शशक पूर्ण करा - पंचाईत - बिपीन सांगळे

Submitted by बिपिनसांगळे on 16 September, 2021 - 12:58

काहीच सुचत नाहीये . सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो.
नुसताच लोटलेला असतो तो .
समोर नक्की कोण आहे कळत नाही .
साला ! या आडबाजूला ट्रीपसाठी मला यायचंच नव्हतं . एकाट , निर्जन जागा . खूप रात्र झालेली , दिवे गेलेले . मेणबत्ती नाही अन मोबाईलच्या बॅटऱ्याही उतरलेल्या .
तो एकदम ओरडतो , दाबल्या तोंडाने , ' कोण आहे रे ? '
मी म्हणतो , ' मन्या - मी पश्या '.
तो पुन्हा ओरडतो , ' साल्या ! उठ लवकर तू . मलाही घाईची लागलीये !

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Haha

मंडळी
जरा वेगळं लिहावं म्हणून ही कथा लिहिली .
गैरसमज नसावा
आभार