मराठी भाषा दिवस २०१९

मराठी भाषा दिन २०१९ - समारोप

Submitted by मभा दिन संयोजक on 4 March, 2019 - 04:58

नमस्कार मायबोलीकर मंडळी!

२०१० सालापासून आपण मायबोलीवर कवी कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी मराठी भाषा दिवस साजरा करतो आहोत, २०१५ वर्षीचा अपवाद वगळता. यंदाचं हे सलग आठवं वर्षं.

samarop.jpg

विषय: 

मराठी भाषा दिवस २०१९: घोषणा

Submitted by मभा दिन संयोजक on 8 February, 2019 - 15:25

नमस्कार मायबोलीकर मंडळी!

संतकवींपासून ते आधुनिक साहित्यिकांपर्यंतची प्रदीर्घ आणि अभिमानास्पद परंपरा लाभलेल्या मराठी भाषेबद्दलच्या जिव्हाळ्यातून आपण मायबोलीवर मराठी भाषा दिवस गेली अनेक वर्षे साजरा करत आहोत. या मालिकेत नवे पुष्प गुंफताना, २०१९ च्या मराठी भाषा दिवसाची घोषणा करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

IMG-20190207-WA0010.jpg

विषय: 

अहो नाव सांगा ना, कोडी कसली घालताय!

Submitted by मभा दिन संयोजक on 1 March, 2019 - 02:13

अहो नाव सांगा ना, कोडी कसली घालताय!

पुस्तकांची मुखपृष्ठे ही सामान्यतः पुस्तकातल्या मजकुराला साजेशी बनवण्याचा प्रयत्न केलेला असतो. आपल्या एखाद्या आवडत्या पुस्तकाचं मुखपृष्ठही आपल्या मनात घर करून बसलेलं असतं. ' स्वामी' कादंबरीवरचा थेऊरचा चिंतामणी असेल, किंवा ' राऊ' वरचा तलवार धरलेला हात असेल, ही प्रसिद्ध मुखपृष्ठंं म्हणजे त्या त्या पुस्तकाची एक ओळखच असते. आजचा आपला हा खेळ, ही ओळख किती पक्की आहे याची चाचपणी करणारा आहे.

विषय: 

मला भावलेले गडकरी- विशेष लेख- श्री. दत्तात्रय साळुंके

Submitted by मभा दिन संयोजक on 27 February, 2019 - 22:16

मंडळी, गडकरी म्हटल्याबरोबर माझ्या डोळ्यासमोर चटकन् महाराष्ट्रातली तीन व्यक्तिमत्वं दिसतात. ती म्हणजे भाषाप्रभु राम गणेश गडकरी, लोकसत्ताचे माजी संपादक माधव गडकरी आणि सध्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. तसे हे तीनही गडकरी थोड्याफार फरकाने माझे आवडते आहेत. पण या लेखासाठी मी मला शालेय जीवनात मराठीच्या धड्यातून अलंकारिक भाषेचा बाज किती नादखुळा असतो, हे पटविणा-या राम गणेश गडक-यांविषयी लिहितोय.

विषय: 

मराठी भाषा दिवस उपक्रम- सुलेखन

Submitted by मभा दिन संयोजक on 27 February, 2019 - 00:55

नमस्कार माबोकर,
म भा दिवस २०१९ निमित्त सुलेखनाचा उपक्रम जाहीर करत असताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.
सुलेखन म्हणजे कॅलिग्राफी करून तुम्ही तुमची ह्या विषयातील कला सादर करू शकता.
नियम:
१. फक्त संयोजकांनी दिलेल्या वाक्यांचा वापरच सुलेखनाकरता करायचा आहे.
२. सुलेखन स्वतः केलेले असावे, टूल वापरून केले तरी चालेल.
३. स्वतःच्या हस्ताक्षरात सुलेखन केले तरीही चालेल.
४. सुलेखन प्रकाशचित्र स्वरूपात (.jpg image) सादर करावे. ही प्रकाशचित्रे याच धाग्यावर अपलोड करावीत.

शब्दखेळ- ' यमक- गोड कवितेचे गमक '

Submitted by मभा दिन संयोजक on 26 February, 2019 - 23:22

नमस्कार!
जागतिक मराठी दिनाच्या जगभरात पसरलेल्या सर्व मायबोलीकरांना हार्दिक शुभेच्छा !

आजपासून ४ दिवस आपण मायबोलीवर मराठी भाषा दिवस साजरा करत आहोत. दरवर्षीच आपण निरनिराळे शब्दखेळ खेळत असतो. आजच्या शब्दखेळाचे नाव आहे ' यमक- गोड कवितेचे गमक ' !

' ते तेवढं गच्ची जुळतं का ते बगा की वो' अर्थात कवी लोकांना जरा मदत करूया!

विषय: 

वैद्यकातील प्रभावी नोबेल-विजेते संशोधन : भाग १ : विज्ञानभाषा मराठी

Submitted by कुमार१ on 13 February, 2019 - 04:30

सुमारे ३ महिन्यांपूर्वी २०१८चे विविध शाखांतील नोबेल पुरस्कार जाहीर झाले आणि यथावकाश प्रदान केले गेले.
यानिमित्ताने या पुरस्कारांची पार्श्वभूमी समजून घेऊ.

Alfred_Nobel3.jpg

विषय: 
Subscribe to RSS - मराठी भाषा दिवस २०१९