शुभमंगल ऑनलाईन

Submitted by मोक्षू on 1 November, 2020 - 00:51

आत्तापर्यंत या मालिकेवर धागा नाही निघाला याचं जरा आश्चर्यच वाटलं.. कोणीच पाहत नाहिये का ही मालिका...? मस्त चालू आहे.. हलकी फुलकी.. Colours मराठीवर असते रात्री 10 वा.

Group content visibility: 
Use group defaults

मी बघते अधूनमधून चुकून. पहिल्यांदा अगदीच बोर आणि पकाऊ वाटली. पण आता १/२ एपिसोड बरे वाटले. अति पुणेरी वातावरण दाखवायचा नादात फेक वाटते. सायली संजीव मला बिलकुल आवडत नाही आणि हिरो तर हिरोच वाटत नाही. मराठी सिरीयल मध्ये eye कँडी हीरो मिळतच नाहीत का ?

सायलीच्या आईचं पात्र खूप बोअरिंग आहे.
घराची चमक थोडी मिसळच्या दुकानलाही दिली असती तरी चाललं असतं

सायलीच्या आईचं पात्र खूप बोअरिंग आहे.
घराची चमक थोडी मिसळच्या दुकानलाही दिली असती तरी चाललं असतं +१
मला हिरोईन आवडली आहे. बाकिची सिरियलीमधय्ल्या हिरोईनींपेक्षा बरीच नॉर्मल आहे. त्यामुळे आवडली.

शर्वरीची आई आधी बाळूमामा मध्ये होती. फारच खडूस दाखवलीये ती. ती मुळात फार तरुण दिसते, एवढ्या मोठया मुलांची आई वाटतच नाही. सतत रागावलेली दिसते आणि नवऱ्याचा सतत अपमान करते. ती ऋचा जरा बावळट दाखवलीये का, फारच सेंटी आहे.
नानाची मिसळ हे हॉटेल बघून मला वाटले ते एखाद्या जुन्या पडक्या वाड्यात राहात असतील पण घर अगदी पॉश आहे मग हॉटेल का असे कळकट.
शर्वरी म्हणजेच सायली काहे दिया परदेस पासून आवडतच नाही. यात तर फारच आगाऊ दाखवली आहे. त्याला मैत्रिणीच्या आधी भेटते ते तर डोक्यातच गेलं.
शंतनू नाव ऐकलं की अशी ही बनवा बनवीच आठवतो. तर या शंतनूचा रूम मेट मला त्याचा नोकरच वाटतो. सतत चहा कॉफी काय बनवून देतो, नेहमी जेवण काय बनवतो. प्रत्यक्षात कोणी असं कुणासाठी काही बनवत नाही, तूझं तू, माझं मी करतात.
नागपुरी भाषा म्हणजे वाक्यात चार वेळा बाप्पा आणि पोट्टी असलंच पाहिजे असा या मालिकावाल्यांचा का कुणास ठाऊक पण समज आहे. खोटं वाटतं ते सगळं.
एकंदर त्या वेळेला दुसरं काही नसल्याने बघितली जाते पण आवर्जून बघावी असं मालिकेत काही नाही.

मला ह्या मालिकेत सगळे overacting करत आहेत असेच वाटते त्यामूळे बघायला मजा नाही येत. >>> अगदी अगदी. थोडी कधीतरी बघितली आणि प्रोमोज काही, परत फिरकावेसे वाटलं नाही. त्यामुळे नाही बघत.

शर्वरी म्हणजेच सायली काहे दिया परदेस पासून आवडतच नाही. यात तर फारच आगाऊ दाखवली आहे. >>> ह्यालाही अगदी अगदी.

हो किल्ली.
तिची acting इतकी खास नाही. तरी तिला किती मराठी पिक्चर मिळाले. Awards पण मिळालेत zee गौरव

तिची acting इतकी खास नाही. तरी तिला किती मराठी पिक्चर मिळाले. Awards पण मिळालेत zee गौरव > हो ना. तिच्यापेक्षा कितीतरी जणी जास्त चांगला अभिनय करतात.

हल्ली कुठलीही मालिका बघितली की किळसच येते>> अगदी अगदी .तिकडे बातम्यांच्या चॅनेल वर ही तोच प्रकार . आणि hd चॅनेलचे केबल चार्जेस त्यामानाने किती तरी वाटतात. तरी आम्हाला तरी थोडं फार काहीतरी बघावंच लागत टाईम पास म्हणून. नावं ठेवतच बघायचं .
त्यातल्या त्यात राजा राणी ची जोडी बरी वाटते.

हो, येता जाता हॉल मध्ये डोकावत होते कारण मी नाही पण साबा साबु पहातात ही मालिका नियमीत. पण काल कोर्टाच्या सीन पासुन पहायला सुरुवात केली. कोर्टाच्या सीनने मालिकेत जिवंतपणा आला. सुरुवातीला चाचपडणार्‍या शर्वरीने नंतर त्या ऐश्वर्याला चांगलीच हादरवुन टाकले. आता कोर्टाचे सीन असे पर्यंत मी बघणार.

नक्की कथानक काय आहे ? कोणी थोडक्यात सांगू शकेल का?
एक दोन वेळा बघायचा प्रयत्न केला पण काहीतरी वेगवेगळेच ट्रॅक लागलेले दिसले.

कथानक नक्की माहीत नाही, पण साबांच्या बोलण्यात समजले की हिरो मुंबईला रहात असतो. खलनायिका ऐश्वर्या ही त्याची बॉस असते. तिचे आधी त्या वकिल किर्ती कुमारशी लग्न होऊन घटस्फोट झालेला असतो, तिने या आधी १- २ मुलांना जाळ्यात ओढलेले किंवा प्रयत्न केलेला असतो. आता हिरो जरी दुसरीकडे नोकरीला असला तरी तिने त्याची तिच्या ऑफिस मध्ये बदली करवुन घेतलेली असते. तिच्या म्हणण्यानुसार त्या दोघात नवरा बायकोसारखे संबंध असतात. पण हिरो नाही म्हणला तरी तो ते सिद्ध करु शकत नाही. त्या वरुन ती त्याच्या वर फसवणूकीचा दावा दाखल करते. इकडे त्याने व त्याच्या आईने पसंत केलेल्या शर्वरीशी त्याचे ऑनलाईन लग्न होते. पण ऐश्वर्या राडा करते.

ही मालिका नेमकी समोर येते मी टीव्ही लावला की. त्यामुळे बघणे होते. युट्युब वर पण आजकाल एपिसोड अपडेट्स मिळतात.
पण काही म्हणा, ऐश्वर्या आल्यामुळे थोडी जान आली मालिकेत. ती छान अभिनय करते व स्क्रीन प्रेझेन्स, ड्रेस सेन्स पण छान आहे तिचा.
पण मुख्य जोडी शर्वरी-शंतनू मध्ये काहीच केमिस्ट्री नाही. सध्या त्यांचा रोमान्स दाखवत आहेत, पण एकदमच ठंडा वाटते.. मराठी सिरीझ मध्ये असेच असते का ? मी हल्लीच मराठी मालिका पाहायला सुरवात केली आहे. त्यामुळे काही कल्पना नाही. ह्या बोरिंग लीडस मुळेच ऐश्वर्या बघायला बरी वाटते.

शंतनू फार म्हणजे फारच थंडगार आहे. सिरीयल मध्ये तरी कुठल्या गुणांवर भाळली शर्वरी काय माहीत..?
किर्तीकुमार (वकील) मस्त ऍक्टिग करतो मात्र.. ऐश्वर्या आवडते तरी तीच सतत शंतनू शंतनु करणं,तिने कितीही अपमान केला तरी शांत राहणं पण त्याच बरोबर एक attitude सतत कॅरी करणं.. मस्त एकदम

interesting सुरु होती मालिका .. नवीन डावपेच .. कोर्ट सिन ... एकदम भारी जमले होते

पण आता मागच्या काही भागा मध्ये एकदम ट्रॅक बदलला आहे आणि कंटाळा यायला लागला आहे
मान्य आहे काही restriction मुळे challenges आहेत पण कुठेतरी लॉजिकल दाखवा ...

शर्वरी आणि तिचा बाबा इतका कसा हतबल कि समोर दिसून पण आई ला काहीच बोलू शकत नाही .. राग करून परत शांत बसतो .. पटतच नाही

आता काय म्हणे सत्व परीक्षा >>> काहीही काय ...

गोव्यात तेच
आता सुरतला येऊनही तेच..

नक्की काय अन कधी end करणार ते ठरायचय वाटतं

शर्वरी आणि तिचा बाबा इतका कसा हतबल कि समोर दिसून पण आई ला काहीच बोलू शकत नाही .. राग करून परत शांत बसतो .. पटतच नाही>>>> हो ना ! ती बाई एवढी हलक्या कानाची आणी महामुर्ख कशी दाखवलीय तेच कळत नाही. आणी बाबा म्हणजे धर्माचा अवतार.

घरगडी ... शंतनु बादली फडकं घेऊन घर पुसतो आहे .... काहीही काय राव.. साधा वायपर तरी द्या त्याला
चुलीवर स्वयंपाक म्हणजे अतीच झाले लेखकाची अक्कल दिसली ... सुरत मध्ये आहेत चांगल्या पॉश वस्ती मध्ये बंगला आहे आणि चुलीवर
काय काय पाहायला लावणार आहे
कुठे नेऊन ठेवली मालिका Sad
हे सगळे परत पुण्यात येई पर्यंत आता बघायला नको असे झाले आहे

घरगडी दिसायला डोक्याला टापशी बांधायलाच हवी का? ही सुडाची कल्पना चांगली आहे. पण अतीच ताणली आहे. ऐश्वर्याच्या कानाखाली एकदा सणसणीत जाळ काढल्यानंतरही शर्वरीची आई पुन्हा तिच्या कच्छपी कशी लागते? त्यामागचं तर्कशास्त्र काही नीटसं स्पष्ट होत नाही. गोव्यातून सुरतेला आणि सुरतेहून पुढं कुठं जाणार? एकूणच आधी चांगली चाललेली ही मालिका पुढे कुठं जाणार?

एकूणच मालिकेचा ट्रॅक चुकला आहे असे जाणवते .. काहीही काय दाखवताय

शंतनू ने कधी पत्ता पाठवला आणि लगेच दोघे आले सुद्धा ??? बाजूच्या बंगल्यात राहणार पण कोणाला दिसणार नाही असे कसे ??

शर्वरी च्या बाबा बरोबर शंतनू च्या बाबाचे चांगले आहे ना . मग ते डायरेक्ट फोन का नाही करत ??

मुख्य म्हणजे ऐश्वर्या फोन करते दुसऱ्या सिम वरून .. तो नंबर आई शंतनू ला का सांगत नाही ?? किंवा ती पण बाबा ला सांगत नाही ??

कुठे नेणार आहेत काय माहिती आणि कधी ट्रॅक वर येणार ....

कुठून कुठे नेली ही मालिका
शर्वरी ला ब्रेन ट्युमर की काय झालंय, तिला फक्त 1 महिन्याची मुदत दिली आहे डॉक्टरांनी
त्यामुळे सासरचे सगळे तिचा प्रत्येक दिवस छान जावा यासाठी प्रयत्न करत आहेत