प्रिय रक्तवारुणी

Submitted by धनश्री on 14 February, 2013 - 12:11

अमेय२८०८०७ च्या या http://www.maayboli.com/node/41029 कवितेला झब्बू म्हणून ही कविता पाठवत आहे.
काव्यलेखनाच्या प्रांतात आम्ही हौशी कलाकार आहोत. अगदी र ला र आणि ट ला ट जोडून ओळी बनवणारे!! तरी तुमच्या प्रतिसादांची वाट पाहते. Happy

असो तुमची स्कॉच,
आम्हाला तर बुवा प्रिय रक्तवारुणी
थोडी मधुर, थोडी तुरट,
भरपूर जुनी, गर्द अरुणवर्णी

घेता एक घुटका,
गुलाब फुलती मनी,
कशाला हे बाकीचे लोक
उगीच पितात पाणी??

या वारुणीचा स्पर्श होता
विसरु आम्ही विराणी
एक एक घुटक्यासरशी
दिव्य तळपते अमृतवाणी

अशीच कृपा राहु दे सखये
नाही दूर लोटणार राणी
थोडा अंमल अजून चढू दे
स्फुरतात ही आनंदगाणी
--धनश्री केळकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान. Happy

धन्यवाद अमेय, इब्लिस आणि गंगाधर मुटे. प्रतिसादामुळे प्रोत्साहन मिळाले. बर्‍याच काकाक आणि काही मनापासून लिहिलेल्या कविता आहेत त्या पण इथे टाकाव्यात असे वाटते.

माबोवरील लेखनाबद्दल एक प्रश्न आहे - या लेखनाचे अधिकार कुणाकडे असतात?
रंगीबेरंगी पान विकत घेऊन त्यावर लिहीणे आणि इथे कोणत्याही विभागात लिहीणे यामधे काय फरक असतो?