व्हायरस
१७ मे २०१८ च्या सकाळी सलिह नावाचा एक माणूस केरळमधील सरकारी वैद्यकीय रुग्णालयात अत्यवस्थ अवस्थेत दाखल होतो . सुरुवातीला त्याच्यावर उपचार करण्याऱ्या डॉक्टरांना तो जापनीज इंफायलिटीसचा प्रकार वाटतो . पण जसजसा दिवस वर चढत जातो तसतसा उपचार करण्याऱ्या न्यूरॉलॉजिस्टना काहीतरी गडबड असल्याचा संशय येतो . या रोग्याची लक्षण वर उल्लेख केलेल्या आजारापेक्षा वेगळीच असतात . विशेष म्हणजे १२ दिवसांपूर्वी सलिहाचा भाऊ याच लक्षणांनी बेजार होऊन गेलेला असतो . आणि सलिहाचे बाबा आणि आत्यामध्येही तीच लक्षण दिसू लागतात .