याचक

Submitted by पुरंदरे शशांक on 6 October, 2019 - 22:47

याचक

हिरव्या रानातून बहरसी
वृक्षलता होऊनी डोलसी
रंगबिरंगी फुलाफुलातुनी
तूच विलसशी धरा होऊनी

शुभ्र हिमाच्या शिखरामधूनी
कडे कपार्‍या खोल दर्‍यातुनी
कुरणे गवतांची लसलसती
तूच नटसी हे रुप घेऊनी

अथांगशी मरुभूमी असो का
लाटा गंभीर सागरात का
चराचरात चैतन्य जागता
तूच प्रकृती जगती होऊनी

नानाविध रुपांनी सजूनी
भाव भावना अगणित खाणी
सरे वर्णना थकली वाणी
याचक मी तर तुझ्या अंगणी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह!!! मस्तच.
त्या फुलांच्या गंधकोशी ...... गाणे आठवले.

नानाविध रुपांनी सजूनी
भाव भावना अगणित खाणी
सरे वर्णना थकली वाणी
याचक मी तर तुझ्या अंगणी

वाह! सुंदर...