मराठी गझल

लिलाव

Submitted by मी अभिजीत on 30 March, 2009 - 05:10

नावे तिच्या स्मृतींचा सगळाच गाव झाला
कळले उभ्या जगाला का रंक राव झाला

मानू नको खरे तू सारेच खेळ माझे
हरण्या असेल थोडा, माझा बनाव झाला

माझी तशी तिच्याशी निःशस्त्र भेट होती
नजरेतुनी परंतू भलताच घाव झाला.

गुलमोहर: 

कितीदा..

Submitted by कौतुक शिरोडकर on 27 March, 2009 - 08:38

अता टाळतो मी, बोलणे कितीदा
कुणी ऐकते का ?..... सांगणे कितीदा

कुठे कोण जाणे, हरवले दिवस ते
मला पाहताना, लाजणे कितीदा

कळे ना कधी ही, वाट खिन्न झाली
इथे वेचलेले, चांदणे कितीदा

"कशी तू ?" तसा हा, होय प्रश्न सोपा

गुलमोहर: 

शहारा

Submitted by pulasti on 26 March, 2009 - 12:58

पळणे इतके मुरून गेले
जरा थांबता... थकून गेले

गप्पा रंगत आल्या अन मी -
कशी अचानक उठून गेले?

मनात डोकावले; दचकले
किती किडे वळवळून गेले!

अजून फांदीवरी शहारा
कुणी इथे बागडून गेले

जमेलसे वाटलेच नव्हते
हळूहळू सावरून गेले...

गुलमोहर: 

घनअक्ष सैल होता

Submitted by shrishrikant on 25 March, 2009 - 08:17

माझ्याच आसवांना पुसता मला न आले
वाटेवरी सुखाच्या हसता मला न आले

गेली छळून मजला दुनिया भल्या-बुर्‍याची
या पाशवी जगावर रुसता मला न आले

जळीत रान गेला वणवा तिच्या मनाचा
घनअक्ष सैल होता विझता मला न आले

गुलमोहर: 

शृंखला ज्याला म्हणालो...

Submitted by मी अभिजीत on 25 March, 2009 - 02:45

शृंखला ज्याला म्हणालो, हार असला पाहिजे
वाटला तो भार पण आधार असला पाहिजे

मज नको नुसतीच गर्दी कौतुकाची भोवती
निंदकांचाही मला शेजार असला पाहिजे

बांधुनी आकाश गेला चिमुटभर शब्दांमध्ये
तो कुणी साहीर वा गुलजार असला पाहिजे

गुलमोहर: 

रुसले नाही

Submitted by सुमेधा आदवडे on 23 March, 2009 - 12:20

ओघळलेले अश्रु नयनी पुसले नाही
माझे दु:ख कधी कुणाही दिसले नाही

गणीत अवघड नव्हते मम आयुष्याचे
सोडवण्यास सुत्र परी गवसले नाही

अज्ञानाचा अंधार पसरला दारात
प्रकाशात कधी ज्ञानाच्या, बसले नाही

सर्वत्र शोधली प्रतिमा आनंदाची,

गुलमोहर: 

काही स्वगते....

Submitted by _vyom_ on 22 March, 2009 - 14:15

श्वापदांचे ना मुळी ते माणसांचे काम होते
सांडले मी रक्त भरले सोयर्‍यांनी जाम होते

जाळतांना काल काही मातलेल्या आठवांना
पेटलेल्या आसवांचे मोजले मी दाम होते

ना तिथे बाजार होता ना तिथे होती दलाली

गुलमोहर: 

अशक्य केवळ

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 22 March, 2009 - 04:41

तुझाच वावर मनात केवळ
निभाव आता अशक्य केवळ

नको अता ही उगाच जवळिक
पुन्हा मनाचे दुभंग केवळ

तुझ्यामुळे ही फितूर गात्रे
अता गुलामी तुझीच केवळ

तुझी जराशी झुळूक यावी
कसे जगावे उन्हात केवळ

नको नव्याने तुझी उधारी

गुलमोहर: 

कैक मतले...

Submitted by मानस६ on 22 March, 2009 - 00:10

कैक मतले

कैक मतले ..फक्त पडलेले!
काफिये..का सर्व अडलेले?!

रोज गगनाची मला पृच्छा..,
"काय तव पंखात दडलेले..?!"

सूर्य संध्येला असा भासे..,
की क्षितीजी रत्न जडलेले!

बांध तोरण जर्द पानांचे..,
रे वसंता...बहर झडलेले!

घुंगरू आले नशीबी अन..,

गुलमोहर: 

दुसरा कुणीच नाही....

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 16 March, 2009 - 05:17

पैशापरी जवळचा दुसरा कुणीच नाही
माणूस माणसाचा झाला कधीच नाही

गणगोत आप्त सारे जमले उगाच नाही
टाळूवरील लोणी उरले(पुरले) मुळीच नाही

शमले तसेच सारे देहातले निखारे
वणव्यास पावसाची नड भासलीच नाही

काळोख तुंबलेला दाही दिशात सारा

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - मराठी गझल