एक नवा प्रयोग : जाकिट

Submitted by अवल on 5 July, 2013 - 10:29

प्रिया७ ने इथे एका मॉल मधल्या जाकिटाचा फोटो पाठवला होता. तो करायचा प्रयत्न केला. मॉल मधले जाकिट दो-याचे होते. आपल्याकडे फाईन दोरा मिळत नसल्याने मी लोकरीचे केले. अनायसा बहिणीचा वाढदिवस असल्याने तिला देता येईल, प्रिया खूप खूप धन्यवाद ग Happy
हा तिने पाठवलेला फोटो
photo2.jpg

आणि हा माझा प्रयत्न ( सध्या मॉडेल नसल्याने उशीला चढवलाय, त्यामुळे शेप जरा नीट दिसत नाहीये )

1373028636072.jpg

अन हा नुसता

1373032238677.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पैली मी पैली!!......... सुंदर झालंय जाकीट! हे असं डिट्टो च्या डिट्टो कसं काय केलंस? नुस्तं बघून?

अरे वा खुपच मस्त झालेय जाकिट, आणि इतक्या लवकर बनवले सुद्धा?? नुसते बघुन तु इतके छान बनवले..कमाल आहे तुझी! खरेच हॅट्स ऑफ टु यु!

वा! एकदम सुरेख बनवलं आहेस अवल! >> +१
आपल्याकडे सुद्धा तसला दोरा मिळतो ना. त्याला काय म्हणतात ते माहित नाही. पण त्याचे ताटावर झाकायचे रुमाल आणि तत्सम गोष्टी केलेल्या पाहिल्या आहेत.

धन्यवाद सर्वांना
सावली, हो तो दोरा मिळतो ( माझ्या आईचे सारे विणकाम याच दो-याचे आहे. तिचा ब्लॉग बघितलास?) परंतु तो दोरा खुप बारीक असतो, त्याचे असे विरळ विणकाम टिकायच्या दृष्टीने करणे योग्य नाही.
त्यासाठी थोडा जाड दोरा अपेक्षित आहे. रेड हार्ट, कोट्स यांचे दोरे मिळतात, ते टिकायचा भक्कम असतात, परंतु ते थोडे कडक असतात. अशा प्रकारच्या विणकामाला भक्कम पण सॉफ्ट प्रकारचा दोरा हवा, तो इथे मिळत नाही ( पुण्यात तरी ) असे मला म्हणायचे होते Happy

अवल, खुप सुंदर केलेयस गं.... अगदी जशास तसे.

हा दो-याचा त्रास इथे मुंबईतही आहे. एकतर असे दोरे मिळावाय्ला दादरला जावे लागते, इथे नव्या मुंबईत कुठे मिळतील माहित नाही आणि तिथे पांढरा दोरा ६०० रुपये किलो तर रंगित दोरा थेट १२०० रुपये किलो या दराने मिळतो Sad

नवा प्रयोग..... एकदम frist class!!!!

नुसतेच बघून ईतके छान विणता येते..... खरच मनापासून कौतुक.

सुंदर! _______________/\__________________. Happy