेक on 10 March, 2022 - 17:27

लावतोय रिक्षावालाsss...

संध्याकाळची वेळ ५.२५ पीएम

तशी आमची गार्डनला जायची वेळ पाचचीच. थोडेसे ऊजेडात खेळावे. ब्रेक घेत सुर्यास्त बघावा. मग थोडे अंधारात बागडावे. हे आमच्या गार्डनशैलीला साजेसे. पण आज ऊशीर झालेला. सोबत दोन नाही तर एकच मुलगा होता. त्यामुळे विचार केला आज एखादे छोटेसेच पण वेगळे गार्डन शोधावे.

विषय: 

बघतोय रिक्षावाला .. ग्ग वाट माझी बघतोय रिक्षावाला

Submitted by अंड्या on 5 March, 2014 - 10:31

ट्रेन तशी रिकामीच होती, जे फर्स्टक्लास म्हटलं की ओघाने आलेच. पण जरा जास्तच रिकामी बघून ‘च्याईला सेकंडक्लासच्या तिकिटाने पण काम झाले असते की राव’ अशी चुटपुट लागलीच. आता एक पैसा वसूल झोप घ्यावी असे ठरवले आणि वारा खिडकीचे गज कापत आत येईल अशी विंडोसीट पकडून लवंडलो. दुसर्‍याच मिनिटाला डोळा लागला आणि पाचच मिनिटांत उघडावा लागला. च्याईला, फर्स्टक्लासमध्ये पण भिकारी. ते देखील इंग्लिशमध्ये गाणारे, पेटीच्या जागी गिटार आणि तबल्याच्या जागी ड्रमसेट. झोपेच्या नादात चुकून ट्रेन ईंग्लंडला तर नाही ना घेऊन आलो. श्या, वैतागतच डोळे उघडले तर समोरच एक महाशय मांडीवरती लॅपटॉप उघडून बसले होते.

विषय: 

जीव !

Submitted by vaiddya on 9 February, 2011 - 13:50

पुण्यात इकडे-तिकडे फिरण्यासाठी मी बस किंवा रिक्षाचा वापर करतो. बर्‍याचदा रिक्षा हाच पर्याय पुण्याच्या बस-कंपनीच्या “एक्स्ट्रा”ऑर्डिनरी कारभारामुळे सोयिस्कर वाटतो .. आणि इतरवेळी आपला जो मार्ग असतो तो कोणत्याही बस-मार्गामधे येत नसल्याने रिक्षा हा एकच पर्याय स्वतःचं वाहन नसलेल्या कोणाही माणसांपुढे उरतो. मीं अश्या लोकांमधे येत असल्याने मी रिक्षाने फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरून लॉ कॉलेज रस्त्याकडे जाण्यासाठी एक रिक्षा मिळवून आत बसलो. मला जिथे जायचं होतं ती कांचन गल्ली रिक्षाचालकाला माहित असल्याने मला फारसं काम उरलं नव्हतं .. मी प्रथम इकडे-तिकडे पाहात होतो ..

गुलमोहर: 
Subscribe to RSS - रिक्षावाला