धुरंधर बद्दल अनुपम चोप्रा यांनी संतुलित मत व्यक्त केलं आहे. माझ्या मते त्या कोणत्याही पक्षाच्या नाहीत. तसेच त्यांचे वय आणि अनुभव बघता दोन गोष्टी त्या सांगू शकतात. पण त्यांचा रिव्ह्यू आल्याबरोबर त्यांना गलिच्छ भाषेत ट्रोल केले गेले. ही गोष्टच पुरेशी आहे कि धुरंधर हा पॉलिटिकल अजेण्डा रेटण्यासाठी बनवलेला चित्रपट आहे.
सध्या 'ना तो कारवाँ की तलाश है' मीम्स नी धुमाकुळ घातलेला आहे.
तर त्याची मायबोली व्हर्जन लिहा बरं!
नाम क्या है?
- अतीफ अस्लम
क्या कर रहे हो यहाँ?
- काम ढूंढ रहाँ हूं जनाब!
क्या कर सकते हो?
- बर्तन, साफ सफाई सब कुछ कर सकता हुं
बिर्यानी खाओगे?
- अंजलीच्या रेसिपीने केली आहे का? . अॅ sss ऑsss.. उप्प्स्स्स!!
लावा आणखी माबो तडका! होऊन जाऊ द्या!
५ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’ या चित्रपटाने अवघ्या दहा दिवसांत देशभरात ३५० कोटी रुपयांहून अधिक कमाई करत अनेक विक्रम मोडले. चित्रपटगृहांतील वातावरण पाहता हा चित्रपट आणखीही अनेक विक्रम मोडेल, याचा अंदाज बांधणे कठीण नाही. मात्र या कमाईपेक्षाही अधिक महत्त्वाची कमाई म्हणजे प्रेक्षकांच्या प्रतिसादाच्या रूपाने या चित्रपटाला मिळत असलेली दाद. लोक प्रचंड उत्साही आहेत आणि या चित्रपटाला पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा उघड करणारा चित्रपट म्हणून संबोधत आहेत.
हा पिक्चर आल्यापासून इंटरनेटवर अक्षय खन्ना आणि त्याचा रेहमान डकैत छा गया है.
अक्षय खन्नाबद्दलचे एव्हढे लेख होतकरूंनी लिहीले आहेत कि लेखक समुदायाचा विस्तार झाल्याचा सुखद अभिमान वाटू लागला आहे. अनुभवावरून सांगतो कि लेखक हा वाचक असेलच असं नाही. वाचक होण्यासाठी लेखकाला कष्ट घ्यावे लागतात. त्याच्याकडे एक शक्ती असते ज्यामुळे वाचन करून लिहीणे अशा फुटकळ आणि सामान्य पद्धतींना फाट्यावर मारून तो लेखक बनू शकतो.