पाहिले

तू मला - अष्टाक्षरी

Submitted by omkar_keskar on 11 May, 2021 - 00:29

तू मला पाहिले तेव्हा,
मी तुला पाहिले होते,
जीवनाच्या पानावर
मी तुला लिहिले होते.

तो मेघमल्हार तेव्हा,
असा बरसला होता.
मनाचा चातक माझ्या
जसा तरसला होता.

आठवांनी तुझ्या सये
पाणी डोळ्यांत दाटते.
भरलेले शहर ही
मग रितेच वाटते.

आपलं प्रेम म्हणजे
जणू एक गाव होते.
हृदयांवर कोरलेले,
माझे तुझे नाव होते.

©ओंकार केसकर

वास्तव

Submitted by किमयागार on 4 May, 2020 - 14:02

मी श्वापदांना उपाशी झोपताना पाहिले,
मी माणसांना अधाशी भूंकताना पाहिले.

सागराला सागराशी बोलताना पाहिले,
मी नद्यांना सागराशी भांडताना पाहिले.

बोलणाऱ्या माणसांना मारणारे पाहिले,
मारणाऱ्या माणसांना पोसणारे पाहिले.

रोज ती गाथा तुक्याची वाचणारे पाहिले,
गाथेतल्या त्या तुक्याला टाळणारे पाहिले.

अशाश्वताने शाश्वताला गाडताना पाहिले,
मी शाश्वताची अंत्ययात्रा चालून पाहिले.

----------मयुरेश परांजपे----------

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - पाहिले