La Flor del amor - Blossom of love (भाग ८) (शेवटचा भाग)

Submitted by कविन on 25 July, 2020 - 08:19

भाग ७
____________________________________
भाग ८ :-

पुढचे काही दिवस कमाल बिझी गेले. वाढदिवसाला जोडून पुढेही दोन दिवस मला सुट्टी हवी होती म्हणून मी पण जास्तवेळ थांबून काम पूर्ण करुन देत होते. प्रणवही नर्सरीच्या वेबसाईटच्या कामात बिझी होता. डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनसारखा मेसेंजर आणि फोनकॉलवर गप्पांचा डोस सुरु होता पण त्यात निवांतपणा असा नव्हता. प्रिया मॅटरला पूर्ण क्लोजर मिळालं नसलं तरी सध्या तो मॅटर मी काहीकाळ ऑप्शनला टाकला होता.

जाईबाईंच्या मते 'मॅटर' प्रिया कधीही नव्हता आणि नाहीच. ते ही बरोबर होतं. आम्हाला आमच्याबद्दल काय वाटतं, मॅटर फक्तं इतकाच होता आणि तो सोडवायचाही आम्हालाच होता. कसा? कधी? हा जरा ट्रिकी मुद्दा होता खरा.

पण काही नाही तरी वाढदिवस होऊन गेल्यावर मी माझ्यापुरते क्लोजर मिळवणार हे माझे ठरले होतेच. वाढदिवसाला आम्हाला दोघांसाठीच वेळ मिळावा आणि जर ती शेवटची भेट ठरणार असेल आमची तर किमान मला वाढदिवसाची भेट म्हणून तो अख्खा दिवस त्याचा सहवास मिळावा. नंतर तो नाही म्हणाला तर .. किंवा प्रियासारखीच मी ही त्याला फक्तं एक चांगली मैत्रिण इतकच वाटत असेल तर.. परत नाशिकला गेल्यावर गार्डेनिया, कॉफी, इकेबाना आणि प्रणव यांच्या आठवणी फिकट नाही झाल्या तर... या जर तरने झोप उडवली होती माझी. 'इमोशनल झोल आणि रोलर कोस्टर राईड' सुरु होती जाईच्या शब्दात.

पण इमोशनल झोल कितीही असोत प्रोफेशनल लाईफमधे त्याचं प्रतिबिंब चुकूनही पडू द्यायचे नसते. उलट दुप्पट मेहनत घेऊन स्वतःला त्यात झोकून द्यायचे असते हे आमच्या मा चे कायमचे मला आवडणारे तत्वज्ञान आता प्रॅक्टीसमधे आणताना खरतर जड जात होते.
पण 'हे ही दिवस जातील' 'दिवस काही घर बांधून रहायला येत नाहीत आपल्याकडे.' या आमच्या बहिणाबाईंच्या वाक्यावर मी तगून होते.

नेमकी यावेळी वाढदिवसाला जाई माझ्यासोबत नव्हती. ती नाशिकला गेली होती आणि तिथलं काम वाढल्यामुळे अजून दोन दिवस येणार नव्हती. बाबाने, "सुट्टी टाकल्येस तर, वाढदिवसाला नाशिकलाच ये" म्हंटलं असलं तरी प्रणवने आज अख्खा दिवस सोबत घालवायचं कबूल केलं होतं म्हणून जाईला खरं काय ते सांगून, बाबाला फक्त नाही जमणार कळवलं. कदाचित शेवटची भेट असेल ही आमची. ती मेमोरेबल व्हावी बस. मनात विचार आला.

सकाळी सगळ्यांचे व्हिडीओ कॉल येऊन गेले. बाबाला पुढल्या विकेंडला येऊन जाईन असं प्रॉमिस केलं. तो आणि मा थोडे खट्टू झाले पण मग माझा पडेल चेहरा बघून 'enjoy your day my princess, भेटल्यावर परत साजरा करु इथे' म्हणत माझीच समजूत काढून त्याने फोन ठेवला.

सगळे फोन आटोपते घेऊन मी प्रणवला भेटायला तयार झाले. आज काही अजेंडा ठरवून निघालो नव्हतो. वाटेतच ब्रेकफास्ट करुन आम्ही वसईचा किल्ला बघायला निघालो. किल्ला बघून परत बाईकपाशी येईपर्यंत एक वाजत आला होता आणि पोटात भूकेची जाणीव झाली होती. त्यातही मला 'केळवा बीच आणि त्याची ती खास जागा' बघायचीच आहे असं मी डिक्लेअर केलं. इथून ते अंतर दिड दोन तासाचं तरी होतं. इतक्या उन्हाचं बाईक दामटवून जायला तो तयार होईल असं वाटत नव्हतं. पण "आज सगळं तुझ्या मनासारख होऊदे", म्हणत त्याने पोटपुजा करुन झाल्यावर बीचवर न्यायचं कबूल केलं.

"You made my day. Thank you.", मी समुद्राच्या लाटेत पाय भिजवत म्हंटलं.

"अजून दिवस बाकी आहे आणि माझं सरप्राईझपण.", त्याने मी उडवलेलं पाणी चुकवत म्हंटलं.

"हे आहे तेच गिफ्ट आहे. अजून काय हवय?"

"पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त", माझ्या वाक्यावर त्याने फिल्मी उत्तर देत म्हंटलं

"कुठे आहे सरप्राईझ?"

"परत जाताना माझ्या हातची कॉफी पिऊन जायचं प्रॉमिस कर मग सांगेन" तो म्हणाला

"प्रॉमिस. आता सांग" त्याच्या हातात हात देत प्रॉमिस करत मी म्हंटलं

"घरी.", त्याने हेल्मेट घालत उत्तर दिलं.

परतीच्या रस्त्यावर किती मस्का मारला तरी तोंड उघडून काय ते सरप्राईझ फोडलंच नाही त्याने. कॉफी पिऊन झाल्यावर मी त्याचा हात धरुन "आता सांग हा बऱ्या बोलाने" म्हणत समोरच बसवलं तसं अस्वस्थ होत म्हणे, "सरप्राईझ नाही आवडलं तर नाही आवडलं सांगायचं, पण बोलणं बंद नाही करायचं माझ्याशी."

"गिफ्टवरुन कोणी बोलण बंद करत का येडपट" मी म्हंटलं

"आलोच.", असं म्हणत तो आत गेला. बाहेर आला तर एक सुंदर रेड कार्नेशियाचा बुके त्याच्या हातात होता.

""feliz cumpleaños..Happy birthday to a beautiful lady", त्याने बुके माझ्या हातात देत म्हंटलं

"Its so beautiful. gracias", मी उत्तर दिलं.

त्यासोबत एक कार्ड होतं. बहुतेक हॅन्डमेड असावं. मी ते उचलून बघायला गेले तसं त्याने माझा हात पकडत म्हंटलं, "आत्ता नको, नंतर बघ. अजून एक गिफ्ट बाकी आहे."

मी,"काय चालवलयस काय?" अशा अर्थाने त्याच्याकडे बघितलं तर नर्व्हस होत त्याने एक गिफ्ट एंव्हेलप समोर धरलं. उघडून पाहिलं तर आत एक सुंदर नेकलेस आणि इअर रिंग्ज सेट होता. Real red baby breath pressed flowers set.

"Wow! its so splendid. I am speechless", मी नेकलेस हातात घेत म्हंटलं

Red baby breath flowers symbolizes love & romance.. मला त्यानेच मागे 'फुलं आणि त्याची प्रतिके' यावर बोलणं झालं होतं तेव्हा सांगितलं होतं, ते आठवलं. इमोशनल होऊन डोळ्यातून पाणी आलं माझ्या.

"आता तरी कार्ड बघू का?, मी डोळे पुसत त्याला विचारलं

"ह्म्म बघ."

मी कार्ड हातात घेतलं. त्यावर मला आत्तापर्यंत त्याने भेट दिलेल्या सगळ्या फुलांचे ठसे होते. आत कार्नेशनच्या ठशात पांढऱ्या रंगाने मजकूर लिहीला होता.
मी वाचायला सुरुवात केली. Deep Red carnations represents…...

Deep love & passion. They are to be given to a person that captures your heart. I love you. त्याने वाक्य पूर्ण केलं आणि माझ्या रिॲक्षनची वाट बघत उभा राहीला.

मला एकदम हुंदकाच फुटला

माझा अवतार बघून पॅनिक होत तो म्हणे, "I am sorry. मी म्हंटलं होतं ना नाही आवडलं सरप्राईझ तर विसरुन जा. I don't want to ruin your birthday"

"डफ्फर", त्याच्या छातीवर हलके गुद्दा मारत मी त्याच्या मिठीत शिरले. मला वाटलं होतं तू कधीच नाही विचारणार मला.

"तू चिडली नाहीयेस?", त्याने माझे खांदे पकडून डोळ्यात बघत विचारलं

"च्चक! This is the best birthday gift ever. I love you too", मी त्याच्या मिठीत परत तोंड लपवत म्हंटलं

"Best day of my life", त्याने मिठी घट्ट करत म्हंटलं

"इस बात पे कुछ मिठा हो जाए..", त्याने माझ्याकडे अशा नजरेने बघत हे वाक्य म्हंटलं की गाल एकदम लाल झाले माझे.

"मी लावा केक बद्दल बोलतोय", त्याने मिश्किल हसत म्हंटल्यावर मी लाजून चूर झाले.

त्याने खरच लावा केकवर एक छोटी मेणबत्ती लावून मला केक कट करायला लावला.

केक कट करुन न सांडता भरवता यावा त्याला म्हणून मी रुमाल खाली धरत बरीच कसरत केली तरी मेल्टेड चॉकलेट ओठांना बाहेर लागलच. हातातल्या रुमालाने पुसायला गेले तर माझा हात पकडून त्याने असं अलाऊड नाही म्हणत मला जवळ ओढून त्यावर त्याचे ओठ टेकवले.

"असा केक जास्त गोड लागतो.", त्याने परत किस करत म्हंटलं.
मी स्वत:ला सोडवून घेत खाली बघत म्हंटल, "निघायला हवं आता."

त्याने परत जवळ घेत कानाची पाळी ओठात पकडत म्हंटलं, "त्यादिवशीचं रिटर्न गिफ्ट अजून बाकी आहे."

त्याच्या खळीचा किस घेत मी त्याच्याकडे पाहीलं तेव्हाच मला समजून चुकलं इथून मागे फिरणं आता दोघांनाही शक्य नाही. मी परत त्याच्या मिठीत स्वत:ला झोकून दिलं.

Sharry baby orchids चा दरवळ हवेत पसरला होता. रेड कार्नेशिया आता आमच्या आतच फुलला होता. खिडकी बाहेरुन येणारा रातराणी आणि अनंताचा सुगंध एकमेकांत मिसळून हवेत, श्वासात भिनला होता. La flor del amor चा अर्थ आज नव्याने कळला होता.

समाप्त

तळटीपः त्या दोघांचे गाणे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच. एखाद्या वेब सिरीजचा सीझन पाहिल्यावर येतं तसंच काहीसं फिलींग आलंय.. पुढच्या सिरीजच्या प्रतिक्षेत!

मस्त मस्त मस्त....

मजा आली वाचायला..मिल्स अँड बुन दिवस आठवले.

मलाही डीप रेड कार्नेशन फार आवडतो. पण कार्नेशन कोणत्याही रंगात सुंदरच दिसतो. कालच गणपतीला डीप रेड वाहीला.

https://myflowermeaning.com/carnation-flower-meaning/
>>>>>>>>Old Romans adored the Carnation flower and believed this was a sacred plant. Romans associated the name of the Carnation flower to the Latin Dianthus but translated this as divine. >>>>>>
______
कथा अतिशय क्युट झालेली आहे. आवडली.

धन्यवाद स्वस्ति, मोहिनी , धनवंती Happy

नशीब. म्हटलं दोन फुलांच्या ताटव्यांना वेगवेगळ्या बुकेत पाठवता की काय.>> Lol धन्यवाद जेम्स बॉंड Happy ऑड कॉंबो बुकेत खुलूनही नाही दिसत Wink

@सामो लिंक आणि माहितीकरता धन्यवाद Happy

खरं तर, सुरुवातीचे भाग वाचले नव्हते. कारण क्रमशः गोष्टी पूर्ण होतील की नाही किंवा झाल्या तरी कधी होतील हे सांगता येत नाही. पण अशीच वाचायला सुरू केली आणि मग आवर्जून सकाळी नवीन भागाची वाट पाहायला लागले.
खूप गोड गोष्ट होती. गोष्टीतल्या फुलांसारखी मोहक आणि सुगंधीत.

क्यूट क्यूट क्यूट.
पहिल्या भागापासून शेवटच्या भागापर्यंत फील कायम राहिला. कुठेही अजिबात भरकटली नाही कथा.
सिक्वेल वाचायला आवडेल.
गूढ कथा लिहणार आहात ना अरे वाह मग तर आवडीचा विषय. येऊ द्या लवकर Happy

खूपच मस्त झाले सगळे भाग,अगदी गोड शेवट
0न मी काय म्हणते,सगळे भाग सायली च्या मताने लिहिलेत तर एखादा टाका की प्रणव च्या मनात चाललेल्या चलबिचलतेचा
(तेवढाच अजून एक ब्लॉसम वाढवून मिळेल आम्हाला Wink )

गोड शेवट आवडला.. पॉझिटिव्ह नोटवर गोष्ट संपली हे फारच छान झालं.
या गोष्टीचा व्हिडीओ किंवा गाणं स्वरूपात केल्यास आमच्या मते पुढील कास्ट राहील
प्रणव : ह्यू ग्रांट ( नॉटिंग हिल पासून मी ह्याच्या प्रेमात आहे ) / सायमन बेकर
सायली : ज्युलिया रॉबर्ट
जाई : पेणोलीप क्रूझ

Kiti kiti sunder ... Apratim.. asch lekhan chalu rahu dyav .. evdh Chan ajun vatat sampuch naye

धन्यवाद ऊर्मिला, जाई, विनिता, आदू, निल्सन आणि मनस्विता Happy

गोष्टीवर इतके प्रेम केलेत त्यामुळे आज मलाच सुगंध पसरलाय आजूबाजूला असे वाटतेय. Happy

तेवढाच अजून एक ब्लॉसम वाढवून मिळेल आम्हाला Wink )>> Lol

पहिल्या भागापासून शेवटच्या भागापर्यंत फील कायम राहिला. कुठेही अजिबात भरकटली नाही कथा.>> स्पेशल धन्यवाद Happy

खरं तर, सुरुवातीचे भाग वाचले नव्हते. कारण क्रमशः गोष्टी पूर्ण होतील की नाही किंवा झाल्या तरी कधी होतील हे सांगता येत नाही>> माझी क्रमशः कथा दिसली तर जरुर भेट द्या आणि आवडली तर नक्की पुढे वाचा. माझी कथा अर्धवट रहाणार नाही आणि भागही लवकर पोस्ट होतील याची खात्री देते. Lol

याचं खरं कारण मला बेसिक ड्राफ्ट तयार असल्याशिवाय कथा कशी वळणार आहे याचा अंदाज येत नाही. कधी काही तपशील नवीन भागात लिहीताना आधीच्या भागात त्याचे रेफरन्स लिहायला हवेत हे कळतं. त्याप्रमाणे प्रत्येक आधीचा भाग थोडा बदलतो. त्यामुळे लिहीत जाईन तसे पोस्टत जाईन अस मी ठरवलं तरी करु शकत नाही. माझ्या लिखाणाचे लिमिटेशन्स आहेत ते असं म्हणू. या कथेचाही सगळा ढाचा लिहून तयार होता. सुरवातीचा मूड, मध्य, शेवटचा मूड (मूड ठरवला होता तो मांडायचा कोणत्या शब्दात हे रिरायटिंगमधे ठरवलं) लिहीलेला होता. अलमोस्ट कथाच तयार होती. म्हणून रोज एक एक भाग एडीट थोडा रिराईट करुन पोस्ट करणं शक्य झाले. Happy

@जाई कास्टिन्ग आवडेश Wink हे जर गाणं रेकॉर्ड करायला तयार असतील तर त्यांच्यासाठी माझ्याकडे कोरं करकरीत गाणंही तयार आहे. Lol

पूर्ण झाल्यावर आत्ता सगळे भाग वाचले. मस्त सिंपलशी लाइट रोमॅन्टिक कथा.
हल्ली धेडगुजरी व्हॉट्सॅपीय भाषा, उथळ इल्लॉजिकल कॅरेक्टर्स अशा छापाच्या कथा कादंबर्‍याच जास्त येत असल्यामुळे हा बदल फार प्लेझन्ट वाटला अजून.

>>>>प्रणव : ह्यू ग्रांट ( नॉटिंग हिल पासून मी ह्याच्या प्रेमात आहे ) / सायमन बेकर
सायली : ज्युलिया रॉबर्ट
जाई : पेणोलीप क्रूझ>>> यप!!! सॉलिड आयडीया. मला प्रणव रिचर्ड जेरेच आवडेल मात्र Happy पण आता वृद्ध झालाय म्हणा.

मस्त जमली होती गोष्ट. फ्लो चांगला होता आणि फार इमोशनल अत्याचार वगैरे न करता आटोपल्यामुळे रखडली नाही.

वर मै म्हणाल्याप्रमाणे एक एक नवलेखक ज्या भाषेत इथे लिहितात ते अगदी वाचवत नाही. त्यामुळे ही गोष्ट वाचणं हा आनंद होता.

आज गोष्ट संपली तरी छान वाटतय. मागच्या भागात प्रतिक्रिया देताना मी म्हंटलं होतं कि शेवटचा भाग टाकतेयस तर वाईट वाटतय. पण हि गोष्ट च इतकी छान आहे कि त्याचा मस्त फिल सगळीकडे भरुन राहिलाय. आता माझा अजून एक आठवडा ह्या गोष्टी त जाउ शकतो. एखादा चांगला पिक्चर किंवा चांगली सिरीयल , पुस्तक वाचत असलो कि कसा फिल येतो तसं. थँक्यू कविन

Pages