जय मल्हार

यळकोट मल्हारी

Submitted by संतोष वाटपाडे on 8 February, 2016 - 05:00

उधळली हळद भंडार गडावर जागर हा मंदिरी
खंजिरी वाजली तशी गरजली सोन्याची जेजुरी
म्हाळसा सुंदरी उभी सोबती बानू हरहुन्नरी
यळकोट मल्हारी तुझा संबळे दुमदुमले अंबरी...

पायरी शेकडे चार उत्तरी द्वार कैक दिपमाळी
हेगडीप्रधानापुढे बांधुनी कडे गरजते टाळी
भंडार उधळ भंडार उधळ भंडार शिवाच्या घरी
यळकोट मल्हारी तुझा संबळे दुमदुमले अंबरी...

पायथ्यास मोठा थाट वाकडी वाट गडाच्या दारी
बैसला रुद्र रानात रुंद हातात तेज तलवारी
मानात उभी पार्वती तसा संगती मेघडंबरी
यळकोट मल्हारी तुझा संबळे दुमदुमले अंबरी...

सोन्याची जेजुरी.... उजळली रायाची पंढरी
टाळ नाल पखवाज ...वाजला थरथरली पायरी..

रंगरेषांच्या देशा - तुझे रुप चित्ती राहो ।। जय मल्हार ।।

Submitted by MallinathK on 22 September, 2015 - 04:54

।। जय मल्हार ।।

'तुझे रुप चित्ती राहो' म्हणत हे [^] चित्र काढले तरी हाताची शिवशिव काही कमी होत नव्हती. म्हणुन अजून एक कागद काळा केला. हुबेहूब काढणे जमले नाही, पण हाताची शिवशिव थोडी कमी झाली Happy

माध्यम - पेन्सिल आणि पिवळा रंगखडु.
फोटोला बॉर्डर लावण्यासाठी पिकासा वापरला आहे.

(क्लिक टु एन्लार्ज. )

येळकोट येळकोट जय मल्हार!

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

येळकोट येळकोट जय मल्हार!
elkot [800x600].jpg

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - जय मल्हार