धरा

सृजन

Submitted by तो मी नव्हेच on 7 September, 2020 - 23:01

माध्यानीला ऐन बहरात आलेले आकाश
अन् सहवासाने तप्त झालेली चिरतरुण धरा
सायंकाळी भेटतात मिलनासाठी क्षितिजावर
पश्चिमेला शुक्रतारा उमलत, खुलत जातो क्षणोक्षणी
अन् देते आकाश आपले तेजरूपी बीज
धरेच्या शीतल रातगर्भात वाढण्यासाठी
उद्याच्या नव्या सूर्यासाठी, नव्या आशेसाठी, सृजनासाठी..

-रोहन

शब्दखुणा: 

याचक

Submitted by पुरंदरे शशांक on 6 October, 2019 - 22:47

याचक

हिरव्या रानातून बहरसी
वृक्षलता होऊनी डोलसी
रंगबिरंगी फुलाफुलातुनी
तूच विलसशी धरा होऊनी

शुभ्र हिमाच्या शिखरामधूनी
कडे कपार्‍या खोल दर्‍यातुनी
कुरणे गवतांची लसलसती
तूच नटसी हे रुप घेऊनी

अथांगशी मरुभूमी असो का
लाटा गंभीर सागरात का
चराचरात चैतन्य जागता
तूच प्रकृती जगती होऊनी

नानाविध रुपांनी सजूनी
भाव भावना अगणित खाणी
सरे वर्णना थकली वाणी
याचक मी तर तुझ्या अंगणी

Subscribe to RSS - धरा