#प्रेम #कथा

प्रेमा तुझा रंग कसा ?

Submitted by Kavita Datar on 17 February, 2021 - 03:01
हिरवाईने सजलेल्या एकांत जागी ती आणि संजय हातात हात घेऊन, एकमेकांच्या नजरेत हरवून बसले होते. अवखळ वाऱ्याने तिच्या कपाळावर आलेली केसांची बट त्याने त्याच्या बोटांनी मागे सारली, तिचा चेहरा हाताच्या ओंजळीत धरला आणि तिच्या कपाळाचे हलकेच चुंबन घेतले. त्याचे ओठ तिच्या डोळ्यांवर, गालांवर टेकत तिच्या ओठांपाशी आले....तेव्हढ्यात तिने आपला हात त्याच्या ओठांवर ठेवत त्याला थोपवले आणि मान हलवत खुदकन हसली.

टाळ्यांच्या कडकडाटात मृणालीने स्टेजवर जाऊन पुरस्कार स्वीकारला. स्टेजवरून खाली उतरताना तिचे लक्ष पहिल्या रांगेत बसलेल्या संजयकडे गेले. त्याने तिच्याकडे हसून पाहून, कौतुकाने अंगठा वर करून तिचे अभिनंदन केले.

मृणाली, शहरातील विद्यापीठात एम एस्सी च्या दुसऱ्या वर्षाला शिकणारी, सुंदर, हुशार मुलगी. गोरीपान, उंच, टपोऱ्या भावदर्शी डोळ्यांची, लांब केसांची मृणाली पाहताक्षणी कोणाच्याही मनात भरणारी. तिच्या वर्गातली आणि विद्यापीठातली बरीच मुलं तिच्या सौंदर्य आणि विद्वत्ते मुळे तिच्यावर जीव ओवाळून टाकायला तयार होते. मृणाली चे मन मात्र संजयने, तिच्या संजय सरांनी काबीज केलं होतं.

विषय: 
शब्दखुणा: 

माफिया डॉन

Submitted by एविता on 8 August, 2020 - 11:59

माफिया डॉन.

सदाशिवनगर मधलं आमचं घर जुनं असलं तरी प्रशस्त आहे. पूर्व दिशेला असलेल्या गेटपासून व्हरांडाच्या पायऱ्यापर्यंत यायला पंधरा सोळा पावलं टाकावी लागतात. पाच पायऱ्या चढल्या की व्हरांडा आणि मग दोन पावलं टाकली की मुख्य दार.

शब्दखुणा: 

Evi's Umbrella

Submitted by एविता on 1 August, 2020 - 23:09

एविज अंब्रेला.

लग्न झाल्यानंतर एक दोन दिवसाच्या अंतराने कोणीतरी जेवायला बोलवायचंच. ह्याचे मित्र, माईंच्या बहिणीकडे किंवा ह्याच्या काकांकडे अथवा ऋषीच्या बाबांच्या मित्राकडे जेवायला जाण्याचे बरेच कार्यक्रम असायचे. एके दिवशी आम्ही दुपारी डायनिंग टेबलावर सगळे जेवत होतो तेंव्हा ऋषीचे बाबा म्हणाले, " ऋषी, तुम्हा दोघांना आज संध्याकाळी रंगे गौडाकडे जेवायला जायचय. सात वाजता निघालात तर आठपर्यंत पोहोचाल. तो मला पावणेसातला फोन करेल."

"ओके अप्पा. आम्ही सात वाजता निघतो."

"राईट, म्हणजे गप्पा टप्पा वगैरे होऊन यू विल बी बॅक बाय टेन, टेन थर्टी." इशान म्हणाला.

शब्दखुणा: 

इक मंज़िल राही दो..

Submitted by एविता on 26 July, 2020 - 04:35

नेहमीच्या पिझ्झा आउटलेटला थांबव." आम्ही मंड्या या गावात प्रवेश केला तसं मी त्याला सांगितलं. म्हैसूर आता फक्त एकच तास.

"तुझी ही जंक फूड खाण्याची सवय बंद कर." तो गाडी लाल सिग्नलला थांबवत म्हणाला, "दर वीकएंडला इथे येताना तुझा पिझ्झा ठरलेलाच. एक वर्ष झालं आता लग्न होऊन. महिन्यात चार पिझ्झा. अठ्ठेचाळीस टू मच..." तो कपाळावर आठ्या चढवत बोलला.

"हे... हे... पावसाळ्यात आपण आलो नव्हतो आठ वेळा. आणि हे चाळीस पिझ्झा आपण दोघांनी मिळून खाल्लंय. आणि यू एस मध्ये तर दर सेकंदाला पाचशे स्लाइस खातात. दीडशे एकर दिवसाला."

"आपण यू एस मध्ये नाही."

शब्दखुणा: 

La Flor del amor - Blossom of love (भाग ८) (शेवटचा भाग)

Submitted by कविन on 25 July, 2020 - 08:19

भाग ७
____________________________________
भाग ८ :-

पुढचे काही दिवस कमाल बिझी गेले. वाढदिवसाला जोडून पुढेही दोन दिवस मला सुट्टी हवी होती म्हणून मी पण जास्तवेळ थांबून काम पूर्ण करुन देत होते. प्रणवही नर्सरीच्या वेबसाईटच्या कामात बिझी होता. डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनसारखा मेसेंजर आणि फोनकॉलवर गप्पांचा डोस सुरु होता पण त्यात निवांतपणा असा नव्हता. प्रिया मॅटरला पूर्ण क्लोजर मिळालं नसलं तरी सध्या तो मॅटर मी काहीकाळ ऑप्शनला टाकला होता.

La Flor del amor - Blossom of love (भाग ७)

Submitted by कविन on 24 July, 2020 - 23:57

भाग ६
_________________________
भाग ७:-

जाईचा फोन बराचवेळ वाजत होता आणि ती अंघोळीला जाऊन बसली होती. फोन उचलून बघितला तर प्रणव कॉल करत होता कळलं.

फोन उचलून हॅलो म्हंटल्याबरोबर त्याचा पहिला शब्द होता "Thank god."

मला म्हणे, "पोहोचल्याचा मेसेज नाही, व्हॉट्स ॲपला रिप्लाय नाही, कॉल लावायला गेलो तर तुझा फोन स्विच्ड ऑफ येतोय. शेवटी जाईच्या नंबरवर लावला कॉल."

चंद्रोदय

Submitted by एविता on 20 July, 2020 - 06:18

चंद्रोदय.
त्या दिवशी, खरं म्हणजे रात्री, मी आणि ऋषिन् आमच्या घराच्या गॅलरीत उभे होतो. संकष्टी असल्याने माईंचा उपवास होता आणि माझाही. चंद्रोदय दहाच्या आसपास होता. आम्ही दोघं चंद्र दिसतोय का ते पाहत होतो.

"केंव्हा उगवणार हा चंद्र देव जाणे," मी बोलले.

"अगं दहाची वेळ आहे ना? अजून नऊ सत्तावन्न होतायत. येईल दोन तीन मिनिटात." तो म्हणाला.

"चंद्र दिसल्यावरच कुकर लावायची माईंची पद्धत, आणि मला तर जाम भूक लागली आहे रे...आणि या ढगाळ वातावरणात चंद्र दिसणार तरी का..?"

"एक काम करूया का?" तो म्हणाला.

"काय?"

"तू आणि माई एकमेकांना बघा आणि मग तू कुकर लाव."

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - #प्रेम #कथा