उपग्रह वाहिनी

टीव्ही चॅनेल, TV Channel

जाडूबाई जोरात - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 12 July, 2017 - 10:57

जाडूबाई जोरात ही विनोदी मालिका झी मराठी वर २४ जुलै पासून (सोमवार ते शुक्रवार, दुपारी १ वाजता) चालू होतेय.
किशोरी शहाणे आणि निर्मिती सावंत कलाकार आहेत.

आधीचा धागा दोन मालिकांचा सोबत आहे म्हणून हा वेगळा काढलाय जेणेकरून वेगवेगळं चर्वितचर्वण (चांगलं/वाईट दोन्ही इथेच) करता येईल.
चला सुरू व्हा... Wink

जामोप्या आणि जाबाजो

Submitted by वेडोबा on 2 July, 2017 - 14:25

झी मराठीवर जागो मोहन प्यारे आणि जाडूबाई जोरात या दोन मालिका सुरू होत आहेत. कलाकार जामोप्या - अतुल परचुरे , सुप्रिया पाठारे & शृती मराठे .. जाबाजो- निर्मिती सावंत @ किशोरी शहाणे ... सगळे भारी कलाकार आहेत आणि आपले आवडते.. दोन्ही वर चर्चा करूया इथे...

गेम ऑफ थ्रोन्स (Game of Thrones)

Submitted by रसप on 29 June, 2017 - 02:50

'गेम ऑफ थ्रोन्स' बद्दल खूप ऐकून होतो. त्याच्याशी तुलना करून भारतीय चित्रपटांन तुच्छ लेखणंही वाचलं, ऐकलं. हे सगळं इतकं झालं की आधी कंटाळा, मग वैताग आला. आणि मग असं वाटलं की, आता तर पाहतोच काय आहे तरी काय नक्की हा गेम. जवळजवळ इरेला पेटून सगळेच्या सगळे सीजन्स मिळवले. माझं इंग्रजी खूपच चांगलं असल्याने मला सबटायटल्ससुद्धा हवीच होती. तीही मिळवली आणि सगळं काही हाती आल्यावर पोटात भुकेचा गोळा उठलेला असताना ज्या पवित्र्यात आपण चारी ठाव वाढलेल्या पानासमोर बसतो, त्याच पवित्र्यात मी पीसीसमोर बसलो.

"गर्ल्स हॉस्टेल"

Submitted by _K_ on 20 June, 2017 - 22:57

झी वरील राखेचा नंतर कलर्सवर देखील "चाहूल" ही हॉरर मालिका आली..
आणि आता झी युवा वर "गर्ल्स हॉस्टेल" ही नवीन हॉरर मालिका येत आहे..
त्यासाठी हा नवीन धागा

https://youtu.be/zpIwYArUMes या लिंक वर प्रोमो बघायला मिळेल.

बेहद - सोनी टीवी वरील मालिका

Submitted by बी.एस. on 9 June, 2017 - 11:30

सोनी टीवी वर रोज रात्री 9.00 वाजता बेहद ही मालिका लागते. खरं तर मालिका सुरू होऊन बरेच महिने झालेत.. पण सुरवातीपासून ही मालिका फार आवडतेय. मी एकही एपिसोड मिस करू शकत नाही.. रोज नवीन सस्पेन्स, वेगवान घडामोडी, सर्व कलाकारांचा मस्त अभिनय.. ह्या बाबी मस्त जमून आल्या आहेत.
सर्वात बेस्ट म्हणजे माया.! अभिनय, दिसणं, अटिटयूड.. मस्त कॅरी करतेय.. तिच्या साठी हा धागा.. HappyHappy

खुलता कळी खुलेना - 2 (कळ्या)

Submitted by Nidhii on 8 May, 2017 - 11:01

पहिल्या धाग्याच्या 2000 पोस्ट पुर्ण झाल्या. आता इथे या चर्चा करुया. Wink

शब्दखुणा: 

कळेल ना गं, प्रिये तुला??

Submitted by दिपक ०५ on 22 April, 2017 - 09:35

तू नाहीस जवळ माझ्या,
पण तूझ्या आठवणी येतात भेटायला..
शक्य नाही तुला मिळवण,
मन तयार नाही स्वीकारायला..
आठवतात तूझे बोल,
ती स्वप्नाची दूनीया..
कळलं नव्हत तेंव्हा,
भास आहे वेडया मनाचा..
तुझ्या स्वप्नांनी रोज,
छळलं आहे मला..
स्वप्ने दाखवली आकाशाची,
आता जमिनीवर टाकलं आहे मला..
मोडली आहेत स्वप्ने माझी,
आता कशाची भीती नाही..
भोग आता संपले माझे,
दैव माझे माझ्या हाती..
इच्छा आता एवढीच कि,
कळावी माझी प्रित तुला..
परत नाही भेटणार हा वेड़ा,
कळेल ना गं, प्रिये तूला..

लागिरं झालं जी... - झी मराठीवरील नवीन मालिका

Submitted by योकु on 11 April, 2017 - 12:28

लागिरं झालं जी... ही नवी मालिका झी मराठीवर १ मे २०१७ पासून सोम - शनि पाहायला मिळेल. चर्चेकरता हा धागा. काय चांगलंय काय गंडलंय, काथ्याकूट इ... चला चालू व्हा Wink

तुफान आलंया - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 6 April, 2017 - 12:05

तुफान आलंया ही मालिका झी मराठीवर ८ एप्रिल पासून चालू होतेय संध्याकाळी ०९३० वाजता. तर चर्चा, काथ्याकूट, काय चांगलं, काय न पटणारं हे बोलायला हा धागा...
(जशी मिळेल तशी बाकी माहीती इथे डकवेन)

सारेगमप - लि'ल चँप्स (झी टीव्ही)

Submitted by गजानन on 8 March, 2017 - 00:41

यंदाचे झीटीव्हीवर चालू झालेले सारेगमप लिटल चँप्स मधले स्पर्धक खूपच दमदार वाटतात. सध्या टॉप १४ ची निवड चालू आहे. अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास खूप धमाल आणणार असे वाटतेय.

तुम्ही पाहताय की नाही? हिमेसभाय परिक्षक म्हणून आहेत म्हणून सुरुवातीला पाहण्यात उत्साह नव्हता पण आता त्याचे एपिसोड चुकवावेसे वाटत नाहीत.

या स्पर्धेबद्दल इथे चर्चा करू या.

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - उपग्रह वाहिनी