लोणावळा

लोणावळा

Submitted by पल्ली on 4 July, 2016 - 05:53

घामानं उकाड्यानं हैराण झालो होतो म्हणून लोणावळ्या ला जायचं ठरवलं,
सकाळी सकाळी फक्त चहा पिऊन बाहेर पडलो, म्हणजे ब्रेक फास्ट न करता
हवा छान होती, सीडी वर एकसे एक गाणी वाजत होती आणि आमची तोंडही ..
कुठेही न थांबता सरळ लोणावळ्याचं मन:शक्ती केंद्र गाठलं, एक नंबर ब्रेक फास्ट मिळतो इथे.
श्रावणीच्या वेळी प्रेग्नंट असताना मी इथे गर्भ संस्कार शिबिराला आले होते. इथलं वातावरण छान असतं. मेन म्हणजे शि-शु केंद्राची सोय अगदी स्वच्छ आहे.
आता पर्यटन. लोणावळा हे ठिकाण अद्भुत निसर्गानं नटलेलं, आधुनिकता आणि जुन्या अस्तित्वाच्या खुणा जपणारं आहे...
इतका नयनरम्य नजारा होता की क्या बात!

विषय: 
शब्दखुणा: 

एका प्रवासाची गोष्ट

Submitted by आनंदयात्री on 21 November, 2011 - 04:35

शनिवार, १९ नोव्हेंबर २०११ रोजी सायंकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी सीएसटीहून सुटलेल्या "११०२३ डाऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई ते छत्रपती शाहू महाराज टर्मिनस,कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेस"मधल्या दोन तासांच्या प्रवासाची ही गोष्ट आहे!

गुलमोहर: 

भटकंती कोराईगडाची

Submitted by जिप्सी on 5 December, 2010 - 11:06

बर्‍याच दिवसांपासुन ऑफिसच्या मित्रांबरोबर कुठे Weekend Outingला गेलो नव्हतो (आमच्या Weekend Outing मध्ये बाईकवरून ट्रेकिंग, समुद्रकिनारे, रीसॉर्ट, वॉटरफॉल्स इ. सगळेच असते (थोडक्यात काय तर बाईकवरून मस्त भटकायचे) ;-)). त्यामुळे आता कुठेतरी जायचेच असे सर्वानुमते ठरले आणि एक Warm Up ट्रेक म्हणुन कोराईगडाची निवड झाली :-). आणि आम्ही ७ जण ४ बाईकवर कोराईगडाच्या भटकंतीला निघालो. खरंतर हा गड ट्रेकिंगसाठी नाहीच आहे. पायर्‍यांच्या मार्गे तुम्ही २०-२५ मिनिटात गडाच्या माथ्यावर पोहचू शकतात (पेठ शहापूर मार्गे).

गुलमोहर: 

भारतातील पहिले "सेलिब्रिटी वॅक्स म्युझियम"

Submitted by जिप्सी on 28 November, 2010 - 23:42

लंडनमधील मादाम तुसॉं या प्रसिद्ध वॅक्‍स म्युझियमच्या (मेणाच्या पुतळ्यांचे संग्रहालय) धर्तीवर लोणावळा येथे उभारले आहे भारतातील पहिले सेलिब्रिटी वॅक्स म्युझियम. तेंव्हा आता मेणाचे पुतळे बघायला लंडनला जायची गरज नाही. Happy सुनिल कंडल्लूर या केरळ येथील तरूणाने हे म्युझियम उभारले असुन सध्या येथे २५ सेलिब्रिटींजचे मेणाचे पुतळे आहेत. १९९३ साली फाईन आर्ट्समध्ये डिप्लोमा केलेल्या सुनिलचे स्वप्न आहे मुंबईत वॅक्स म्युझियम उभारण्याचे.

गुलमोहर: 
Subscribe to RSS - लोणावळा