धुरंधर बद्दल अनुपम चोप्रा यांनी संतुलित मत व्यक्त केलं आहे. माझ्या मते त्या कोणत्याही पक्षाच्या नाहीत. तसेच त्यांचे वय आणि अनुभव बघता दोन गोष्टी त्या सांगू शकतात. पण त्यांचा रिव्ह्यू आल्याबरोबर त्यांना गलिच्छ भाषेत ट्रोल केले गेले. ही गोष्टच पुरेशी आहे कि धुरंधर हा पॉलिटिकल अजेण्डा रेटण्यासाठी बनवलेला चित्रपट आहे.
भाजप सरकार आल्यानंतर अजेण्डा रेटणारे अनेक सिनेमे आले. त्यातले जे अगदी वाईट होते ते आपटले. पूर्वीही अजेण्डा असलेले सिनेमे असायचे. पण त्यांचा हेतू वाईट नव्हता. मसाला चित्रपटातून धार्मिक एकतेचा अजेण्डा दाखवला जाई . अमर अकबर अँथनी सारखे. तर तत्कालीन सरकारवर टीका करणारे चित्रपट तेव्हांही असत. आणिबाणीच्या काळात आंधी आणि किस्सा कुर्सीका असे दोन सिनेमे आले ज्यांच्यावर बंदी आणली. यातला आंधी हा नंतर कल्ट सिनेमा ठरला. किस्सा कुर्सी का कधी बघायला मिळाला नाही. आंधी राजकीय आहे पण राजकीय अजेण्डा त्यात नाही. तरीही त्याच्यावर बंदी आली.
त्यानंतर मसाला फिल्म्स मधून कायदा हातात घ्यायला सांगणारा सुप्त अजेण्डा असलेले अनेक सिनेमे आले. या सिनेमांमधून व्यवस्थेविरोधात असंतोष अजाणतेपणी पेरण्यात आला. उदा शोले मधे अहिंसेवरचं ठाकूरचं भाष्य हे बहुसंख्य प्रेक्षकांना अहिंसा हे कुचकामी तत्व असल्याचे पटवून देते. चित्रपट हे प्रभावी माध्यम आहे. यानंतर नायकाने कायदा हातात घ्यायचे समर्थन असलेले अनेक सिनेमे आले. यातून व्यवस्था आपल्यासाठी नाही आणि आपल्याला कायदा हातात घ्यायला हवा असे लोकांना वाटू लागले. आज पन्नाशीत असलेले अनेक अ़कल्स याचे शिकार आहेत. यातल्या काहींनी रस्त्यावर तर काही ज्यांना रस्त्यावर अँग्री यंग मॅन होणे शक्य नव्हते ते आता सोशल मीडियात तो राग काढत असतात.
चित्रपट किंवा कोणत्याही माध्यमाचे सूक्ष्म आणि मोठे परिणाम होत असतात. ज्यांना या माध्यमाची शक्ती ं माहिती आहे त्यांच्यासाठी ते नवीन नाही. चित्रपट आहे चित्रपटासारखा पहा हे सांगणारे पण ते स्वतःच्या पदरचे सांगत नसतात. एकतर अशा कोणत्यातरी चित्रपटाच्या पीआर ने एन्फ्ल्युएंसर्सना हाताशी धरून पेरलेली ही चटपटीत वाक्ये लोक आपली म्हणून दामटून देत असतात.
बंगाल फाईल्स, आसाम फाईल्स असे आलेले अनेक चित्रपट आपटले. काही चालले. चाललेल्या पैकी काही वाईट होते तर काही चांगले होते. उरू हा चित्रपट उत्कंठावर्धक होता. देशप्रेमाची फोडणी ओतप्रोत असली तरीही चित्रपट म्हणून तो कुठेच कमी पडत नव्हता. तसेच धुरंधरच्या बाबतीत आहे. यावर जास्त बोलत नाही कारण ध्रुव राठीने ते काम प्रभावी पणे केलेले आहे.
पण अनेक प्रश्न या व्हिडीओ नंतरही शिल्लक राहतात.
ध्रुव राठीने मोदी सरकार गद्दार कसे असेल असा प्रश्न कुठल्यातरी चित्रपटाच्या बाबतीत कि भाषणाच्या बाबतीत उपस्थित केला आणि आता तो विचारतो कि मनमोहन सरकार गद्दार कसे असेल ? हे भूमिकेतले सातत्य मान्य आहे.
मात्र इंटेल असतानाही २६/११ चा हल्ला जर होत असेल तर त्याबद्दल शंका उपस्थित झालीच पाहीजे. आम्ही तुमच्यवर शंका घेत नाही, तुम्ही आमच्यावर घेऊ नका, फिट्टंफाट हा फालतूपणा देशाच्या दृष्टीने घातक आहे.
राजकारण करताना काही पथ्ये पाललीच पाहीजेत. बघा तुम्ही आमचे २६/११ काढले तर आम्ही तुमचे कंदाहार काढू, म्हणुन दोघेही गप्प बसू याला काही अर्थ नाही. जनतेला कंदाहार मधे इंटेल असताना चूक का झाली या प्रश्नाचे उत्तर हवे आहे. तसेच कारगिल प्रकरणात इंटेल असतानाही घुसखोरी झाली, तोफा आल्या याची चौकशी होऊन जनतेला माहिती मिळाली पाहीजे.
देशात फक्त दोन सत्ताधारी पक्ष अस्तित्वात आहेत या भ्रमात कुणी राहू नये. हू किल्ड करकरे या पुस्तकात उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे आजवर मिळालेली नाहीत.
तसेच पुलवामा अॅटॅक का झाला कसा झाला, आर डी एक्स कसे आले, एक संशयास्पद पोलीस अधिकारी आणि त्याची भूमिका याबद्दल देशाला माहिती व्हायलाच हवी.
या घटना तोडून मोडून आपल्या राजकीय फायद्यासाठी दाखवणारा धुरंधर चित्रपट आहे म्हणुन चित्रपटासारखा पहा असे सांगणार्या चित्रपट पंडीतांना हात जोडून नमस्कार.
ध्रुव राठीच्या निमित्ताने अनेक प्रश्न आहेत. त्यांची उत्तरे देशाला कधी मिळणार ?
चित्रपट आहे चित्रपटासारखा पहा
चित्रपट आहे चित्रपटासारखा पहा हे सांगणारे पण ते स्वतःच्या पदरचे सांगत नसतात. एकतर अशा कोणत्यातरी चित्रपटाच्या पीआर ने एन्फ्ल्युएंसर्सना हाताशी धरून पेरलेली ही चटपटीत वाक्ये लोक आपली म्हणून दामटून देत असतात. >> हे खूप आवडले.
चित्रपट पाहिल्याशिवाय त्याच्यावर बोलू नका हे वाक्य संघात गेल्याशिवाय संघावर बोलू नका या पालुपदाची आठवण करून देणारे आहे.
धागा पाहिला होता. पण ध्रुव
धागा पाहिला होता. पण ध्रुव राठीचा व्हिडीओ पाहिला नव्हता. शोधून पाहिला. कौतुक करावं तेव्हढं थोडंच आहे. आपलं म्हणणं पटवून देण्यासाठी नेमके संदर्भ कसे द्यावेत, किती अभ्यास असावा हे त्याच्याकडून शिकण्यासारखे आहे.
मला स्वतःला धुरंधर मधे राजकीय अजेंडा असल्याने फारसा फरक पडणार नाही कारण तथ्ये कशी शोधायची हे समजतं. पण हे अनेकांना ठाऊक नसतं हे मला चांगलंच माहिती आहे. त्यांना ते खरंच वाटेल. बरेचदा काही लोकांना डॉक्युमेंटरीज, लेख, पुस्तकं काही नको असतं. त्यांना वास्तववादी असा आभास केलेल्या चित्रपटात दाखवलेलं खरंच आहे हे वाटू शकतं.
शोले पाहिला. अहिंसेबद्दलचा संवाद पण ऐकला. पण ती त्या कथेची डिमांड असू शकते असं वाटलं. त्याचा कुणावर छुपा परिणाम होऊ शकेल असं त्या वेळी मला बिल्कुल वाटलं नाही. पण माझं आकलन चुकीचं असू शकतं.
अमूक एक सिनेमा पाहिला नाही तर तुम्ही अमके तमके याचा मात्र प्रचंड तिटकारा आहे. आणि आता अशा विषयांवर बोलायचे थांबवणार आहे. कारण मनाविरूद्ध असले कि लोक लगेच फुली मारतात.
'ऑपरेशन सिंदूर' च्या फियास्को
'ऑपरेशन सिंदूर' च्या फियास्को नंतर आपला इगो सुखावणारे असे काही लोकांना हवेच होते. 'झूठी सही मगर तसल्ली दिलादे....'' प्रमाणे.
एखाद्या सिनेमात अतिशयोक्ती असणे, थोडा मालमसाला असणे, अगदी रोमांस घुसवणे समजू शकतो, पण एकच राजकिय पक्ष खरा देशभक्त, इतर सारे देशद्रोही' हा जो प्रचार आहे तो आक्षेपार्ह (आणी अर्थातच खोटा )आहे. तात्कालीन अर्थमंत्री यांच्या विरुद्ध कुजबुज मोहिमही अशीच..
शेवटी' ये नया भारत है घर मे घुसके मारता है' अशी पाटी आहे म्हणे.
'ट्रंप के कहने के बाद चुपचाप शस्त्रसंधी करता है' हे कंसात घालायला विसरले बहुदा.
१९७१ नंतर प्रथमच भारताने
१९७१ नंतर प्रथमच भारताने जवळजवळ संपूर्ण पाकिस्तानात हवाई हल्ले करून ठोस प्रत्युत्तर दिले.
ट्रम्पचं विधान खर धरले, तर काश्मीर प्रश्न हजार वर्षांपासूनचा आहे म्हणाव लागेल.
मोदी सरकार सत्तेत आल्यापासून भारत केवळ सहन न करता प्रत्युत्तर देतोय, आणि प्रत्येक वेळी प्रत्युत्तर मागील वेळेपेक्षा अधिक कडक आहे.
त्यामुळे op सिंदूर फियास्को वगैरे काही नाही.
लेखात लिंक द्यायला पाहीजे.
लेखात लिंक द्यायला पाहीजे.
लोकसत्ता : धुरंधर धोकादायक चित्रपट ,कारण..
https://www.loksatta.com/manoranjan/dhurandhar-more-dangerous-than-bakwa...
ट्रम्पचं विधान खर धरले, तर
ट्रम्पचं विधान खर धरले, तर काश्मीर प्रश्न हजार वर्षांपासूनचा आहे म्हणाव लागेल. >>> ट्रंपने सांगितल्या नंतर शस्त्रसंधी केली कि नाही हा प्रश्न आहे ना ? कि हे खोटं आहे ?
पहलगाम मधे अतिरेकी पोहोचले कसे ? हा जो कुणी धुरंधर होता त्याला गझनी सारखा शॉर्ट टर्म लॉस होता का ?
२६ / ११ चे इनपुटस त्याने दिले पण सरकार निकम्मे होते. मग पहलगामच्या वेळी हा गुंगीत होता का ? पुलवामा च्या वेळी त्याने सोमरस, भांग,गांजा यापैकी कशाचा आनंद घेतला होता का? कारगिलच्या वेळी त्याच्या मेंदूला सूज आली होती का ? कंधाहार प्रकरणाच्या वेळी देशभक्त सरकार असताना त्याला लकवा मरला होता का ?
लिंक द्यायची गरज आहे का ? युट्यूबवर सहज सापडेल.
खोटं आहे, ट्रम्प नेहमी बरळत
खोटं आहे, ट्रम्प नेहमी बरळत असतो त्यात नवीन काही नाही.
भारतातील अतिरेकी हल्ले फार फार तर कमी होतील संपणार नाहीतच. मग सरकार कोणाचं का असेना.
धुरंधर हा अजेंडा असलेलाच चित्रपट आहे. कारगिलच्या आणि कंधाहारच्या फार नंतर त्याला पाकिस्तानातं पाठवलेले दाखवलं आहे. कदाचित त्यावेळी तो जेल मध्ये असेल. त्यासाठी दुसरा भाग बघावा लागेल.
एके काळी उजव्या विचारांच्या
एके काळी उजव्या विचारांच्या लोकांचं रशियाच्या नावाने पित्त खवळत असे. कारण त्यांच्या मते अमेरिका आणि इस्त्राएलशी जुळवून न घेतल्याने भारताचं नुकसान झालं. आज ट्रंप काहीही बरळत असतो इथपर्यंत प्रगती झाली.
तुमच्या मते ट्रंपने धमकी दिल्यानंतरही भारताचे हल्ले चालूच राहीले आणि भारताने पीओके घेतला बलुचिस्तान वेगळा केला. ही रिअॅलिटी आहे का ? या प्रश्नाचे उत्तर पाहून तुमच्यावर किती वेळ घालवायचा हे ठरवायला मदत होईल.